महाराष्ट्राचे किल्ले -महाल वाईट परिस्थितीत कां?

Submitted by kokatay on 8 January, 2019 - 11:53

shanivar vada.jpgभारताच्या ट्रीप वरून कालच परतले, ह्या वेळेस राजस्थान ह्या प्रदेशाची फेरी मारली, पुष्कळ वर्ष पूर्वी कॉलेज मध्ये असताना गेले होते. राजस्थान चे मोठ-मोठे किल्ले, महाल आणि वैभव बघुन तेव्हा पण हा प्रश्न डोक्यात आला होता आणि आता परत तोच प्रश्न घेऊन परतले ... इकडे यायच्या आधी पुण्याची एक दिवसाची फेरी मारली आणि शनिवार वाडा बघायला गेलो, तिकडे आत गेल्यावर काहीच शिल्लक नाही असं लक्षात आल्यावर नकळत मन दुखावलं गेलं, आपला इतिहास आणि सांस्कृतिक धरोहर कुठेही कमी लेखण्या सारखी नाही मग आपले किल्ले आणि महाल इतक्या वाईट परिस्थितीत कशे? तुमचं काय मत आहे?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी साम्राज्य हे सगळ्यात शेवटी लयाला गेलं, तो पर्यंत सतत लढत होतं, इंग्रजांनी मराठे ज्याच्या बळावर लढू शकतात अश्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात नष्ट केल्या, आणि त्यात गड किल्ले हे पहिले होते. तसेच आधी मुघल काळात सुद्धा मराठी मुलखात बऱ्यापैकी नुकसान केले गेले, अर्थात त्यात गड किल्ले शाबूत होते पण देवळे आणि अजून काही गोष्टींची वाट लावली गेली.
ह्याच्या अगदी उलट महाराणा प्रतापांच्या नंतर राजस्थान, मेवाड, मारवाड ह्या प्रांतातून विरोधात लढण्यापेक्षा मंडलिक होऊन लढणे जास्त संयुक्तिक समजले गेले, त्यामुळे प्रत्यक्ष त्या भूमीत लढाई खूप जास्त झाली नाही, आणि बांधकामे सुरक्षित राहिली.. आणि इंग्रजांनी पण मग त्या वास्तू पाडायचा फार काही प्रयत्न केला नाही.
महाराष्ट्रातले गड किल्ले तर सगळ्यात जास्त धोकादायक होते इंग्रजी राजवटी साठी, कारण तसा पूर्वानुभवच होता.

१. अनेक किल्ल्यांमधे अनधिकृत धार्मीक स्थळे बांधलेली आहेत. किल्ला वापरात असताना किंवा त्याहीपुर्वी ती तिथे नव्हती. शनिवारवाड्याचा नेहमी मुख्य दरवाज्याचा फोटो दाखवतात व आपणही तोच फोटो काढतो. तिथे प्रत्यक्ष जाऊन दरवाज्याचा डाव्याबाजुला अनधिकृत बांधकाम आहे ते बघा. ते फोटोत येत नाही.
२. अनेक असे किल्ले जे मराठेशाहीतले महत्वाचे / प्रसिद्ध नाहीत, तिथे स्थानीकांनी बळजबरी अनधिकृत प्रवेश शुल्क आकारायला सुरु केले आहे. जोडीने आलेल्या कॉलेजवयीन "पर्यटकांसाठी" वेगळे शुल्क असते!
३. अनेक आडबाजुच्या अप्रसिद्ध किल्यांच्या परिसराचा वापर व्यवसाय/शेती/राहण्यासाठी केला जातोय.

ईंग्रजांनी बरेच किल्ले उद्ध्वस्त केले तरी, आपण तिथे देखावासारखे काही उभारुन प्रतिकृती करु तयार शकतो ना.
याबाबतीत संबंधीत सरकारी खात्याशी पत्रव्यवहार करुन त्यांची काही मदत होते का बघायला हवे.

ईंग्रजांनी बरेच किल्ले उद्ध्वस्त केले तरी, आपण तिथे देखावासारखे काही उभारुन प्रतिकृती करु तयार शकतो ना.>>>>

कृपया असे काहीही करू नका. अनेक देवळांना, तिथल्या शिल्पाना व मूर्तींना ऑइलपेंट फासून त्याचे सुंदरीकरण झालेय तितके बस झाले. आता किल्ल्यांचे विद्रुपीकरण नको.

आपल्याकडे या बाबतीत वास्तूचे भौगोलिक व ऐतिहासिक महत्व कोणीही ध्यानात घेत नाही. डोळ्यात खुपणारे ठिगळ लावायचे काम होते फक्त.

