The Accidental Prime Minister - चित्रपट परीक्षण!

Submitted by अज्ञातवासी on 18 January, 2019 - 04:07

ह्या चित्रपटाचं परीक्षण मी खूप दिवसांपूर्वी लिहिणार होतो, पण अशा चित्रपटाचं परीक्षण करताना कुठेही आपला राजकीय कल त्यावर प्रभाव टाकणार नाही, हे मोठं जिकिरीचं काम होत. राजकीय भाष्य टाळून परीक्षण करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे परीक्षण तुटक वाटू शकतं.
प्रत्येक चित्रपटाची एक USP असते, ती एका विशिष्ट वर्गाला भावते, मग तो क्लास असो वा मास. या चित्रपटाच्या ट्रेलर ने एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या अध्यक्षानी भारताच्या सर्वात प्रभावशाली पदाची केलेली हेटाळणी ठळक जाणवेल, अशा रीतीने दाखवली होती. हाच या चित्रपटाचा USP होता. त्यावरून बरंच वादंग वगैरे उठेल आणि त्याचा फायदा चित्रपटाला होईल, असा निर्माता-दिग्दर्शक यांचा होरा होता, पण...
...लेखणी खूप टोकदार असते, आणि चित्रपटाचा पडदा सपाट, हे या चित्रपटाने दाखवून दिलं.
the accidental prime minister मीसुद्धा वाचलंय, आणि त्यातील बारु यांची मते खरी की खोटी, चांगली की वाईट, यावर मी भाष्य करणार नाही, पण पुस्तकाचं चित्ररूपांतर करतांना चित्रपट अक्षरशः उघडा पडतो.
या चित्रपटात मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे घेतल्यापासून, ते २०१४ साली पद सोडण्यापर्यंत कालावधी दाखवला आहे. संजय बारू हे 2004 ते 2008 पर्यंत त्यांचे मीडिया सल्लागार होते, आणि त्यांनीच हे पुस्तक लिहिल. त्यात ते सत्ताबाह्य शक्तिकेंद्राकडे कसे शरणागत होते, आणि स्वतः स्वच्छ असूनही, कसे ते कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवले गेले, याचं चित्रण पुस्तकात केलंय.
मात्र पुस्तकात जी एक मनमोहन सिंग नावाची एक अगतिक, हताश पण एक खरी, दृढनिश्चयी आणि विचारी व्यक्तिरेखा होती, त्यालाच हा चित्रपट हरताळ फासतो.
चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं झालं, तर ती सगळ्याना माहितीये, त्यामुळे जास्त खोलात शिरत नाही, पण पटकथा? अत्यन्त सपाट पटकथा, एकांगी राजकीय डायलॉग, यावरच सगळी पटकथा निभावून गेलीये. या पटकथेत काहीही ठोस नाहीये, ना एक दृश्याच दुसऱ्या दृष्याशी जोडणारं नरेशन, ना कुठलीही व्यक्तिरेखा व तिची विचारधारा स्पष्ट करणाऱ्या ओळी. तर, माती खाल्ली, पूर्णपणे. आणि हो, बराचसा खोटेपणाही भरलाय पटकथाकाराने. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून मी दुर्लक्ष केलं.
मुजिक, गरजही नव्हती या चित्रपटाला, आणि जे आहे ते वाईट आहे. यापुढे काहीही बोलणार नाही.
डिरेक्शन च्या बाबतीय मी तर म्हणेल, कमाल केलीये दिगदर्शकाने. अत्यन्त एकांगी व भडक चित्रीकरण, ढिसाळ एडिटिंग आणि ठिसूळ कॅमेरा अँगल यावरून एका चांगल्या पुस्तकाची पुरेपूर वाट लावण्याची कामगिरी दिसदर्शकाने केलीये. मनमोहन सिंग हे किती कर्तव्यशून्य व बिनकण्याचे होते, हा एकच मोटो दिगदर्शक प्राणापलिकडे जपतो.
आता वळूयात अभिनयाकडे. या चित्रपटात प्रत्येक सहकलाकाराने मला भडक अभिनय करण्याची शेवटची संधी आहे, असं जाणवून अभिनय केलाय का? असं वाटतं. यात चूक पटकथा आणि दिगदर्शक या दोघांची आहे.
अनुपम खेर, हा अभिनेता कधीकधी मुद्दाम मनमोहन सिंग यांच्या शारीरिक लकबी यांची खिल्ली उडवतोय का, असं वाटतं. एक, तो मनमोहन सिंग शोभत नाही. दोन, त्याने शारीरिक हालचाली अक्षरश: व्यन्ग असल्यासारख्या दाखवल्या आहेत. सिरियसली, संताप झाला बघून.
अक्षय खन्ना, ह्या माणसाने कमाल केलीये. पटकथा आणि दिगदर्शन कसंही असलं, तरीही हा माणूस छाप पाडतो. एक कसलेला सल्लागार, छद्मी हास्यबरोबर तो दाखवतो. येस... एवढंच या चित्रपटात बघण्यासारखं आहे.
असो, बघावाच असं नाही. किंबहुना बघितला नाही तर वेळतरी वाचेल असं वाटतं. पण, पुस्तक जरूर वाचा. इट्स वर्थ!

