तुझं अस्तित्व

Submitted by सेन्साय on 5 February, 2019 - 09:28

तुझं अस्तित्व
~~~~~~~~~

विश्वाच्या पसाऱ्यात
माझंही एक
छोटंसं जग होतं
ज्यात तूझं अस्तित्व
माझ्या आयुष्याचा
कायम केंद्रबिंदु होतं
तुझ्या अचानक जाण्याने
माझ्या जीवनाचे मात्र
अक्षांश रेखांश
पार कोलमडून गेले
विषुवृत्तावर हल्ली नेहमीच माझ्या
सर्व आकांक्षाचे
बर्फ थिजू लागले
तर धृव टोकांवर मात्र
एकत्रित पाहिलेली स्वप्ने
विरघळून वाहू लागली
२१ टक्क्याच्या आधारे
श्वासाने दृष्य भासवली
त्रिमिती जीवंत तरी
पाषाण एक चंद्रावरचा
निश्चल अस्तित्व अंधारलेला
फक्त मी उरलो आहे !!

― योगेश जोशी
© सर्व हक्क स्वाधीन

Group content visibility: 
Use group defaults