इतिहास डोकवाल तर लक्षात येईल की शनिवार वाडा येथील वैतागलेल्या जनतेनेच पेटवुन दिला.

उर्वरीत किल्ले, महाल, छत्रपति घराण्यातील थोर व्यक्तिंच्या समाध्या सुद्धा येथील कावेबाज समाजाने लुटुन मराठेशाहिचे नामोनिशाण मिटुन खोटा इतिहास गळी उतरावा म्हणुन नेस्तनाबुत केल्या.

छ. शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षीत समाधीचे जतन व्हावे म्हणुन पुण्याच्या मंडई परिसरातील व्यापार्‍यांकडुन १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात काही चाणाक्ष लोकांनी लाखो रुपये गोळा केले व नंतर ते लंपास केले हा इतिहास आहे. ती समाधी नंतर एका थोर शिक्षण-समाजसुधारकाने स्वत: जाउन साफ-सुफ केली तर चाणाक्ष समाजातील लोकांनी त्या आयत्या स्वच्छ केलेल्या समाधीपुढे उंच चबुतरा बांधुन त्यावर कुत्र्याचा पुतळा बसवला हाही इतिहासच आहे.

एकंदर काय तर आपलेच स्वराज्य डुबवणारे सुरनिस अनाजी दत्तो, सोमाजी दत्तोचे वंशज त्याकाळीही होते आणि आजही आहेत.

छ. शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षीत समाधीचे जतन व्हावे म्हणुन पुण्याच्या मंडई परिसरातील व्यापार्‍यांकडुन १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात काही चाणाक्ष लोकांनी लाखो रुपये गोळा केले व नंतर ते लंपास केले हा इतिहास आहे.
<<

हा इतिहास एकाद्या बिग्रेड इतिहासकारांनी नव्याने लिहिलेला दिसतोय.

>>हा इतिहास एकाद्या बिग्रेड इतिहासकारांनी नव्याने लिहिलेला दिसतोय.<< झोंबला म्हणायचा.. Lol Lol Lol

पुरंदरी खोटा इतिहास जास्त दिवस माथी मारता येत नसतो.. जगाला कळायचं ते कळतंच..

कोकाटे रचित इतिहास खरा
बाकीच्यांनी काही बोलले तर त्यांची लायकी, आईभिन काढली जाईल
हुकमावरून

>>बाकीच्यांनी काही बोलले तर त्यांची लायकी, आईभिन काढली जाईल<< अनाजी-सोमाजीची पिलावळ त्याशिवाय वठणीवर येतच नाही भाऊ..!! Biggrin Biggrin Biggrin

http://khattamitha.blogspot.com/2008/02/blog-post_09.html

चाणाक्ष लोक म्हणे !! तरी बरं होळकर- गायकवाड चाणाक्ष लोकातले नव्हते.

काय आहे की आजकाल आडनावावरुन लोकांचे स्वभाव पारखण्याची टुम आलीय, अर्थात मन आधीच पूर्वग्रहदुषीत असेल तर कुठल्याही थराला जाऊन भाष्य केले जाते. आणी असल्या विचाराचे लोक महाराजांच्या काळात असते तर त्यांची महाराजांनीच काय अवस्था केली असती हे विचार करुन अंगावर काटा येतो. बरे झाले, महाराजांच्या काळात हे महान विचारी लोक नव्हते ते.

खरच की अनाजी सोमाजी दत्तो सारख्या विचारांचे लोक जसे आजच्या काळात आहेत ना, अगदी तस्सेच सोयराबाई आणी शिर्केंच्या विचाराचे लोकही आजच्या काळात आहेत बरं का !!

>> अनाजी सोमाजी दत्तो सारख्या विचारांचे लोक जसे आजच्या काळात आहेत ना, अगदी तस्सेच सोयराबाई आणी शिर्केंच्या विचाराचे लोकही आजच्या काळात आहेत बरं का !!<< हो क्का..?? सोयराबाई आणि शिर्केंना पुढे करुन आपली दळभद्री कारस्थाने राजरोसपणे दामटणार्‍या अनाजी-सोमाजीच्या पिलावळींना वेसण घालणारे पण आहेत म्हटलं..!!! Rofl

ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा..

किव येते तुमची. तुमच्यासारखे ब्रिगेडी विचारांचे लोक या देशात असल्यावर दंगले, तोडफोड, विध्वंस नाही होणार तर काय? गुडघ्यात मेंदू असल्यावर कायम अनाजी आणी सोमाजीच दिसणार, बाळाजीपंतांसारखे लोक तुम्हाला दिसणार नाहीत, कारण तुमचीच सोय.

