जयपूर आणि उदयपूर बद्दल माहिती

Submitted by सान्वी on 4 February, 2019 - 14:16

नमस्कार,
पहिल्यांदाच या विभागात लेखन करत आहे.
आम्ही म्हणजे आम्ही दोघे व आमचे सव्वा वर्षांचे चिरंजीव पुढच्या आठवड्यात जयपूर आणि उदयपूर ला जाणार आहोत. जाणकार माबोकरांनी व ज्यांनी या आधी ही ट्रिप केली असेल त्यांनी जरा आपले अनुभव सांगावे. २ दिवस जयपूर आणि २ दिवस उदयपूर असा प्लॅन आहे. राहण्याची सोय यजमानांच्या ऑफिस हॉलिडे होम मध्ये झाली आहे. प्रश्न फक्त हा आहे की प्रत्येकी 2 दिवसात कुठले must watch स्पॉट्स करावे? सोबत लहान बाळ आहे त्यादृष्टीने सांगावे. जयपूर चे हवामहाल न उदयपूर चे सिटी पॅलेस तर ऑलरेडी आहे लिस्ट मध्ये . तसेच शॉपिंग कुठे व कसली करावी?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फुल डे साइटसिइंग टुअर घेऊ नका. मोठ्यांना आवडणाऱ्या गोष्टी लहान मुलांना अजिबात आवडत नाहीत.
संध्याकाळी बाजारात फिरणे.

मिपाकरांनी ?
माबोकर लिहायचे कष्ट तरी घ्यायचे की.

जयपूर मार्केट मधून जिरे, शहाजिरे आणि चहा उत्तम मिळतो. घरी घेऊन जायला नक्की उचला. जोहरी आणि बापु बाझार.
जयपूर - आमेर फोर्ट, हवा महल, सिटी पॅलेस, चोखी दाणी - जेवण, मुलांना उंट राईड ( सो सो च आहे तरी पण), जंतर मंतर

माबोवर जे मिपाकर असतील त्यांनीच प्रतिसाद द्यायचे का? Happy
लहान मुल आहे तर वेदर चेक करुन त्यानुसार नियोजन करा. कपडे वैगेरे.

जयपूर, उदयपूरचे महाल चुकवू नका, गाईड घेऊन जा व सोबत कॅमेऱ्याचे पैसेही भरा. (मी 2009 मध्ये गेले होते तेव्हा कॅमेऱ्यावाले मोबाईल इतके प्रचलित नव्हते, एका किल्ल्यात मी कॅमेऱ्याचे 100 रु भरून तो न्यायचा कंटाळा केला आणि पस्तावले होते) . लेक पॅलेस तलावात फेरी जरूर मारा.

जंतर मंतर भेटही चुकवू नका, तिथेही गाईड आवश्यक आहे. शॉपिंगमध्ये भरपूर फसवणूक होते, ड्राइव्हर त्यांच्या ठरलेल्या हप्त्याच्या ठिकाणी नेतात, तेव्हा ठाम नकार द्या. तरीही नेलेच तर नुसते फिरा, काही घेऊ नका (आपण कितीही बोंबललो तरी ड्राइव्हर नेतातच).

आणि गरम कपडे सोबत ठेवा. उदयपूरला उकडत होते म्हणून त्याच अंदाजाने जयपूरला जाताना गरम कपडे मागे ठेऊन गेलो, जैपुरात इतकी थंडी की पहिली खरेदी स्वेटरची करावी लागली.

योग्य ठिकाणी शॉपिंग भरपूर करा....:) Happy

उदयपूरच्या जवळ रणकपूरचे जैन मंदिर व नाथद्वाराचे श्रीनाथजी म्हणजे कृष्णाचे मंदिर आहे. जैन मंदिर संगमरवरी दगडात कोरलेले असंख्य खांब व आत असंख्य सुंदर मूर्तींनी सजले आहे, त्याच्या जवळच एक मुच्छडवाला मंदिरही आहे पण मी तिथे गेले नाही… मला रणकपूर मंदिराचे आतून फोटो हवे होते व दुपारी 12 शिवाय फोटोसाठी परवानगी नाही असे तेव्हा होते, आताचे माहीत नाही.

श्रीनाथजीचे मंदिर दुपारी 12ला बंद होते. आम्ही नेमके 11.45 ला पोचलो असल्याने आम्हाला एक पंड्याने वरखाली जिन्यावरून बरेच धावायला लावून अखेरीस दर्शन घडवले.

उदयपुरमध्ये साजनबाग आणि सहेलियों की बाडी ,संध्याकाळी कठपुतली खेल एवढे लहान मुलांसाठी. बाकी काही नाही.

जयपुरपासून दहा किमि आमेर किल्ला. हत्तीवर बसून किल्ल्यात जाण्याचे (५ मिनिटे) बहुतेक पाचशे रु घेतात. पण मजा येईल.

एका ठिकाणाहून दुसरीकडे ओटोने गेल्यास ( हायर केल्यास एम्पोरिअममध्ये नेतातच, त्याचे कमिशन फिक्सिंग असते.) आटोपशिर होते आणि केव्हाही रुमवर परतू शकतो.
दुलई हे एक बोगस प्रकरण वाटते. सिल्क कापड अन आतला सिंथेटिक कापुस काय फक्त जयपुरातच होतो का?

