तारणहार

Submitted by Cleo on 23 March, 2009 - 22:30

असंच कधीतरी एकदा वाटलं
जवळ सगळं काही असताना किंवा
सारं असून काहीतरी नसताना बहुतेक..
वाटलं.. व्हावं कोणाचातरी आधार
दुवे घ्यावेत एक-दोन, नकोत जरी हजार

जणू माझी गरज ओळखून
तू येऊन हात पकडलास..
मीही दिलं मग तुला बरंच काही
माझ्याकडचं अगणित, मुबलक
निरर्थक, ऐहिक ..विनासायास

त्याबदल्यात म्हटलं तर हिशेब सोपा होईल
पण तू दिलंस तुझ्याकडचं देण्यासारखं
अमूल्य, एखादंच.. पण भरभरून
तरीही तुझ्याच डोळ्यात दिसत राहिलं अपार..
पाहणार्‍याला प्रश्न पडावा
कोण कुणाचा तारणहार?

गुलमोहर: 

छान...

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

मस्तच. आवडली.

आवडली. मस्तच आहे.

.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

छान आहे.
************
विविध घटकांतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)

आवडली. मस्तच आहे.
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" तू दिलंस तू दिलंस! मस्तच. "

छान

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

छान

अरे ही कशी राहून गेली वाचायची????????
सुंदर आहे कविता, स्वातीला धन्यवाद

ये स्वाति

खुप छान आहे तुझि कविता

मला आवडली..