प्रवास वर्णन पुणे ते शिर्डी

Submitted by s.mukund on 17 January, 2019 - 07:26

वर्ष २०१५ जानेवारी ०९ वेळ रात्री ११ वाजता भेटलो ते थंडीचे दिवस होते .व अचानक दुसर्‍या दिवशी शिर्डीला बाईक वर जायचे ठरले.त्यानुसार आम्ही सर्वजण ( ४ मित्र) १० तारखेला दुपारी १:३० मिनी.मोटारसायकलवर शिर्डीला जाण्यास सज्ज झालो व बाबांचे नाव घेऊन मोटारसायकल सुरु करुन आम्ही निघालो.जाताना रुबी हॉल (पुणे स्टेशन ) इथे नाष्टा करुन मग पुढे निघालो वाघोली नगर रोड मार्गे.मजल दर मजल करीत गप्पाटप्पा करित कधी आम्ही संध्या.५:०० ते ५:३० च्या सुमारास नगरमध्ये पोहचलो ते कळले पण नाही.मग नगरला चहापाण्यासाठी थांबुन आम्हीमग शनिशिंगणापुर मार्गे शिर्डीला जाण्याच नगरवरुन निघालो.शनिशिंगणापुरला संध्याकाळी ७:०० ते ७:३० च्या दरम्यान पोहचलो.पोहचल्यावर (स्वागत कमानी पासुनच ) एक आश्चर्य ते म्हणजे तेथील घरांना किंवा दुकांनाना दारे नाहीत म्हणजे ती उघडी असतात रात्रंदिवस. आम्ही याआधी नुसते ऐकले होते पण आज ते प्रत्यक्षात अनुभवले.त्यानंतर आम्ही एका पुजासाहित्य दुकानात पुजा साहित्य घेऊन मोटारसायकल दुकानासमोर लावुन शनिमहाराजांच्या दर्शनाला निघालो.मंदिरात पाऊल ठेवताच मन प्रसन्न वाटु लागले होते तिथले वातावरण बघुन.मग आम्ही जे शनिमहाराजांना वायला नारळ घेतले होते ते आम्ही तेथील नारळ ठेवण्याच्या जागी ठेवले.( नारळ फोडु दिले जात नाहीत) व जे तेल घेतले होते ते तिथे ठेवलेल्या कुंडात टाकले.व एक सोय अशी आहे की तुम्ही त्या कुंडात टाकलेले तेल बरोबर नळीने शनिमहाराजांच्या डोक्यावर पडते त्याचा अभिषेक होतो.कारण तुम्हाला प्रत्यक्ष शनिमहाराजांच्या चौथर्‍यावर जाता येत नाही म्हणुन ही सोय.शनिमहाराजांचे दर्शन झाल्यावर अगदी मन प्रसन्न झाले.तिथल्या दुकानदाराला विचारले की तुम्हाला भिती नाही वाटत तुम्ही दुकाने घर उघडी ठेवता.तेव्हा तो म्हणाला की आम्ही घाबरत नाही कारण इथे शनि महाराज आहेत ना मग भिती कशल.मग तिथुन प्रसाद म्हणुन खुप सुंदर लागणारी खोबर्‍याची वडी घेऊन गाडीला किक मारुन शिर्डीला जाण्यास निघालो साधारण ८ च्या सुमारास रात्री.मग गप्पा टप्पा करित कधी रस्ता चुकलो शिर्डीचा ते कळलेच नाही.मग एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला थांबल्यावर कळले की आम्ही खुप लांब आलो आहे.म्हणजे त्या पेट्रोलपंपापासुन नगर फक्त ३० मिनींटावर होते.व शिर्डी अजुन खुप लांब होती(अंदाजे २ तासांवर) मग त्या पेट्रोलपंपावर मार्ग विचारुन आम्ही निघालो शिर्डीला.(पेट्रोल संपले म्हणुन आम्हाला मार्ग विचारता आला नाही तर आम्ही पुन्हा नगर ला आलो असतो.पण बाबांची लिला अगाद आहे) पण ज्या रोडवरुन निघालो होतो.तो रोड अगदी निर्मनुष्य होता कारण त्या रोडवर दोन्ही बाजुला मोठमोठाली झाडे,शेती व व कमीत कमी जाणारी वाहने.