नाहीच कळलं....

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 9 January, 2019 - 12:38

नाहीच कळलं....

तुझ्या असण्यातून,
नसण्यातून,
वागण्यातून,
बोलण्यातून,
हसण्यातून,
चिडण्यातून,
उगाचच कशावरही रुसण्यातून,
नाहीच कळलं...

तुझ्या अर्थावरून,
निरर्थावरून ,
समजावण्यावरून,
समज देण्यावरून,
नाहीच कळलं...

तुझ्या
अवेळी येण्यावरून,
न सांगता जाण्यावरून,
मनासारखं होईपर्यंत केलेल्या हट्टावरून,
मनाविरुद्ध झालेलंही स्वीकारण्यावरून,
नाहीच कळलं..

तुझ्या
गोड गळ्यावरून,
हसल्यावर लालेलाल होणाऱ्या गालांवरून,
आणि शेवटच्या दिवशी बस निघताना भरलेल्या दोन्ही डोळ्यांवरून
नाहीच कळलं...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users