नव्याने जगण्यासाठी उमेद 1

Submitted by रिंकी on 14 January, 2019 - 04:01

'एक कप कॉफी आयुष्यासोबत'.....भाग 1

त्या दिवशी तो एकटा नव्हता. भेटायचं ठरलं होतं तर एकट यावं लागेल अशी अट घालणे ही त्याची जिद्द.मग मी ही माझा ईगो घेवून चालणार! मी तरी का एकट यावं मग .तु चुकलं की चुक दाखवून देत होतास ना मग तु केलेली चुक मुळात चुकच नसते . अस मी का ग्राह्य धरायचं. कुठेतरी कधी तरी असा वागशील हे मी बाधित धरलं नव्हतं. असो पण आता मात्र या सगळ्यांच्या तुलनेत मी एक्झिस्टच नाही करत ,याचा मला अभिमान आहे. तस म्हणण्यापेक्षा मी माझ्या स्वाभिमानाला नव्याने  भेट दिली अस ग्रहित धरायला हरकत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संधी शोधून मला पर्सनलि शब्दांची जी काही भेट तु दिली होती ती मी आनखीण सहन करू शकत नाही आणि मला आवडनारही नव्हत.लपून छपून बोलनं, काहीतरी नवीन काही तरी वेगळं घेवून येणं,न सांगता खर्च करणं, लेट नाईट बाहेर राहन या सगळ्यांच्या मला राग नव्हता पण चिड चिड होत होती.तु स्वतःला  माझ्या प्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करत होता आणि मला तु जसा आहेस तसाच हवा होतास.कसं समजत नाही तुला आयुष्यातले सगळे  गणित सहज सुटत नसतात.काही गणित सोडवावी तितकीच किचकट होत जातात. गुदमरून जगणं याला आयुष्य म्हनत नाहीत.आणि हे कळायला तुला खुपच उशीर झाला होता. माझा याठिकाणी दोघांचा प्रवास थांबवून एकट्याने पुढे जाण्याचा प्रयत्न.....यशस्वी झाला.
           पार्टी करून तु एकटा घरी परतला नाहीस तर ऑफिस मधून येताना पैसे देऊन मुलगी घरी आणणे, इथपर्यंत गेलेल्या तुझ्या मजलेला आवर घालणे हे आता माझ्यासाठी अवघड होतं...म्हणून स्वतःला स्वंतत्र मिळवून देण्यासाठी आपल्यालाच संघर्ष करावा लागणार हे लक्षात आलं आणि आवर्जून मी ते केलं.या मोकळ्या हवेतला श्वास मला स्वच्छ वाटला. खुप हवाहवासा वाटला. नव्याने जगण्यासाठी उमेद निर्माण झाली. नवीन काही तरी वेगळं करून दाखवण्याची संधी मी मिळवली.

क्रमशः

      #रिंकी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users