माझी मुन्नी

Submitted by रिंकी on 16 January, 2019 - 02:14

मैत्री ची भाषा....
   चार दिवस झाले येवुन त्या लोकांना पन नेमकं किती नी कोन-कोन ऱाहतात त्यांच्या घरात काय माहीत, ईतकी उत्सुकता आणि हुरहुर लागली आहे जाणुन घ्यायची की आहेत तरी कोन? काही समेजेना बाबा चार चकरा झाल्या यार त्यांच्या दारापासुन पन! अजुन दार काही उघड़ना...... रोज कॉलेज वरुण आले की एक तिरकी नजर टाकते मी पन आज मनाशी निश्चितच केलं होत.. काहीही झालं तरी आज स्वताच जावुन त्यांच्या दाराची कडी वाजवनारच मग ओरडा भेटला तरी चालेल... मग काय ठरवल्या प्रमाने घरी येवुन कॉलेजच्याच कपड्यावर त्यांच्या दारावर जावुन उभी राहीले कडी वाजवायची हिम्मत काही व्हायना म्हनुन मागारी फिरन्याचा निर्णय घेतच होते! तेवढ्यात आतल्या कडीचा आवाज आला... बस मग माझ्या प्रश्नावली चेह-यावरचा आनंद जसा गगनात मावेनासा झाला होता जनु काय चार दिवसाच्या 'वेटिंग' परिश्रमा नंतर 100% पैकी 200% मार्क मिळाले आणि तेही काही न करता... ईतका आनंदमय क्षण होता की दार उघडुन 'एक सुंदर, सावळ्या रंगाची,थोडी हसरी नी मायेने भरलेल्या नजरा घेवुन माझं स्वागत करायलाच उभी होती'...... ''हाय'' हळवा आवाज माझ्या कानावर पडला नी मी वेडी तीला आपलं समजुन तिला ओरडले 'काय ग ताई किती दिवस झाले येवुन तुम्हाला .. दार का बंद ठेवता तुम्ही.. पडदा लावायचा की दार बंद का ठेवलं होत'' पुन्हा तिचा हळवा आवाज हळु दाबाने 'अग हो हो किती प्रश्न विचारतेस! जा आधी यूनिफॉर्म चेंज करुन ये '  आणि मग काय मी पन तिला ' हो थांब आत्ता लगेच आले!  दार नको लावु हं ...लगेच येते मी '...
मग काय ज्या स्पीड ने मी माझ्या घराकडे पळाले जनु सोन्याचं दुकान लुटायला जायचंय... विस पावलांच ते अंतर मी दहा पावलात कसं संपवल हे मलाही कळले नाही..... घरी येवुन पटकन युनिफॉर्म चेंज केला... गळ्यात लटकलेली केस हाताने कशीतरी गुंडाळुन वर दुमडली, क्लचर लावला नी त्याच वेगाने तिच्या घराकडे धावले.... 'ये बस ' तिचा तो हसरा, सोज्वळ चेहरा पाहुन त्यांच्या दाराच्या उंबरठ्यावरच बसले.. ' हाय जेवलीस का ग ' पुन्हा तिने हळव्या आवाजात विचारले..... 'हो पोळी-भाजी खाल्ली होती कॉलेज मध्ये ' म्हनत मांडी घालुन अशी बसले जशी ति मला आता पुराण वाचुन सांगनार आणि मी वेड्या भक्तासारखी ऐकनार होते..... 'का ग ताई एकटीच असते का तु ..अजुन कोन ऱाहतं तुझ्यासोबत ' 'किती मानसं आहेत तुमच्या घरात.... '
अलगद हसली ति 'अगं आम्ही तिगच आहोत.. आई आहे किचन मध्ये आणि लहान भाऊ आहे कामाला गेला आहे तो '  .. संध्याकाळी येईल तो ' ...'अच्छा' म्हनत मी पुन्हा एक प्रश्न विचारनार होते तोच ... तिने विचारलं 'चार दिवस झाले तु रोज दारावरुन चक्कर टाकत होतीस म्हनुन म्हटलं चला आपनच बोलावं हिच्याशी. ..बरं वाटेल हिला तुझ्या चेह-यावरचा आनंद पाहुन मला माझा विचार पटला '..बस मग काय होत! तिचं हे बोलन ऐकुन मी मनसोक्त हसले आणि तिही माझ्यासोबत मनमोकळ हसली.....
