उत्तर मला द्याल का ?

Submitted by Asu on 21 January, 2019 - 02:04

सध्याची तरुण पिढी करीयरच्या मागे लागते. आर्थिक व वैयक्तिक स्वातंत्र्याची चटक लागल्याने जीवनात स्थैर्य आणणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे ते दुर्लक्ष करतात. कारण, लग्न/संसार म्हणजे तडजोड !
अशा, तरुण - तरुणींना उद्देशून लिहिलेली ही कविता -

उत्तर मला द्याल का ?

नव्या पिढीच्या तरुण मुलांनो
उत्तर मला द्याल का ?
उद्देश तुमचा जगण्याचा
जरा मला सांगाल का ?

वेळ नाही तुम्हां माहीत
क्षणभर जरा थांबाल का ?
आयुष्याच्या या वळणावर
रस्ता अचूक धुंडाल का ?

अमाप पैसा ऐषोआराम
जगणे असेच सांडाल का ?
मानव जात विकसित करण्या
जरा तुम्ही भांडाल का ?

नाते आपले मानवतेचे
मनात कधी जपणार का ?
जात पात धर्म भेद
विसरून तुम्ही जगणार का ?

कुत्रे मांजरे जन्मुनी मरती
तसेच तुम्ही मरणार का ?
मरण्या आधी अमरत्वाचे
अमृत कर्म कराल का ?

निसर्गनिर्मित कर्म आपुले
कर्तव्यात कसूर का ?
उद्देश तुमचा जगण्याचा
पिढी नवीन घडविणार ना!

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults