नव्याने जगण्यासाठी उमेद 2

Submitted by रिंकी on 14 January, 2019 - 04:03

                 आयुष्यात संधी उपलब्ध करून देणारे क्षण भरपुर असतात पण त्या मिळालेल्या संधीचे सोने करणे हे खरंतर स्वताःच्या अस्तित्वाला एक चॅलेंज असतं. आणि मी स्वतंत्रपणे जगणारी मद-मस्त आयुष्याची डोर ओढणारी स्वच्छंदी नार झाले होते. खरंतर तुझ्यासोबत राहून स्वतःसाठी स्वार्थ कसा निवडायचा हे खुप छान शिकले होते. नशेत बेभान होऊन जसा तु वेडावाकडा बागडायचासना तेव्हा तुझ्या वागण्याचा त्रास मी स्वतः करुण घेतला  .पण बंधन बाधलेलं होतं ना तेव्हा .तुझ्या वागण्याचा त्रास मनामध्ये विस्तवातुन काढलेल्या सळीसारखा बोचत असायचा. कै एकवेळा मन मोकळं करायचा प्रयत्न केला पण!.हा पण नेमकं आडवा यायचा. कदाचित तु बांधिल ठेवलं होतस म्हणून.
         ' ऋणानुबंध जोडले गेलेच नाही. म्हणून तु तुझा राहीला आणि मी माझीही होवु शकले नाही'.
                 आज अचानक भुतकाळ असा समोर येवून वर्तमानकाची चापट देवून जाईल ही कल्पना मात्र ही मी करू शकले नव्हते. हा कॉफीचा एक कप माझं विसरलं गेलेलं भुतकाळ तो एखाद्या वादळाप्रमाने आला आणि आवर्जून आठवणींचा पसारा मांडून बसला. त्यावेळी तु केलेला पसारा मला एकटीला आवरावा लागत होता. आत्ता त्या पसार्यासमोर आजचा आठवणींचा पसारा कांहीच मोल धरत नाही.
        त्यावेळी तुला सोडुन जाण्याचा विचार योग्यच होता  मला आज स्वताःच्या अस्तित्वाला जगवल्यासारख वाटत होतं. पुन्हा एकदा नव्याने जगण्यासाठी कारण मिळालं होतं. तुझी कमी जाणवणार नाही पण आयुष्य येणार्या दुसर्या पुरूषाला मी कदाचित लवकर अक्सेप्टे करू शकणार नाही. ...कधी कधी एक वादळ येतो आणि भला मोठ्ठा पसारा मांडून काही क्षणातच नाहीसा होतो मग तो पसारा कोणाच्या असण्याचा असो. किंवा कोणाच्या नसण्याचा...

   काश तु त्यावेळी मांडलेला आयुष्यात पसारा निस्तारायला आला असता तर आज मी ही कॉफी तुझ्या सोबत आवडीने शेअर केली असती.

#रिंकी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users