आता माझ्या वयाची (थोडीशी मोठ्ठी) एक समजुन घेनारी आणि समजुव सांगनारी  मैत्रीन मिळाली होती.... मग रोज कॉलेज वरुन आल्यावर तिच्या दारात बसायच आणि मनसोक्त गप्पा मारायच्या... हळुहळु मी तिला ताईच्या ऐवजी तिच्या नावाने हाक मारु लागले होते... तसा तो आग्रह तिनेच केला होता... ....आणि संभाषनात हे मलाही सोप्प वाटु लागल होत.... 'तु कुठे जॉबला जातेस 'मुन्नी ' ...हो तिला मी 'मुन्नी' म्हन्त होते.... तस तिचं खर नाव ' म्रुणाल ' होत ...पन मुन्नी म्हन अस तिनेच सांगीतल मला.. 'मी एका कंपनीत अकांउटींग चा जॉब करते ' ...आणि 'मनु' (मनु म्हनजे ' मनोज' हे तिच्या भावाचं नाव ) काय करतो ' ....'अगं तो परफ्युम सेल्स करतो ' ...मार्केटिंग करतो.. '  ...
'तुम्ही तिघेच आहात का... आणि तुझ्या बाबांना जावुन किती दिवस झाले '..............ति जरा गप्प झाली.. पन मी मात्र विचारात पडले.. की हा वायफट प्रश्न विचारून मी तिला दुखावले असावे कदाचित्... 'अगं हार्ट-अट्याक आला होता त्यांना..
'बाबा एका नामांकित कंपनी मध्ये जॉबला होते.. आमचं स्वताच घर होत आमचे बाबा आम्हाला फिरायला-वगैरे घेवुन जायचे... पन म्हनतात ना अकाल मृत्यु कधी कोनाला येईल सांगता येत नाही.. आणि तसच झालं बाबाच्या आजारपनात जमवलेले खर्च आणि ताईच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज ,फेडता -फेडता कधी हक्काच घर गमावुन बसलो कळलेच नाही'..... ति बोलताना एक प्रश्न आला मनात.... पन विचारल नाही मी.... म्हटलं तीच बोलनं संपल की विचारेल तिला... ...पन तिनेच सागितलं की 'आम्ही तिघे आहोत म्हनजे माझ्यापेक्शाही मोठी एक ताई आहे... तिचं लग्न झालं ति मुंबई ला असते.... तिला एक मुलगी ही आहे... आम्ही लाडाने चिअु  म्हनतो तिला... ''...बाबा गेल्यावर ताईच लगेच लग्न ठरवलं होत... दाजी समजदार होते त्यानी ताईला पाहुन होकार कळवताच तीन महीन्यात लग्न उरका'....असे आग्रह केले होते '.....
मग मामानी तारीख़ ठरवली आणि पुठाकार घेवुन कन्यादान त्यांनिच करुन दिल...... 'ताईच लग्न झाल्यावर आम्ही जुन्या घरी परतलोच नाही.... मामानी त्यांच्या ओळखीच्या मानसांना विचारुन आधीच आम्हा तिघांची राहन्याची सोय केली होती... मनु लहान होता म्हनुन त्याने मलाच जबाबदारीच्या पायरीवर उभे केले होते... ' आणि मला ही त्या पायरीची जानिव करुन देली होती.. '...मग मामाने पाहुन दिलेल्या घरी राहने हळुहळु कठिन जावु लागले '...'त्या घरच्या मालकाने 'भाडे वाढवुन दया ' अशी घोषणा केली ......मग काय मनु आणि मी घर शोधायच्या तैयारीला लागलो.. ''.. माझ्या कंपनीमध्ये 'सुमनताई ' आहेत '...त्यांनी हे घर पाहीले आमच्यासाठी ''....''मुन्नी ए मुन्नी '' तिच्या आईने आवाज दिला तिनेही बोलने थांबवुन... 'चल जरा तु पन आभ्यासिका घेवुन बस... '' ..
