मार्च २००९ सर्वोत्तम कविता

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काही अपरीहार्य कारणाने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम कविता प्रसिद्ध करता आली नव्हती.

या महिन्यात हा मान दोन कवितांना विभागून देण्यात येत आहे.

१. पाऊस बारावाटा
अतिशय नेमक्या आणि नेटक्या शब्दांत जिवंत झालेलं एक सुंदर निसर्गचित्र.
’सरती सायंकाळ’, ’मुठीतून पारा पसार व्हावा तसा निसटून जाणारा प्रकाश’, ’भेगांचे गार्‍हाणे’ अशा बोलक्या प्रतिमा आणि मेघघुमारे, गदमदणारी जमीन यांसारखे अर्थातून आणि नादातूनही हा अनुभव सजीव करणारे शब्द या कवितेचं सौंदर्य वाढवतात.
कवितेचा ओघ आणि लयही अतिशय सहज आहे. तसाच वैशिष्ट्यपूर्ण तिचा शेवटही.
चराचराने अशी आसुसून वाट पाहिल्यानंतर जेव्हा बारा वाटांनी उधळत पाऊस येतो, तेव्हा त्या आनंदाने क्षणभर निःशब्द करावं तशीच आणि तिथेच संपते कविता.

२. दादा म्हनले..
’कळपाच्या मानसिकतेवर’ नेमकं भाष्य. साधे सहज शब्द आणि शेवटी आलेली एका अर्थी अपेक्षितच कलाटणी यांतून असहाय्यता आणि उपरोध धारदारपणे अधोरेखित होतो. पुन्हा एकदा अगदी नेमका शेवट.

सर्वोत्तम कवितांव्यतिरिक्त या इतर काही लक्षवेधी कविता :
१. एक काही येत हाती
२. तारणहार
३. न जाणो कधी
४. मागणे हेचि

सर्व कविता वाचून त्यातून वरील कविता निवडण्याचे काम या महिन्यात स्वाती आंबोळे यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

विषय: 
प्रकार: 

आयला, एप्रिल फुलचा अभिनव प्रकार तर नाही ना हा! काहीही असो, मनापासुन धन्यवाद आणि सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन !! Happy

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

राजा आणि विशालदा ! काँग्रॅट्स !!

बाकी इतर कविंचेही अभिनंदन ! Happy

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

अ‍ॅडमिन समीतिने गोंधळात टाकले आहे आज निकाल जाहीर करुन Wink
असो, पण विशालदा आणि राजा चे हार्दिक अभिनंदन !! Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

दोघांचेही अभिनंदन Happy
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास या हो |

राजा, विशाल....... खूप खूप अभिनंदन Happy

विशाल च्या दादा म्हनले ला......मी मिसळपाव वर अभिप्राय दिलाय. इथे मला दिसलीच नाही.

~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

तुम्हा दोघांचही अभिनंदन विशाल आणि राजा
आणि लक्षवेधी कवितांच्या जन्मदात्यांचपण अभिनंदन Happy

सर्वांचे अभिनंदन. कविता सुरेख आहेत.

तसेच admin टिम आणि स्वाती आंबोळे यांचे आभार. (एप्रील फूल नसावे म्हणजे झाले.) Happy

राजा आणि विशाल.

दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!

विशाल,
आता ती कथा पूर्ण करा बघु:)

राजा आणि विशाल.

दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!

स्वाति यांना धन्यवाद. फेब्रुवारीत पहीली कविता कुठली?

या कवितांचे अर्थ कुठे लिहीले आहेत का? म्हणजे मार्च महिन्यातल्या कवितांचे अर्थ कळले, पण जानेवारीतल्या उत्तम कवितेचे, 'घन अक्ष' वगैरे शब्द असलेल्या कवितांचे अर्थ जाम समजत नाहीत.
कदाचित् कवितेचा अर्थ सांगणे म्हणजे विनोद समजावून सांगण्यासारखे असेल. आपल्याला कळला नाही की ती सबब पुढे करायची!!

राजा, तुझी कविता छान वाटली. पण मला श्यामलीची कविता जास्त आवडली मार्च महिन्यातली. शुमाच्या पण छान होत्या. असो.. कविता पहिली की दुसरी पेक्षा ती किती जणापर्यंत पोचली याचे मला जास्त मोल वाटते.

आणि स्वातीकडून तर खूप काही अपेक्षित होते ते परिक्षणात आले नाही Sad

ग्रेट स्वाती... आणि विजेत्यांचे विशेष अभिनंदन!!!
अश्याच चांगल्या कविता करत रहा.. तुमचे मनःपुर्वक आभार...

सर्वोत्तम आणि लक्षवेधी कवी, कवयित्रींचे मनःपूर्वक अभिनंदन !!

दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!

विशाल दा, ग्रेट्च !
हेहेहेहीहे आता पार्टी !!! Rofl

Happy
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

हे बरं केलंय. त्यानिमित्तानं चांगल्या कविता वाचायला मिळाल्या वाचकांना. आणि चांगल्या कवितांना न्याय मिळाला. नाहीतर इतका पेशन्स ठेवून कवितांमागून कविता वाचून एखादी हाती लागणार. तिकडं जाणंच राहून जायचं.
पण स्वाती तू खरी धीराची गं.:) थँक्स या मोठ्या कामासाठी.

दोन्ही विजेत्यांचे मनापासून अभिनंदन.
---------------------------------------------------------------
फूलोंसे कांटे अच्छे होते है,
जो दामन थाम लेते है.
दोस्त से दुश्मन अच्छे होते है
जो जलकर नाम लेते है.