मराठीचा तास असेल--- म्याडम पोर्शन कम्पलिट झाल्याने न शिकवता बसून होत्या ९वीच्या वर्गात!!! तसही त्यांना शिकवायचा फार कंटाळा---पण आज त्या बोलू लागल्या!!! चक्क आम्हां मुलींशी हसून (जे महागडे असे) संवाद थाटत असल्याच्या आविर्भावात प्रश्र्न विचारत्या झाल्या----"शिवाजी महाराजांची किती लग्न झाली होती व त्यांच्या पत्नींची नावे ठाऊक आहेत का?"
वर्गांतील मुली उत्साहाने सांगून गेल्या,"दोन!!!संभाजी महाराजांच्या आई सईबाई अन् राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई"
म्याडमचे पुन्हा ते महागडं हास्य चेहय्रावर झळकल!!!
"चूक!!!!",त्या मान (स्पेशल स्टाईलने) हलवत म्हणताच; 'मुली अवाक!!!!'
प्रश्नांकित नजर एकमेकांकडे मग त्या कधीही संवाद (असा आवर्जून) न साधणाय्रा "कडक शिक्षिका" म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्या म्याडम कडे पाहत एक/दोघींनी ,"मग?" एकदाचा प्रश्न विचारण्याची डेअरींग केली!!!!
पुन्हा तेच छद्मी ,महागड हास्य!!!!!त्या जोडीला पिरीअड् संपल्याची शाळेची घंटा घणघणलीs s s s s
म्याडम आल्या तशा गेल्या---- जाता जाता मुलींना कधी हसवण तर जमलं नाही पण यावेळी प्रश्नांच्या गर्तेत मात्र लोटून गेल्या!!!!!
वर्गात घनघोर शांतता स्पष्ट जाणवत होतीच, बरोबरीला प्रश्नमालिकांची मंदियाळी मनामनात थैमान घालत होती!!!!!
अरे आपल्याला शिवाजी महाराजांविषयी काहीच ठाऊक नाही अन् विशेष आपल्याला कोणीच कसे याआधीच सांगितले नाही?
प्रश्र्न! प्रश्र्न!!प्रश्र्न!!!! प्रश्र्न!!!!!प्रश्न!!!!! अन् फक्त प्रश्नच!!!!!!!
मग काय वर्गातल्या हुशार समजल्या जाणाऱ्या मुलीला,वर्गातल्याच 'ढ'मानल्या गेलेल्या मुलींनी एक एक प्रश्न विचारण्यास (की फेकण्यास) सुरू केले !!!!
त्यांची अनेक प्रश्र्न मालिका जी सुरू झाली ती झालीच----- त्या हुशार मुलीला तर पळता भुई थोडी झाली ना!!!!
त्यांच्या अनेक प्रश्नांपैकी हा एक (सगळ्यात पहिला प्रश्र्न) जिजाऊंनी शिवाजीला घडवला म्हणतात; तरीही शिवाजी महाराजांनी इतकी (नेमकी किती?तर जास्त,दोनपेक्षाही, इतकं आता त्यांना कळून चुकले होते) लग्न का केली? मग एवढं 'घडवून' काय उपयोग झाला? शेवटी त्यांनी करायची ती जास्त लग्न केलीच ना!!!मग सामान्य माणसात अन् त्यांच्यात काय फरक उरला???