थोडे त्या रोडवरुन पुढे घेल्यावर एका ठिकाणी हातचरक्यावर उसाचे रसगृह होते व काही लोक थंडीमुळे शेकोटीजवळ बसलेले दिसले.आम्ही तिथे रस पिण्यासाठी थांबलो व रसाचे ग्लास हातात घेऊन त्या शेकोटी जवळ उबेसाठी थांबलो असता त्या लोकांनी विचारले की तुम्ही कुठून आलात कुठे चालला आहात या थंडीच्या वातावरणात मोटासायकलवर.तर आम्ही सांगितले की शनिशिंगणापुरवरुन आलो आहे व शिर्डीला चाललो आहे बाबांच्या दर्शनाला.तेव्हा ते म्हणाले की तुम्ही शनिशिंगणापुरला निवास करायचा होता व सकाळी निघुन जायचे होते शिर्डीला.आम्ही विचारले की असे का म्हणत आहात तर ते म्हणाले की तुम्ही आला आहात तो रोड व तुम्ही जाणार आहात तो रोड अगदी निर्मनुष्य आहे.त्यारोडवर वाहने पण कमी जातात रात्रीच्यावेळी कारण त्यारोडवर लुटमारीचे प्रकार जास्ती होतात.पण आता आलास आहात तर लवकर निघा टाईमपास करत बसु नका.मग आम्ही त्यांचा निरोप घेऊन बाबांचे नाव घेऊन पुढे मार्गस्थ झालो.शेवटी तो निर्मनुष्य रस्ता सोडुन जेव्हा मुख्य रस्त्याला आलो तेव्हा बरे वाटले व मग जेव्हा आम्हाला शिर्डी नावाची पाटी दिसली तेव्हा खुपच आनंद झाला कारण आम्ही तेव्हा साईबाबांच्या नगरीत होतो.पण बाबांच्या कृप्रेने त्या निर्मनुष्य रस्त्यावर आम्हाला काही पण झाले नाही व सुखरुप रात्री १० वाजता शिर्डीनगरात पोहचलो.मग सुरु झाले निवास व्यवस्था शोधणे.भक्तनिवासात चौकशी केली तर तीपण फुल होती.मग एका मित्राला आठवले की त्याचा एक मित्र त्या शहरात रहातो व त्याचे पुजा साहित्य दुकान तिथे आहे.मग काय त्याला फोन लावुन त्याला आमची निवासाची अडचण सांगितली व त्याने ती सुटकीसरशी सोडवली.त्याच्या अोळखीने आम्हाला एका हॉटेलात एका रात्री पुरती रुम मिळाली. त्या रुमवर बॅगाटाकुन आम्ही मोर्चा खाण्याकडे वळवला होता कारण रस्ता चुकल्यामुळे व वाटेत जास्ती हॉटेल नसल्यामुळे पोटात कावळे अोरडायला लागले होते.मग पोटपुजा करुन रुमवर झोपायला गेलो कारण सकाळी ५:०० वाजता उठुन बाबांच्या दर्शनाला जायचे होते.म्हणतात ना ' याससाठी केला होता अठ्ठाहास '. पण आम्हाला रुमसुध्दा अगदी मंदिराजवळच मिळाली होती तेथुन बाबांची शेजारती काकड आरती सर्व कार्यक्रम स्पष्ट ऐकु येत होते.आम्ही सर्व जण खुप दमल्यामुळे कधी निद्रेच्या आहारी गेलो कळलेच नाही.पहाटे लवकर उठुन सर्व क्रियाक्रमे उरकुन एकदाचे आम्ही ज्यांच्यादर्शनासाठी आलो होतो त्या बाबांच्या दर्शनासाठी रांगेत पहाटे ५:३० उभे रायलो.साईनामाचा जप करीत कधी आम्ही बाबांच्या समाधी पुढे आलो ते कळलेच नाही.रांगेत असताना सुध्दा बाबांच्या नावाचा गजर व बाहेर सुध्दा पुजा साहित्य बाजारात पण सीडीवर बाबांच्यानावाचा गजर ' साईराम साई श्याम साई भगवान ' ही धुन ऐकु येत होती. त्यामुळे पुर्ण शिर्डीच साईमय झाली होती.मग रांगेत असताना आम्हाला संस्थानतर्फे बुंदीचा प्रसाद देण्यात आला होता.