तुमचे स्वतःचे लेखन जिथे अगोदर प्रसिद्ध झाले, त्या प्रकाशकांवर हे अवलंबून आहे. सहसा मूळ प्रकाशकांकडे मालकीहक्क (Copyrights) राखीव असतात. त्यांची पूर्व परवानगी घेऊन असे लेखन इथे लिहायला मायबोली प्रकाशकांची हरकत नाही.
याउलट नवीन लेखन मायबोलीवर प्रथम प्रसिद्ध झाले तरी त्याचे सर्व ह्क्क तुमच्याकडेच रहातात. त्यामुळे इथे प्रसिद्ध झालेल्या लिखाणाला इतरत्र पुनःप्रकाशित करण्यासाठी मायबोलीची परवानगी घ्यायची गरज नाही.



>>>> "याउलट नवीन लेखन मायबोलीवर प्रथम प्रसिद्ध झाले तरी त्याचे सर्व ह्क्क तुमच्याकडेच रहातात. त्यामुळे इथे प्रसिद्ध झालेल्या लिखाणाला इतरत्र पुनःप्रकाशित करण्यासाठी मायबोलीची परवानगी घ्यायची गरज नाही."
हे वाक्य असे हवे का?
"याउलट नवीन लेखन मायबोलीवर प्रथम प्रसिद्ध झाले तरी त्याचे सर्व ह्क्क लेखकाकडेच रहातात. त्यामुळे इथे प्रसिद्ध झालेल्या लिखाणाला इतरत्र पुनःप्रकाशित करण्यासाठी मूळ लेखकाने मायबोलीची परवानगी घ्यायची गरज नाही.
लेखकाव्यतिरिक्त अन्य कुणाला येथिल लिखाण इतरत्र पुनःप्रकाशित करायचे असल्यास, त्या त्या लेखकाची पूर्वपरवानगी घ्यावी"
चु. भु. दे. घे.
...;
आपला, लिम्बुटिम्बु
लेखमालिका ह्यात लिहिण्यासाठी काय करावं लागेल? नवीन लेखन करण्यात "लेखमालिका" असा विभाग येत नाहीये.
दाद, मायबोलीवर प्रकाशित झालेल्या लेखांची लेखमालिका [जसे की कादंबर्यांचे भाग] प्रशासक तयार करतात.
ओह. म्हणजे मी भाग टाकायला सुरूवात करायची आणि प्रशासकांना कळवायचं... मग ते काय करायला हवं ते करतात?
असो... कळेलच दुसर्या भागानंतर
हॉय. प्रशासकच लेखमालिका तयार करू शकतात.
maza barach saahitya shivaji fontmadhe save kelela aahe.te mala ithe prasidha karayachya.
te mi kasa lihun kalavu?
इथे मराठीच्या इतर बहिणी जसे की कोकणी भाषेत लिहिले तर चालेल का?
हा आख्खा ग्रुपच त्यासाठी आहे बघा प्रीमो : कोकणी फकाणे. एकवार मायबोलीच्या संक्षिप्त आढाव्यावरही नजर टाका.
बहारश्री: मायबोलीवर सध्यातरी शिवाजी फाँटमधून युनिकोडमध्ये रुपांतरीकरणासाठी काही सुविधा उपलब्ध नाहीत. गूगलवर तुम्हाला शोधून काही मिळाले तर ते वापरावे लागेल.