'मी येते नंतर टिव्ही पाहायला' मग मीही उठले नी घरी आले...
एके रविवारी त्यांनच्या घरी पाहुने आले होते... तब्बल 3महिन्याने....कोनीतरी आल होत त्यांनच्या घरी... 45 मिनट बसुन हे पाहुने हसत हसत निघुन गेले होते..... आणि त्या दिवशी माझी नी मुन्नी ची भेटच झाली न्हवती.. आज ति टिव्ही पाहायला नाही आली... मला अभ्यास होता म्हनुन मी पन तिला आज हाक दिली न्हवती... दुस्यादिवशी ति माझी वाट पाहत उंबर्यावर बसली होती... तिने मला लांबुनच येताना पाहीले होते... एकदम खुश झाली होती ती.... 'ऐकना चेंज करुन लगेच ये ' हलक्या आवाजात म्हनाली मी ही होकार्थी मान हलवली नी तिच्या दारात जावुन बसले.. तिने दोन चहाचे कप घेवुन 'अगं घरात ये ना ' म्हनत टेबलावर चहाचा कप ठेवला आणि उपीट आनायला किचन मध्ये गेली... 'अग काय विशेष आज माझ्यासाठी चहा, उपीट... काय बात है यार...... ''म्हनत मी आधी गरमागरम उपीट घेतला... एक घास तोंडात टाकताच ति म्हनाली 'काल पाहुने आलते मला पाहायला मामा घेवुन आले होते.... '  .माझा घास तोंडातच अडकला.... एकटक तिच्याकडे पाहत 'कधी?  ते काल चौघे जन आलते ते का'...... 'हम्म ' तिने हस-या आवाजात हा हुंदका दिला..... मी गप झाले कसा-बसा चहा संपवुन मी घरी आले... ति नेहमी प्रमाने रात्रि टिव्ही पाहायला आली  ..मी काही जास्त न बोलता.. तिचा हात धरला नी आमच्या घरच्या ओट्यावर तिला घेवुन आले.... तिही काही न बोलता माझ्याबरोबर येवुन बसली... 'बोल ' तिने असे बोलताच मी ईतक्या घट्ट मिठी मारली नी रडायला लागले..... खुप रडले.. जनि माझा जगन्याचा हेतु तिच होती... 'संध्याकाळी असं ऱडु नये वेडाबाई.... '.. असे म्हनत तिने माझे डोळे पुसले.... तिला हे सगळ आधीच माहीत होत कदाचित्.. म्हनुन ति रडली नाही.. पन तिलाही दुःख झाल होत हे तिने मला दाखवुन दिले नाही........ का कुणास ठाऊक अवघ्या तीन -चार महिन्यातली आमची ओळख कधी घट्ट मैत्रीत बदलले हे कळलेच नाही.....
ति मला ईतक्या खोलवर समजुन घेत होती.. हे ति माझ्या पासुन दुर जाताक्षणी समजु लागले होते कदाचित् ....तिने मला सुरवातीच्या भेटीतच ओळखले होते कदाचित्.... म्हनुन ति नेहमी माझ्या प्रश्न विचारायच्या आधीच माझ्या मनाला समाधान होईल असे उत्तर देत असे .....
आज मी तिच्या सोबत तिच्या जवळच्या काकांकडे गेलो होतो.. दुपारचे जेवन करुन मी तिला काकांनकडे सोडुन घरी परतली होती.... ति तिच्या काकांनकडे चार दिवस मुक्क्मी जानार होती..... आणि तिथुनच ति मुंबई ला जानार होती..