बिच्चारीला अक्षरशः वर्गातल्याच इतर बय्रापैकी समंजसपणा प्राप्त झालेल्या (हुशार-ढ मिक्स) मुलींनी वाचवले म्हणा हवे तर;"अरे तुम्ही तिला का विचारताय? ज्यांच काम आहे; तुम्हाला योग्य माहिती देण्याच,शिकवण्याच, त्या आदरणीय (!!) म्याडम/सरांना जाऊन विचारा ना ,जे काही विचारायचे ते!!! आमचं कशाला डोकं खाताय??? (यावर निरागस प्रश्र्न 'ढ' मानल्या गेलेल्या मुलींचा," मग आमच्या प्रश्र्नांची उत्तरे देणार कोण?तुम्हाला उत्तर कसं ठाऊक नाही? तुमच्यात अन् आमच्यात काय फरक उरला?मग तुम्हाला हुशार का म्हटलं जातं?तुम्ही हुशार आहात ना?मग तुम्ही आमच्या प्रश्र्नांची उत्तरे द्यायलाच हवीत!!!! सर/ म्याडम कसे आहेत; ते तर माहितीच आहे ना तुम्हाला?" ). आणि मुलींनोs s ,"पेपरात (परीक्षा) तुम्ही कितीही मार्क मिळवलीत तरी तुम्ही हुशार असतात असे नाही,हे तुम्ही आधी लक्षात घ्या.परीक्षेतले मार्क अन् हुशारीचा काहीही संबंध नाही.परीक्षेतली टक्केवारी तुम्हाला पुढे जाऊन डॉक्टर,इंजिनिअरींगला प्रवेश मिळवण्यासाठी फार तर उपयोगी पडतील ---- पण म्हणून काही तुम्ही"हुशार"ठरत नाही,हे आजच्या म्हणजे आत्ताच्या, नुकत्याच घडलेल्या प्रसंगावरून,आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेलच-----" (पुन्हा त्या मुलींचा एकेक करत अनेक निरागस प्रश्र्न,मग आमच्या प्रश्नांना कधीच कोणी उत्तर देणारच नाही का? आमच्या मनातल्या प्रश्नांना काही अर्थच नाही का?मी शिवाजीमहाराजांना माझा आदर्श मानत होते!!! मी सुद्धा!!!----) त्यामुळे थोडा वेळ द्या----विचार करायला!!! सर्वांना सर्वांच्या प्रश्र्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल------
अन् मूळात जे प्रश्र्न तुम्हाला पडलेत; तेच आम्हाला ही पडली आहेत.प्रश्न सगळ्यांनाच पडली आहेत अन् त्यांची उत्तरे, ही तुमच्यासारखीच आम्हालाही हवी आहेत---- पण आपल्या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देणार कोण?? ज्यांनी उत्तर द्यायला हवीत त्यांनी आज कमीतकमी 'हा' प्रश्र्न तरी विचारला,हेच आपले भाग्य समजायला हवे! निदान त्यामुळे का होईना आपल्याला कळले की "आपल्याला काय माहित नाही ते!!" नाहीतर अजूनही आपण शिवाजी महाराजांची दोनच लग्न झाली होती असेच मानत राहीलो असतो ना!!!!
आपले लांबलचक भाषण देऊन सर्व वर्गांला उद्देशून!!!!!!
काय ते भाषण; हास्य अन् विनोदाची जुगलबंदीच! जणू विनोदबूद्धी जन्मल्याबरोबरच सैरावैरा ओसंडून वाहू लागली,असे ते चित्र होते !!!!!!!
जणू काही सर्वांच्या (वर्गांतील मुलींच्या)मनातील भावना शब्दबद्धच केल्या न त्यांनी!!!!!!!!
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
महाराजांची किती लग्ने झाली
महाराजांची किती लग्ने झाली होती व पत्नींची नावे हे इतिहासाच्या पुस्तकात खूप आधी म्हणजे पाचवी सहाविलाच येऊन जाते. राज्याभिषेकाच्या धड्यात ही माहिती येते. नववीच्या वर्गाला, मराठीच्या तासाला हा प्रश्न का कुणी विचारेल?
शिकवण्याचा कंटाळा अन् म्हणून
शिकवण्याचा कंटाळा अन् म्हणून शिकायचा कंटाळा असू शकतो!!!!!
पाचवी सहावी ला माझे डोके चालत
पाचवी सहावी ला माझे डोके चालत नव्हते. त्यामुळे खूप काही विसरले गेले.
तेच तर ना!!!!!
तेच तर ना!!!!!
नववीच्या वर्गाला, मराठीच्या
नववीच्या वर्गाला, मराठीच्या तासाला हा प्रश्न का कुणी विचारेल?
>>>
सध्या संभाजी महाराजांवर मालिका चालू आहे. त्याची जाहीरात म्हणून विचारला असेल.
बहुदा असेल!!!!!
बहुदा असेल!!!!!
नववीच्या वर्गाला, मराठीच्या
नववीच्या वर्गाला, मराठीच्या तासाला हा प्रश्न का कुणी विचारेल?
>>> काही शिक्षक असतात असे, टाईमपास प्रश्न विचारून जिके परीक्षा घेणारे।
>>>>>>>>प्रश्न विचारून जिके
>>>>>>>>प्रश्न विचारून जिके परीक्षा घेणारे।>>>>>एकदम बरोबर सांगितले आहे!