ता.क. (हा रिव्ह्यू राजकीय भाष्य न करता लिहायचा होता, म्हणून बऱ्याचदा एडिट झाल्याने संक्षिप्त झाला. आता यात मी यशस्वी ठरलो का नाही, ते मायबोलीकरच ठरवतील)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिला Happy
आता वाचतो परीक्षण.

वाचले,
बर्यापैकी न्युट्रल लिहिले आहे. तसाही गोष्टीत सस्पेन्स नाहीये, त्यामुळे जे प्रस्नाग खटकले ते नेमके का खटकले हे थोडे डिटेल मध्ये लिहिले तर आवडेल.

मनमोहन सिंगांची खिल्ली उडवायच्या नेमक्या विचित्र कोनातून काढलेले फोटो, किंवा चुकीच्या वेळी काढलेले फोटो याच्या whtsapp पोस्त पूर्वी पासूनच फिरत होत्या,
आता तोच प्रयत्न मोठ्या पडद्यावर झालाय असे वाटते

वाचला.
तुमच्या चाहत्यांची संख्या १ ने वाढवली.

त्यामुळे जे प्रस्नाग खटकले ते नेमके का खटकले हे थोडे डिटेल मध्ये लिहिले तर आवडेल.>>>>
म्हणजे कसंही करून, मत मांडायला लावणार आहातच Wink

वाचला.
तुमच्या चाहत्यांची संख्या १ ने वाढवली.>>>>
भरत खूप खूप धन्यवाद! तुम्ही चाहत्यांच्या लिस्टमध्ये असणं मी अभिमानच लक्षण समजतो.
(तसा मला माझ्या सगळ्या चाहत्यांचा अभिमान आहेच)

मी तर आधीच तुमच्या चाहत्यांमध्ये आहे
Wink
मी मुव्ही पाहिला नाही पाहणार ही नाही.. पण पुस्तक नक्कीच वाचेन.

त्यावरून बरंच वादंग वगैरे उठेल आणि त्याचा फायदा चित्रपटाला होईल, असा निर्माता-दिग्दर्शक यांचा होरा होता, पण...
...लेखणी खूप टोकदार असते, आणि चित्रपटाचा पडदा सपाट, हे या चित्रपटाने दाखवून दिलं.>>>>

इंदू सरकार चित्रपट ट्रेलर पाहून अमुक एक विषय आहे असे वाटले होते, प्रत्यक्षात विषय भलताच होता.

बहुतेक असे सर्व चित्रपट फक्त ट्रेलरमध्येच आटोपतात. 2 मिनिटांचा ट्रेलर 2 तास ताणण्याइतके मटेरियल नसते चित्रपट बनवणाऱ्यांकडे.

अक्षय खन्ना, ह्या माणसाने कमाल केलीये. पटकथा आणि दिगदर्शन कसंही असलं, तरीही हा माणूस छाप पाडतो. एक कसलेला सल्लागार, छद्मी हास्यबरोबर तो दाखवतो >>> + १२३

अशी पुस्तके , सिनेमे सांगोवांगीच असतात.

हे काल्पनिक आहे , असे कुठे ना कुठे कोपर्यात लिहून ठेवले ले असते,

पण या निमित्ताने चित्रपट सृष्टीला एक महान कलाकार घावला.

विष्णुपंत पाग्नीस तुकाराम झाले , सिनेमा सम्पला तरी ते तुकारामच राहिले,
मग शरद पोंक्षे गोडसे झाले, नाटक सम्प्ले तरी ते गोडसेच्याच भूमिकेत भाषणे देत असतात.

आता हे , अनुपमजी खेर , आता सोनिया , काँग्रेसविरोधी भाष्य करत रहातील , बहुतेक.
Proud

मी तर आधीच तुमच्या चाहत्यांमध्ये आहे!
>>>>
ये बताना जरुरी था?
Wink

बहुतेक असे सर्व चित्रपट फक्त ट्रेलरमध्येच आटोपतात. 2 मिनिटांचा ट्रेलर 2 तास ताणण्याइतके मटेरियल नसते चित्रपट बनवणाऱ्यांकडे>>>>
पण पुस्तकात भरपूर मटेरियल होतं, आडात भरपूर आहे, पण पोहऱ्यात आलं नाही Lol

'लेखणी खूप टोकदार असते: आणि पडदा सपाट..'
वा . खूप आवडले. परीक्षण चांगले आहे आणि शक्य तितके तटस्थ राहून लिहिले आहे.