तिच्या लग्नाची जबाबदारी तिच्या ताई-दाजींनी घेतली होती... तिला मुंबई ला जायला वेळ होता अजुन एक दिवस.. म्हनुन मी तिला शेवटची भेटायला तिच्या काकांनकडे गेली... डोर बेल वाजवताच काकुने दार उघडले नी हसत म्हनाली 'ये ये बाय माझी ती '' बस हो मी पानी आनते तुझ्यासाठी... काय घेते चहा बनवु का ग बाय... ' अस म्हनत त्या आत गेल्या मी सोफ्यावर बसताच मला समोर दिसनारा पसार... म्हनजे दोन तिन ब्यागा आणि नविन भांड्यानच चित्र असानार बॉक्स दिसले.. मी दुर्लश करुन विचारले 'काकु मुन्नी कुठे आहे, बाहेर गेलीका, किती वेळाने येईल ती.'.. ..
त्या पान्याचा ग्लास घेवुन आल्या 'ति गेली ना ''..मी पानी न घेताच उठुव उभी राहीले.. 'गेली कुठे गेली ति... ''   'मुंबई ला गेली ग बाय उदया लग्न आहे ना तिचं... आज हळद आहे... मग ति कालच गगेली मुंबई ला'' हा तिचा आहेराचा पसारा आहे.. आम्ही पन संध्याकाळी निघनार आता लग्नाला.... '
काकुचे हे बोलने मला काही समजलेच नाही... मी हसु कि रडु मला समजेनाच मी नेमक काय विचार करत होती हे मला माझच सावरेना.... पान्याच्या ग्लासासोबत माझी एक जुनी वही होती कॉलेज फन ची ती 'मुन्नी कडे होती तिने जाताना देवुन गेली होती.. तिला माहीत होत तु येनार म्हनुन '' असे म्हनत काकुने मला दिली ती वही... मी अस्वस्थ झाले होते., निराश झाले होते..... कशातच माझ लक्ष लागेना.. 'येते काकु ''म्हनुन मी ती वही घेतली नी माझी सायकल घेवुन निघाले .....

घरी आले एकांती बसुन खुप रडले... राग पन येत होता तिचा आणि रडुही येत होत खुप... पन आज डोळे पुसायला तिचे मायेचे हात नह्वते.... आज  समजुन सांगनारं जवळ कोनी नह्वत.... मन शांत करुन बसले ......मग ती वही आठवली... चटकन उठले पळत जावुन वही आनली.. त्याचे पानं चाळले.. कुठेतरी तिने माझ्यासाठी नंबर सोडला असेल किंवा ताईच्या घरचा नंबर ठेवला असेल.... पन अस काहीही झाल न्हवत.... पान चाळताना शेवटच्या दोन पैनाना माझ नावाची चिट्ठी दिसली... ति मुन्नी ने लिहीली होती माझ्यासाठी... त्यात आम्ही एकमेकींबरोबर घालवलेला चार महीन्याचा आमचा सोबत घालवलेला वेळ तिने क्रमाक्रमाने रचला होता..... वाचुन मन गहीवरले होते... तिने मला इतक्या बारकाईने कधी समजुन घेतले हे मला समजलच नाही......
कॉलेजला मी होते पन तिने माझा अभ्यास केला होता मला पुर्णपने वाचुन मला स्वताची नविन ओळख तिने करुन दिली होती.... ''मैत्रीची भाषा पहिल्यांदा तिनेच शिकवली होती आणि निभवलीही तिनेच होती''...........

ति गेल्यावर चार दिवसांनी तिच्या आईनेही हे घर सोडले होते .. माझी  बोर्डाची परीक्षा होती म्हुनन मला कळले नाही की कोन चाळीत यायचे नी जायचे... त्यात वेळेनेही साथ दिली नाही.... कधी ति न तिच्या घरचे माझ्यापासुन दुर गेले कळलेच  नाही.... अता मी पन तिला शोधत नाही... पन तिची कमी आयुष्यात नेहमी खलनार......
एक नक्की.. तिही मला विसनार नाही....... ति ही स्वताला विसरु देनार नाही...... माझी मुन्नी

#रिंकी कुलकर्णी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users