रणकपूरचे जैन मंदिर, नाथद्वारा आणि कुंभालगड यासाठी प्रवासाचे बरोबर आयोजन करावे लागते.
राणकपुरला राहिलो आहे.
नाथद्वाराच्या बाजारातले कपडे, बांगड्या वगैरे सुरतचे/दुसरीकडचे असतात.

दुलई हे एक बोगस प्रकरण वाटते. सिल्क कापड अन आतला सिंथेटिक कापुस काय फक्त जयपुरातच होतो का?>>>>

माहीत नाही. पण मुंवैतल्या हँडलूम एक्स्पोमध्येही दुलया फक्त जयपूरच्याच मिळतात. रंगही टिपिकल असतात. अर्थात मुंबईच्या हवेत यांचा उपयोग शून्यच.

किल्ले-महाल- म्युझियमचा ओव्हरडोस होईल थोडा उदयपूर + जयपूर एकत्र घडले तर.

जयपूरचे जंतरमंतर मात्र गाईड घेऊन बघा + आमेरच्या किल्ल्यावर हत्तीवर बसून चढाईचा अनुभव मजेदार. किल्ल्याच्या पायथ्यापासून जवळच एक 'हत्तींचे गाव' आहे तिथे दिवसभर त्यांच्यासोबत पाण्यात खेळता येते पण थंडी आणि लहान बाळ सोबत असल्यामुळे जमेल का माहित नाही.

शाकाहारी असाल तर जयपूरची खाद्यभ्रमंती जबरदस्त. साजूक तुपातल्या मिठाया - माखनीया लस्सी - प्याज कचोरी - घेवर की चाट असे हटके प्रकार असतात. २ दिवसात किलोभर ह्या प्रमाणात वजन वाढते Happy

स्त्रीवर्ग जयपूरच्या बांधणी-लेहरीया ड्रेस / साड्यांवर मेहेरबान असतो. त्यासाठी बापू बाजार, जोहरी बझार, बडी चोपड ह्या प्रचंड गर्दीच्या भागात अनेक दुकाने आहेत. घासाघीस न होणाऱ्या मोठ्या दुकानातून दिलखुष शॉपिंग होऊ शकते.

प्रवासाला शुभेच्छा !

जयपूर मध्ये शॉपिंग साठी बापु बझार मधे गेलो होतो.. मस्त आहे.. आत्ता डिसेंबर मधेच गेलो होतो आम्ही.. मोठा बाझार आहे .. स्ट्रीट शॉपिन्ग आणि दुकानं दोन्ही आहे.. मी भरपुर शॉपिन्ग केली.. मस्त वेळ काढुन जा

Jaipur - Now a days there is huge traffic jam near city palace, hawa mahal due to Metro work. Plan accordingly. I stuck for nearly 2 hrs when I visited Jaipur in December end. Taking out car from that area without getting dent / scratch was a challenge. Jaipur shopping is overrated so avoid if you can.
Rest Jaipur is beautiful city. Don't give overdose of Mahals and Rajasthani food to kids. They will get bored quickly. Happy

राजस्थानी जेवण मलाही तितकेसे आवडले नाही. एक रात्र चोखी दाणीत जेवण, दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी दाल बाटी वगैरे कार्यक्रम झाल्यावर मला अचानक वरण भाताचे कढ यायला लागले Happy :).

खरं तर पुण्यातील चोखी धानी मध्ये जेवलेलो आहे त्यामुळे त्यात काही नावीन्य नाही. मला खरंतर बाळासाठी सोयीस्कर जेवण फुलके किंवा मऊ वरण भात मिळाला तर खूप चांगलं.

सान्वी, तुम्ही महाराष्ट्र मंडळ जयपूर असे गुगल वर टाकुन बघा, तिथे पत्ता आहे. त्यांना पाहीजे तर विचारा की मराठी जेवण कुठे मिळेल का ते. कारण प्रत्येक प्रांतात आपले मराठी लोक असतातच की. खाली एक लिंक दिलीय, ती मोठी वाटते मला.

https://www.google.com/maps/contrib/108253288210359150673/place/ChIJScYr...@26.9150141,75.8072107,17z/data=!3m1!4b1

रेल्वे स्टेशन किंवा बस डेपोच्या आसपास कुठेतरी खानावळ असतेच पण बुकिंग केलेली हॅाटेल्स / कंपनीच्या लोकांना मिळणारी हॅालिडे होम्स कुठेही दूर असू शकतात. त्यांचा कुक तिथे असला तर काम होईल.
जी रेस्टारंट्स सकाळी सातला उघडतात त्यामध्ये पोहे फार चांगले मिळतात. पोहे खाण्यासाठी मध्य प्रदेशपेक्शा राजस्थान उत्तम. तिखट नसतात, टोमॅटो कांदा शेव लिंबू टाकून देतात. शिवाय चहासुद्धा छान असतो.

ख्रिसमसचा आठवडा जयपूर आणि जैसलमेरला जाणार आहोत. कृपया माहिती द्या. 4 ते 8 वर्ष वयाची 4 मुले सोबत आहेत. तिकडे कोणत्या प्रकारचे गरम कपडे लागतील.