प्रोजेक्टर कुठला घ्यावा ?

Submitted by किरणुद्दीन on 8 February, 2019 - 09:16

आमच्या पूर्वीच्या एकत्र घरात भावाने व्हिडीओ प्रोजेक्टर बसवलेला आहे. माझ्याकडे त्याच्यासारखे या गोष्टींवर खर्चायला पैसे नसतात. मात्र त्या वेळी महाग असलेल्या या वस्तू आता खूपच स्वस्त झालेल्या आहेत. तसेच आता रिलायन्सचे गिगा फाय येत आहे. त्यामुळे टीव्ही पहायची पद्धत बदलून जाईल असे वाटू लागलेले आहे.
हल्ली बाजारात अगदी १८०० रूपयांपासून प्रोजेक्टर्स आहेत. ३५०० रू ला अ‍ॅमेझॉनवर आहे तो थोडा टिकाऊ दिसतोय. मात्र सगळे फीचर्स समजत नाहीत,
माझी गरज म्हणजे इंटरनेटवरून सर्व टीव्ही चॅनेल्स, यू ट्यूब, स्ट्रीमिंग चॅनेल्स नेफ्लि, प्राईम, जिओसिनेमा, एमक्स प्लेयर हे दिसले पाहीजे. डिव्हीडी प्लेयरची आवश्यकता नाही वाटत. तसेच मोबाईल कनेक्ट झाला पाहीजे. कराओके असल्यास उत्तम.

अशा सेट अप साठी कुठला व्हिडीओ प्रोजेक्टर घ्यावा ? (शक्यतो सीलींग माउंट असावा ).
बजेट - ५००० रू. पर्यंत जे ऑनलाईन दिसतात त्यातला आनंदाने घेईन. पण त्यात प्रॉब्लेम्स असतील तर २०००० रू. पर्यंत बजेट वाढवू शकेन. जर त्यातही बसत नसेल तर फार तर फार ४५००० पर्यंत सुचवू शकता. पण त्या पलिकडे कुठल्याही परिस्थितीत नको.

(हॉल एल आकाराचा आहे. ही समस्या आहे. आठ, सहा, पाच फूटावरून चित्र प्रोजेक्ट करता येईल ).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा घ्यावा का ? कि यात काही प्रॉब्लेम्स असणार आहेत ?
https://www.amazon.in/EGATE-i9-MIRACAST-LED-PROJECTOR/dp/B071HSMPJY/ref=...

यात ३ डी ही दिसतेय
https://www.amazon.in/Vivibright-Version-Projector-Cinema-Portable/dp/B0...

५००० रुप्येला प्रोजेक्टर?

ओके. चार-पाच वर्षांपूर्वी यावर बराच अभ्यास, विविध टेक्नॉलॉजीजची तुलना आणि काथ्याकुट करून मी शेवटी ViewSonic चा LED DLP Projector घेतला. तो थोडा महाग असला तरी तेंव्हा मला Amazon वर डील मध्ये मिळाला. अजूनही तो चांगला चालतोय.

टेक्नोलॉजी:
यामध्ये दोन प्रकारच्या टेक्नोलॉजी आहेत. बल्बची आणि अंतर्गत स्क्रीनची.
बल्ब LED आहेत असे प्रोजेक्टर घ्या. पूर्वी LED नव्हते तेंव्हा बल्ब काही महिन्यांत जळून जात असे. त्याकाळात मी सोनीचा एक तसा प्रोजेक्टर घेऊन पस्तावलो होतो. पण LED टेक्नोलॉजी बल्ब खूपच टिकाऊ आहेत.

अंतर्गत स्क्रीन दोन प्रकारचे. LCD आणि DLP. DLP जास्त पोपुलर आहेत.

त्यामुळे LED - DLP टेक्नोलॉजी वाले प्रोजेक्टर घ्या.

आता ब्राईटनेस:
साधारण 500 Ansi Lumens घरगुती वापरासाठी योग्य आहे. म्हणजे कधीतरी वापर शिवाय बंद खोलीत आजूबाजूला जास्त प्रकाश नसेल अशी रचना वगैरे. पण जर तुम्हाला दिवसा उजेडी आसपास लख्ख प्रकाश असताना वापर करायचा असेल (हेवी ड्युटी) तर किमान दोन हजार Lumens चा घ्या. पण एलइडी मध्ये इतक्या Lumens चे उपलब्ध आहेत का माहिती नाही.

हे मार्केट खूपच बदलणारे आहे. तेंव्हा तुम्ही केवळ या माहितीवर निर्णय घेऊ नका. सध्याचे नवीन ट्रेंड आणि रिव्यू बघा.

सगळे असले तरीही पाच हजार हि खूपच कमी रेंज वाटते. या रेंज मध्ये माझ्या अंदाजाने अगदीच कामचलाऊ छोटा Handheld प्रोजेक्टर किंवा दिल्ली मेड मिळत असेल. अर्थात हा माझा निव्वळ अंदाज आहे. सध्याचे ट्रेंड माहिती नाही. पण शक्यतो दिल्ली मेड घेऊ नका. Branded च घ्या.

अतुल पाटील. अगदी सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार.
तंत्रज्ञान खूपच बदलले आहे. त्यामुळे मायबोलीकरांना साद घातली आहे. मी स्वतः बघतोच आहे. पण गोंधळ होत आहे.

अँकर चा पोर्टेबल प्रोजेक्टर आहे. ब्राईटनेस खूपच कमी दिसतोय. तरी पाहून येईन. सीलिंग माउंटिगची सोय असेल आणि ब्राईटनेस वाढवता आला तर विचार करता येईल.

Egate i 9 चांगला आहे. मिराकास्ट नसलेला माझ्याकडे आहे. खूप भारी नाही, पण अजिबात वाईट नाही असा आहे. चांगला चालतो.
इनबिल्ट स्पीकर बरे आहेत, पण external speakers लावून वापरले तर एकदम मस्त. ७-८ फूट अंतरावर च्या पांढऱ्या भिंतीवर प्रोजेक्ट केले तरी छान दिसते. अमेझॉन प्राईम/ Netflix content HDMI वापरून पाहता येतो. प्रोजेक्टर वर पिक्चर पाहिले, की मग टीव्ही वर पहावेसे वाटतं नाहीत !

[ बजेट असेल तर १०हजार + चा घ्या. मी पहिल्यांदाच प्रोजेक्टर घेतला त्यामुळे अमेझॉन वर जास्तीत जास्त रेटींग्ज (no. Of ratings, and no of positive ratings) , आणि सगळ्यात स्वस्त ह्या प्रमाणे घेतला. ]