हे माझे शेवटचे पोस्ट..

गड किल्ल्यांची आधुनिक जगात गरज राहिली नाही, त्यामुळे अनुपयोगी गोष्टी नष्ट होत चालल्या.
भारतात एकेकाळी तांब्याची भांडी सर्रास वापरली जात आता नाही, मातीची कप वापरण्याचा प्रयत्न लालू प्रसाद यादव यांनी करून पाहिला परंतु जग जबरदस्ती मागे नेता येत नाही.
जुन्या वास्तू जपणे ही पुतळा छाप मानसिकता आहे. ती खर्चिक आणि तापदायक आहे.

मी तशी फारशी मायबोली वर आपले विचार मांडत नाही ...पण एक लक्षात येतं कि कुठला विषय कुठे संपेल ह्याच काहीच खरं नाही ...धन्य आहे

>>इकडे यायच्या आधी पुण्याची एक दिवसाची फेरी मारली आणि शनिवार वाडा बघायला गेलो, तिकडे आत गेल्यावर काहीच शिल्लक नाही असं लक्षात आल्यावर नकळत मन दुखावलं गेलं,<<

अहो शनिवार वाड्याचं काय घेउन बसलात? जिथे रायगड सारखा अभेध्य किल्ला (राजधानी) इंग्रजांच्या तोफेमारीने ढासळला, तिथे शनिवार वाड्याची काय गाथा? इट वाज लाइक ए सिटिंग डक...

@राज अहो शनिवार वाडा एक उदाहरण झालं .....मला म्हणायचं आहे कि महाराष्ट्राचे कुठलेच किल्ले महाल चांगल्या परिस्थितीत नाही ...फार वाईट वाटत

kokatay, खंत खरी आही आणी ती व्यक्त पण चांगली केली आहेत. मुलांना शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे वगैरे गोष्टी सांगून शनिवारवाडा, लाल-महाल, सिंहगड वगैरे दाखवायला नेल्यावर, त्यांना त्या गोष्टी खोट्या वाटाव्या इतकी वाईट अवस्था होती ह्या वास्तूंची.

एक चांगला अनुभव मला शनिवारवाड्याच्या पार्किंग मधे आला. अगदी नाममात्र शुल्क आकारून पार्किंग ची सोय आहे. पण फारशी गर्दी नसल्यामुळे, त्या काऊंटर वर बसणार्या व्यक्तीकडे सुट्टे पैस नव्हते. (माझ्याकडे सुद्धा नव्हते). पण तिथे काम करणार्या बाईनं मला, 'असू दे, लावा गाडी. मुलांना दाखवायला आणलय तर जाऊन या. मुलांना दाखवायलाच हवा शनिवारवाडा' अशी आपुलकीनं सुचना केली होती. (नंतर सुट्टे करून पैसे दिले - उगाच फाटा फुटायला नको). अशी भावना असणारे कर्मचारी आणी मुलांना ह्या वास्तू आणी तदनुषंगानं येणारा इतिहास दाखवण्याची / सांगण्याची इच्छा असणारे लोक, तुलनेनं अल्पसंख्यांक का होईना, पण आहेत. पण ह्या लोकांमुळे, ह्या वास्तूंचं संवर्धन होत नाही, हे दुर्दैव.

@ उनाडटप्पू : गुजराती सरदाराचे ३००० करोडचे आत्ताआत्ता बांधलेले स्मारक आम्ही ५०० रुपये तिकिट काढुन थेट गुजरातला जाउन पाहु पण आपल्या स्वराज्याच्या निर्मात्याच्या ५०० कोटिंच्या स्मारकासाठी नुसते नियोजन सुरु झाले तरीसुद्धा बेंबीच्या देठापासुन ते शेंडीच्या टोकापर्यंत रग लावुन ठणाणा करु...

आता बरेच भारतीय लोक अमेरिकेत स्थायिक, नागरिक झालेत. इथे येऊन पुरातन वस्तू पाहताना पंधरा रुपयांचे तिकिट काढतात हे पुरातत्व खात्याच्या लक्षात आल्यावर आता तिकिटावर "रेझिडेन्सी प्रुफ मॅन्डेट्री" छापलं आहे.

अरे, द्याना तुमचे दहा डॅालर आपल्याच जन्मभूमि सरकारला.
किल्ल्यांचे नुतनीकरण बघू नंतर.

Pages