पाटील v/s पाटील - भाग १३

Submitted by अज्ञातवासी on 23 January, 2019 - 21:58

पाटील V/S पाटील - भाग १२

https://www.maayboli.com/node/68786

कृपया हा भाग वाचण्याआधी मागचा भाग मनापासून वाचणे.

"तर मोहन, हे किसनराव, आजपासून तुझ्या जागी हे काम करतील." 

"मोहन जागीच गप्प होता." 

"नमस्कार, आपण?" कृष्णरावानी मोहनला विचारले.

"मी... मोहन... मोहन... पाटील."

"अरे वा, तुम्हीही पाटीलच का. आणि आपलं नावही सारखं आहे."

"तर मोहन, आजपासून तू वरच्या खोलीत रहायचं. किसनराव, तुमची राहायची सोय?"

"अण्णा, मला वरच्या खोलीत नको, मी माझ्या जुन्याच खोलीत राहतो. किसनरावाना अडचण नसेल, तर ते माझ्यासोबत राहतील." मोहन कृष्णरावांकडे रोखून म्हणाला.

"जशी तुझी इच्छा," कृष्णराव म्हणाले.

दिवसभराचं काम संपवून मोहन आणि कृष्णराव बंगल्यावर निघाले होते. 

"बाबा, गरज काय होती इकडे यायची? तुम्ही आणि ड्रायवर?आधी घरी जा बघू." मोहन चिडला होता.

"गरज? दोन महिने झाले, माझा मुलगा इथे ड्रायवर म्हणून वावरतोय." नाही राहवलं रे.

"बाबा, पण तुम्ही ड्रायवर?"

"बाप आहे मी, मोहन, बाप, आणि मुलगा सुद्धा. तीळ तीळ तुटतो रे जीव, आईची तब्येत जरा बरी झालीये, पण एकच ध्यास धरलाय तिने. तिला अंबा हवीये युक्रेनला. आणि..."

"आणि काय?"

"तुझ्याविना नाही राहवलं. आम्हाला सवय आहे रे कष्टांची, भट्टीत रहायची, पण तुम्हा पोरांना काहीही कष्ट पडू नये, म्हणून हे साम्राज्य उभं केलं. आणि तू सगळं सोडून इथे आलास, मग तुझा बाप राहील होय?"

"बाबा, गरज नव्हती." मोहनच्या डोळ्यात पाणी होत. 

"मला शिकवू नकोस, त्यासाठी बाप व्हावं लागत."

"सोडा, चला आता उतरा, मला गाडी चालवू द्या."

मोहनने गाडी चालवायला घेतली.

बंगल्यावर पोहोचताच मोहन व्यासवर चिडला. 

"व्यास, तुम्ही माझ्यापासून का लपवलंत?"

"मोठे साहेब इथे नव्हते, तोपर्यंत मी तुमच्या सूचना पाळल्या. आता यांच्या पाळतो."

"जे करायचं ते करा. शेवटी वडील कुणाचे..."

आणि सगळे मोठमोठ्याने हसू लागले.

संध्याकाळी जेवण झाल्यावर कृष्णराव गच्चीवर खुर्ची टाकून बसले. तर मोहन त्यांच्या पायाशी!

"बाबा, किती दिवसांनी असं शांत बसायला मिळालय ना?"

"हो रे, युक्रेनमध्ये कसली अशी शांतता?"

"आईला आणायला हवं होत. तिलाही आवडलं असत."

"ती तर माझ्या मागेच लागली होती. पण तिला म्हटलं, तिथे खूप ऊन असतं, तुझा गोरा रंग काळवंडेल,"

"बाबा," मोहन अचानक कृष्णरावांकडे वळून म्हणाला.

"काय?"

"कसं पटवलं... आय मिन जमवलं, तुम्ही आईला. म्हणजे... तुमच्यात काहीच कॉमन नव्हतं, म्हणून..."

"जमत रे, सगळं जमत... जगात काहीही अशक्य नसत मोहन, पण त्याला सत्याचं..खरेपणाचं अधिष्ठान हवं."

मोहन फक्त हसला.

"आणि का रे?" कुणाच्या प्रेमात पडलास का?

"नाही हो, प्रेम आणि युद्ध कसं करणार एकत्र," मोहन लाजत म्हणाला.

"बाबारे जगात प्रेमामुळेच बरीच युद्धे झालीत..आणि युद्धामुळे प्रेमही..." कृष्णराव खळखळत हसत म्हणाले, मोहनही त्यांच्या हसण्यात सामील झाला.

"आय मिस यु बाबा," मोहन म्हणाला.

"नको इमोशनल होऊस आता. पाटलांच्या कारभाऱ्याची जागा घेतलीस, हळूहळू सगळं कारभार हातात घे."

"होय बाबा."

"चल, उद्यापासून ड्युटी आहे मला," कृष्णराव समाधानाने हसले.

"गुड नाईट बाबा!"

"गुड नाईट बेटा!"

दुसऱ्या दिवशी मोहन आणि कृष्णराव, दोन्ही पाटलांकडे निघाले. 

मोहन रूममध्ये काम करत बसला होता, तेवढ्यात मीने आत आली.

मोहन, 

"बोला मीनेताई." मोहन उठून उभा राहिला.

"बस रे, काय एवढी फॉर्मॅलिटी, ती लाडीकपणे म्हणाली."

मोहन चपापला.

"मग, तुझ्या घराविषयी काही सांग ना..."

"काही नाही हो सांगण्यासारखं..."

"बरं सोड, मला खूप दिवसापासून काहीतरी मनातलं सांगावस वाटतंय."

"मिनेताई.. "मोहन घाबरा झाला, "काय सांगायचंय?"

"जवळ बस ना माझ्या, मग सांगते..."

"मिनेताई, अहो मी तसला..."

"गप्प, मोहन तू किती हुशारीने सगळे काम करतोस, मी तर फिदा झालेय तुझ्यावर."

मोहन सुन्न झाला...

"म्हणून माझं एक काम तुझ्याकडे सांगायचंय..."

मोहनला आशेचा किरण दिसला. कोणतं काम?

"करशील नक्की?"

"सांगा ना पटकन."

"माझं एका मुलावर खूप प्रेम आहे रे!"

  

   

   

     

  

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
छान आहे नेहमीप्रमाणे
मस्त लिहिलसं...

चांगला झालाय हा भागदेखील. अगदी शारुख आणि अनुपम खेर आठवले.
बादवे पायापाशी बसला जास्त ठीक राहील ना? पायथा डोंगराला असतो.

धन्यवाद विनिता, अनघा, उर्मिला, सिनिअर, डिंपल.

मेघे कधीची गायबली होतीस, आता माबोवर राहा.

ऍमी बदल केला आहे, मला पायापाशी पेक्षा पायाशी अजून
सुटेबल वाटलं. करेक्शनबद्दल धन्यवाद
तसंही कृष्णरावांचं कार्य डोंगराएव्हढं आहेच की!!