आता हे , अनुपमजी खेर , आता सोनिया , काँग्रेसविरोधी भाष्य करत रहातील , बहुतेक.>>>>

तो ते आधीपासूनच करतोय.

अनुपम खेर यांनी डॉ. सिंग यांचा मॅनरिझम बर्‍यापैकि इंटर्नलाय्ज केलेला आहे. तुमच्या मते नक्कि कुठे खिल्ली उडवलेली आहे? पुस्तकाचा युएसपी डॉ. सिंग यांचा "ए राइट मॅन इन ए राँग पार्टी" हा आहे; तर मग चित्रपटात वेगळं असं काय दाखवलेलं आहे?..

@राज - वरील मते ही मला वाटलीत म्हणून लिहिलीत. तुमच्या मतांचा आदर आहेच.

अनुपम खेर यांनी डॉ. सिंग यांचा मॅनरिझम बर्‍यापैकि इंटर्नलाय्ज केलेला आहे. तुमच्या मते नक्कि कुठे खिल्ली उडवलेली आहे? >>>>
राज माझ्या अल्पमतीप्रमाणे याच उत्तर देतो. आपण कॉमेडी शो बघतो, बरोबर? तिथे कुणीतरी अमिताभ बच्चनची मिमिक्री करताना 'हाय!' करत हात बाहेर काढून असतो, कायम! हा भडकपणा आपल्याला कॉमेडी शो म्हणून एन्जॉय करता येतो, अशा सिरीयस चित्रपटांमध्ये शारीरिक लकबी दाखवताना, समोरची व्यक्ती किती असहाय आहे, हे ठसवण्यासाठी, हे दाखविण्यासाठी हा भडकपणा अतिरंजित वाटतोच, पण अपमानास्पद वाटून संताप येतो!

पुस्तकाचा युएसपी डॉ. सिंग यांचा "ए राइट मॅन इन ए राँग पार्टी" हा आहे; तर मग चित्रपटात वेगळं असं काय दाखवलेलं आहे?..>>>>
मी परीक्षणात तमाम मुद्दे मांडलेत. तुम्हीही बघा! काही वेगळं लिहिलंत तर आनंदच आहे!

काय राव ... गेलाबाजार उरी तरी बघायचा! चांगलाय म्हणे तो.
बाकी परीक्षण उत्तम.
पॉलिटिकल पुस्तकांवर बेतलेलं पिच्चर कधी धड होऊ शकत नाही!!

उरी मस्त आहे. पुर्ण सिनेमा हॉल भरला होता. टाळ्या, शिट्या, भारतमाता की जय. भारी वाटलं. चिरफाड करायची म्हणून बघायला गेलो नव्हतो. त्यामुळे जास्त लिहीत नाही. But movie has good positive impact on my son. He want to join Army now Happy

उरी हा सर्वस्वी वेगळा युद्धपट आहे. त्याची पटकथा लष्करी अधिका-यांना विश्वासात घेऊन लिहीली होती आणि प्रत्यक्षात कारवाई देखील त्याबरहुकूम झाली असे म्हणतात. आजवरचा बॉर्डर हा सिनेमा सर्वोत्तम मानला गेला होता. मात्र या सिनेमात प्रधानमंत्री दाखवले नव्हते. उरी. परमाणु अशा चित्रपटांनी ती उणीव भरून काढली आणि परिपूर्ण युद्धपट काय असतो याचे दर्शन घडवले. मात्र प्रधानमंत्री स्वतः रिमोटच्या सहाय्याने विमान उडवत होते हा सीन सुरक्षेच्या कारणास्तव सिनेमातून काढून टाकण्यात आलेला आहे असे समजते.

शत्रू राष्ट्राला कांगावा करण्यास वाव मिळू नये यासाठी सर्जिकल स्ट्राईक कसा करायचा हे प्रधानसेवक स्वतः रात्र रातर जागून अधिका-यांना सांगत होते हे गुपीतच ठेवले गेले आहे. लष्करी अधिका-यांनी स्क्रीप्टनुसार नितीन देसाई स्टुडीओज मधे अनेक दिवस सराव केल्याने प्रत्यक्ष कारवाई अत्यंत सोपी गेली. काही देशद्रोही मात्र या मेहनतीवर शंका घेताना दिसतात. दुर्दैव देशाचे !

@mandard - हे भारिये. कधीकधी परीक्षण लिहायचं म्हणून चित्रपट बारकाईने बघितला जातो, पण एन्जॉय केला जात नाही.

Pages