धाबा स्टाईल चिकन

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2019 - 05:40

नेहमीच पारंपारीक चिकनपासून थोड वेगळ काहीतरी करू म्हणून आंतरजालावर चिकनच्या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा धाबा स्टाईल चिकन ची रेसिपी दिसली. मुळ रेसिपीत मला पटले ते बदल करून खालील रेसिपी केली आहे.

साहित्यः
१ किलो चिकन
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ मोठे चमचे
पाव वाटी दही
२ मोठे कांदे चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचून
हिंग पाव चमचा
हळद १ चमचा
२ -३ टोमॅटो मिस्करमध्ये फिरवून
२-३ मध्यम बटाटे मोठ्या फोडी करुन
लाल तिखट किंवा रोजच्या वापरातला मसाला ४-५ चमचे किंवा आपल्या आवडी नुसार
पाव वाटी बेसन (तव्यावर खमंग भाजून)
१ चमचा गरम मसाला
१ चमचा धणे पावडर
खडा मसाला ल३-४ दालचिनीचे तुकडे, ४-५ लवंगा, ७-८ काळी मिरी, १ मोठी वेलची (बडी वेलची किंवा काळी वेलची), १ जायपत्री, तमालपत्र ३-४
चविनुसार मिठ
फोडणीसाठी तेल

१)

२)

चिकनला आल, लसुण,मिरची कोथिंबीरची केलेली पेस्ट, दही आणि हिंग हळद चोळून ठेवा.
३)

भांड्यात तेल गरम करुन त्यावर लसुण फोडणीला देऊन, खडा मसाला घाला व कांदा घालून त्याला गुलाबी रंग येई पर्यंत परता. आता ह्यात टोमॅटोची प्युरी घाला आणि ढवळून घ्या.
४)

हिंग, हळद, मसाला, भाजलेल बेसन हे सगळ भांड्यातील मिश्रणावर टाका. व चांगले परतून घ्या.
५)

आता ह्यावर चिकन व बटाट्याच्या फोडी घाला आणि गरजेनुसार पाणी घालून शिजत ठेवा. बटाट्याच्या फोडी शिजल्या की चिकनही शिजत. चिकन शिजल की त्यात मिठ, धणा पावडर व गरम मसाला टाका आणि परतून पुन्हा एक वाफ येऊद्या.
६)

वरून थोडी कोथिंबीर पसरा. तर अशा प्रकारे तयार झाले धाबा स्टाईल चिकन.
७)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रश्न पडलाय ―
बटाटे का घातले आहेत ?
त्यांच्या ऑसमोसिस गुणधर्म / क्षमतेंमुळे रस्सामधील टेस्ट कमी होण्याची शक्यता असेल ना !
हे घडू नए म्हणून उपाय काय करतात ?

मस्तच दिसतंय.

मी बटाटे घालावेत की नाही या संभ्रमात आहे.

साधनातै बटाट्याने चवित फारसा फरक पडत नाही पण मसाल्यांच्या चवी वेगळ्या पध्दतीने मिळून येतात. रश्यातला बटाटाही सुरेख लागतो. एकदा बटाटा टाकून करुन पहा व मग हवं तर नंतर वगळा. बिर्याणीमधे तर बटाटा मस्ट. चकत्या करुन तळाशी लावा दम लावताना आणि दोन छोटे बटाटे मसाल्यात टाका टोचे मारून.

फायनल प्रॉडक्ट सुपर दिसतंय Happy
माझ्यामते बटाटा सगळा रस मिळून येण्याकरता असेल, बहुधा बंगाली प्रकारच्या रश्यात असा बटाटा घालतात

बटाटे का घातले आहेत ?
<<
नॉनव्हेजमधे पिसेस सारख्या बटाट्यांच्या फोडी घालणे हे काही घरातल्या स्वयंपाकाचे व्यवच्छेदक लक्षण असते. बेंचमार्क. त्याशिवाय चिकन, मटण पूर्ण होत नाही. माश्यात मात्र बटाटे येत नाहीत अन्लेस भुजणे केले जाणारे. या बटाट्याने जेवण खरेच खुलते. वेगळी चव येते. तुम्हाला नको असेल तर बटाटा नाही घातल्याने काय कुणाचं घोडं मरत नाही, फक्त "बटाटा शिजतो तितक्या वेळातच चिकनही शिजते" हा अंदाज येणार नाही, अन चिकन शिजायची वेळ आपली आपण "टायट्रेट" करायला लागेल इतकेच.

रच्याकने,
आमचे काही शुद्ध मांसाहारी मित्र बिर्याणीत वा मटणात बटाटा दिसला तर प्रच्छन्न गालिप्रदान करतात ही बाब अलाहिदा. Wink

धन्स आरारा
एक्चुली अस्मादिकही त्या प्रतिसादातील शेवटच्या पैरामध्ये येतात Wink

जागू
अशा प्रकारे तयार झाले धाबा स्टाईल मटण.>>> इथे चिकन हवंय.>> हा बदल केला आहे.

रश्मी, मिरा, आसा, जाई, सोनालिसा, मैत्रेयी, स्वाती, टिना, शुम्पी, वर्षा, अंजली, असुफ धन्यवाद.

डुडायडू रश्यात काहीच चव बदलत नाही. पण रश्याची चव बटाट्यात मुरते त्यामुळे तो बटाटा टेस्टी लागतो.

साधना तू माझ्याकडे खाल्लयस की ग मटण त्यात बटाटे होते. कारण आमच्याकडे बटाटे असतातच चिकन, मटण मधे.

शालीदा मी पण बिर्याणीत घालते बटाटे.

योकू रस मिळून येण्यासाठी बेसन वापरल आहे. धन्यवाद.

माश्यात मात्र बटाटे येत नाहीत अन्लेस भुजणे केले जाणारे
आरारा बरोबर आहे. पण कोलंबी आणि घोळीच्या रश्यात बटाटे, शेवग्याच्या शेंगा, घालतात. कोलंबीत सुरण आणि शेवग्याच्या शेंगा अप्रतिम लागतात.

अ‍ॅडमिन बदल केल्याबद्दल धन्यवाद.

हां !
एकदा मित्राकडे कोलंबी कालवण खाल्लेले त्यात शेवगा बटाटे होते आणि छान लागली चव.

रश्यात काहीच चव बदलत नाही. पण रश्याची चव बटाट्यात मुरते त्यामुळे तो बटाटा टेस्टी लागतो. >>>> हे मात्र अगदी खरं. आम्ही कायम बोहरी मुस्लिम बिर्याणी ऑर्डर करतो, त्यामध्ये बटाटे असतात. आमच्याकडे सगळेजण ते बटाटे वेचून खातात. रादर त्या बटाट्याची शोधाशोध करून आधी मटकवण्यासाठी बिर्याणीचे लेअर्स बिघडवून टाकतात.

कोलंबीत अजून भोपळा, वांग, दूधी, टोमॅटो, नवअलकोलही घालता येतात पण ते एवढे टेस्टी लागत नाही. पण बटाटा किंवा सुरण छान लागतात.

मीरा यापुढे त्यांना बटाट्याचा लेयर वरच ठेवायला सांग. Lol

Pages