समाधीपुढे आल्यावर आम्ही नतमस्तक झालो तेव्हा खरच जीवन धन्य झाल्यासारखे वाटले.कारण कालपासुन मोटारसायकलवर मार्ग चुकून सुध्दा ज्यांनी आम्हाला दर्शनाचा मार्ग दाखवला त्यांचेच दर्शन घेताना धन्य वाटत होते.समाधीचे दर्शन घेऊन नंतर द्वारकामाई ,चावडी (जिथे बाबा बसुन भक्ताच्या शंकाचे निरसन करत )गुरुस्थान दर्शन करुन संग्रहालयात गेलो जिथे बाबांनी वापरलेल्या वस्तु जतन करुन ठेवल्या आहेत.उदा.बाबांची कफनी,ज्यात बाबा भक्तांसाठी खिचडी बनवायचे ते पातले.ई.आम्ही मंदिरातुन निघुन मग नाष्टा मिळतो तिथे आलो.संस्थानतर्फे अल्प दरात भाविकांसाठी चहा नाष्टा व्यवस्था आहे तिथे पुरी मटकीची उसळ व खोबरा वडी अशी नाष्टा व्यवस्था असते.व तो नाष्टा पोटभर झाल्यामुळे दिवसभर भुकच लागली नाही.सर्व दर्शन वैगेरे करुन प्रसाद घेऊन व ज्या मित्राने आम्हाला शिर्डीत मदत केली त्याची भेट घेऊन त्याचे आभार मानुन पुण्याच्या दिशेने प्रस्थान केले.व जाताना पुन्हा बाबांच्या समाधी मंदिरावरील कळसाचे दर्शन घेतले खरतर मनाची अवस्था अशी झाली होती की येथुन निघुच नये.इथच बाबांच्या सानिध्यातच रहावे.पण कायकरणार निघावे तर लागणारच होते.मग आम्ही राहुरी मार्गे पुण्याला येण्यास निघालो.येताना नगरचा सुप्रसिध्द खवा व चिवडा घेऊन आल्याशिवाय राहवलेच नाही.येताना वाटेत असे कळले की शिरुरपासुन काही अंतरावर घोडनदी तिरी एक पुरातन रामलिंग महादेवाचे स्वयंभु मंदिर आहे.मग वाट वाकडी करुन तिथे भेट देयला स्वारी निघाली.शांत वातावरण मन अगदी प्रसन्न होते दर्शन घेतल्यावर.गोंगाट नाही की कसला गोंधळ नाही एकदम शांत वातावरण होते मंदिरात.तेथुन दर्शन झाल्यावर पावले वळाली ती म्हणजे पुणे नगर रस्त्यावर असलेल्या रांजणगावातील महागणपतीचे दर्शन घेयला.आम्ही पोचलो ते महागणपतीच्या मंदिरात एकदम शांत वातावरण गर्दी कमी.त्यामुळे निवांत व मस्त दर्शन झाले.प्रसन्न मंगलमुर्तीचे देखणे स्वरुप पाहुन भान हरपुन गेले होते.कारण संकटनिवारण करणार्‍या गणेशामुळेच पुर्ण शिर्डी शनिशिंगणापुर सहल कोणत्याही संकटाशिवाय पुर्ण करुन गणेश दर्शनाला आलो होतो.गणेश मंदिरात थोड्यावेळ नामजप करुन कळसाचे दर्शन घेवुन कोणतेही संकट पुण्यापर्यंत परत जाताना येऊ नये व तुझी नामरुपीसेवा घडत राहो हिच विनंती गणेशचरणी करुन आम्ही सर्वजण परत निघालो.व सुखरुप बाबांच्या ,गणेशाच्या , शनिदेवाच्या कृपेने कोणतेही विघ्न न येता रात्री ८ वाजेपर्यंत मनात सर्व आठवणी साठवत पुण्यात परत आलो. कारण बाबांनी सांगितले आहेस की ' तु निश्चींत जा मी पाठीशी आहे '© S.Mukund

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

अशुद्धलेखनांनी भरलेले वरिल प्रवास वर्णन वाचायचा बराच प्रयत्न केला, तरिही ते वाचायला जमले नाही. ते एक जाऊदे. मात्र धागा "गुलमोहर - प्रकाशचित्रण" या विभागात असूनही लेखात एकही फोटो नाही ? की मला दिसत नाहीत फोटो?