चलायचं? - भाग ३

Submitted by अज्ञातवासी on 1 January, 2019 - 07:23

चलायचं? भाग १
https://www.maayboli.com/node/68487
चलायचं? भाग २
https://www.maayboli.com/node/68503

8.
घोडा एका मारुतीच्या मूर्तीजवळ आला. दोघे खाली उतरले. घोडा अंतर्धान पावला.
"राणी आता गम्मत बघ." पक्याने पिशवीतून शेंदूर काढला, आणि मारुतीला फासला.
मारुतीला शेंदूर फासल्यावर ती मूर्ती खदाखदा हसू लागली. नाचू लागली. आणि बाजूला झाली. त्याक्षणी दोघे मध्ये शिरले, आणि मारुतीने ती गुहा बंद केली.
"भुत्या येईल, लगेच उडी घाल इहिरीत!"
भुत्या आला, आणि दोघांनी भुत्याची आरती सुरु केली.
भुत्या त्या क्षणी बाजूला झाला.
दोघांनी आरती बंद करून विहिरीत उडी घालणार, तेवढ्यात गणाने मालतीवर झडप घातली,
मालती पूर्णपणे जखमी झाली, त्याही परिस्थितीत पक्याने तिला विहिरीत ओढले.
दोघांनी विहिरीत उडी घेतली. मालतीला दोन घोट पाजले.
मालती ठणठणीत बरी झाली.
विहिरीत अनेक माशांनी त्यांच्यावर हल्ला केला. पक्याने कुऱ्हाडीने आणि मालतीने सुऱ्याने मासे कापायला सुरुवात केली.
विहिरीच्या तळाशी पोहोचताच, त्यांना सोन्याचा मासा दिसला.
दोघांनी गळ टाकला, आणि मासा गळाकडे ओढला गेला.
"हुर्रर्र, मालते."
"पक्या चिलखत घाल, ती येईल."
पक्याने चिलखत घातलं.
ती आली!
मत्स्यकन्या, अर्धी चेटकीण अर्धी मासोळी!
त्यांनी पकडलेला मासा तिचा मुलगा!
मत्स्यकन्येने आर्जवे केलीत. पक्याने अक्षय मोहरांचा हंडा मागितला...
मत्स्यकन्येने हंडा दिला.
दोन्ही विहिरीच्या तळाशी असलेल्या चिंचोळ्या वाटेवरून माघारी चालत निघाले, आणि पक्याला मालतीचा आवाज आला.
"पक्या माझ्यासोबत राहा कि, जीव घाबरा हुतुय माझा."
पक्याने मागे वळून बघितले.
आणि मत्स्यकन्येने पक्याचा प्राण घेतला!

परत फिरा माघारी!
जाऊ नका कुणाबरोबरी'

9.

दोन्हीही दरवाजात आले.
"प्रकाश, किती भव्य आहे हा दरवाजा."
दोन्ही दरवाज्यात प्रवेश करणार, तेवढ्यात प्रचंड असे दोन पुतळे त्यांच्यावर चाल करून आले.
प्रकाशने दोन मोहरा त्याच्या दिशेने फेकल्या. दोन्हीही लगेच मान लवून उभे राहिले.
मध्ये जाताच अनेक नाग त्यांच्या दिशेने आले, पण प्रकाशाने पिस्तुलाने त्यांचा समाचार घेतला!
आणि शेवटी ते त्या काळ्या दगडी नागाजवळ आले.
"प्रकाश, यालाच आग लावायचीय ना?"
"हो."
प्रकाशने काडी पेटवून त्याच्याजवळ धरली, उष्णतेने तो कासावीस झाला आणि उडू लागला.
प्रकाशने त्याला घट्ट धरले.
नाग त्याला चावायचा प्रयत्न करू लागला. पण ती दगडी मूर्ती तोंड बंद असलेल्या अवस्थेत घडवल्याने त्याला चावता येईना.
ती आली.
नागकन्या, अर्धी नागीण आणि अर्धी चेटकीण!
तिच्याकडुन प्रकाशने अक्षय पात्र घेतले, आणि चिंचोळ्या वाटेवरून ते माघारी निघाले.
"प्रकाश, मला कुशीत घेऊन चल ना," मालाने आवाज दिला.
आणि प्रकाशने आवाजाच्या दिशेने नागकन्येच्या डोक्याचा वेध घेतला!
हुर्रे!!!!!!

10.

"बे, वी एक्सप्लोर."
एअरपोर्टवर भीषण शांतता होती,चिटपाखरूही दिसत नव्हतं.
त्याच क्षणी पीकेने तिला मागे ओढलं आणि गेट चारच्या दिशेने बॉम्ब्स फेकले.
चार बर्डमॅन मरून पडले,
मायलाने बोम्बार्डियर प्लेनच्या दिशेने हॅन्डमोर्टारने अक्षरशः गोळाबार केला.
बोम्बार्डीयर उद्धवस्त जाहले.
"या बास्टर्डसने आपल्याला मारलं होतं बे."
सूर्योदय झाला.
तेवढ्यात कुठूनतरी एअर इंडियाच प्लेन आलं.
विमानाचं दार उघडून महाराजाने त्यांचं हसून स्वागत केलं.
"धिस महाराजा इज सो क्युट," मायला म्हणाली.
"बे चलायचं?"
आणि दोन्ही आपापल्या सीटच्या दिशेने निघाले.

क्रमशः....... ठेऊ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
अर्ध्यावरती सोडून जाणाऱ्यातले नाहीत आम्ही Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घोडा एका मारुतीच्या मूर्तीजवळ आला. दोन्ही खाली उतरले. >>>> ईथे दोन्ही ऐवजी दोघे जास्त बरोबर वाटेल.
मारुतीला शेंदूर फासल्यावर ती मूर्ती खदाखदा हसू लागली. नाचू लागली. आणि बाजूला झाली. त्याक्षणी दोन्ही मध्ये शिरले, >>>> इथे पण दोन्ही ऐवजी दोघे करायला हवं

बाकी कथा भारी चालू आहे, एकदम इंटरेस्टिंग मोडवर आहे. (हिंदीतील मोड हां Happy ) पुढच्या भागाची प्रतीक्षा.

आवडली!!
पिके तर भाग 2 मध्ये मला होता ना???
मला व्यक्तिशः हा एक गेम वाटतो आहे (कदाचित ऑनलाईन, कारण लोकं एकमेकांशी बोलतात)
म्हणूनच कदाचित पिके जिवंत झाला (multiple lives)