*सुखस्वप्न*
प्रत्येक दिवस असा असावा
त्याविन दुजा कधी नसावा
कष्टाविना दाम नसावा
बुध्दिमंता मान असावा
भुकेल्यापोटी कुणी न निजावा
थकल्या भागल्या आराम असावा
प्रत्येक दिवस असा असावा
त्याविन दुजा कधी नसावा
पुरुषत्वाचा उन्माद नसावा
स्त्रित्वाचा सन्मान असावा
प्रत्येक घर आनंदाचा
खळखळता झरा असावा
प्रत्येक दिवस असा असावा
त्याविन दुजा कधी नसावा
जातीपाती धर्म नसावा
मानवतेचा व्यवहार असावा
मानवाने मानवासाठी
जगण्याचा निर्धार असावा
प्रत्येक दिवस असा असावा
त्याविन दुजा कधी नसावा
जगती सीमावाद नसावा
सर्वत्र मुक्त संचार असावा
वसुधैव कुटुंबकम् आमुचा
विश्वव्यापी विचार असावा
प्रत्येक दिवस असा असावा
त्याविन दुजा कधी नसावा
- प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita