मल्टीटास्क

Submitted by sushant zadgaonkar on 19 December, 2018 - 10:39

मल्टीटास्क.

लेखक :सुशांत झाडगांवकर.

लोकलला मुंबईत लाइफ लाईन म्हणतात.
पण सकाळच्या वेळी गर्दी कोंबून जेंव्हा ही लांबलचक वाघीण सुसाट पळते तेव्हा असं वाटतं कि हिला सुद्धा श्वास घ्यायला फुरसत नाहीये.इतकी तल्लीन होऊन बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला वेळेत पोहचवायचं व्रत बाळगून पळते.ह्यावेळी गर्दीतल्या कुठल्याच प्रवाशाला श्वास घेता येणं शक्य नसतं. .हेही तितकंच खरं. .खरंच.
एकदा लोकल मद्ध्ये शिरतांना दीर्घ श्वास घेतला की पुन्हा तसा श्वास सोडा,पण त्याचा उश्वास सुद्धा हप्त्यांनी प्रत्येक स्टेशनवर सोडायची पद्धत असते,सवय असते.कदाचित त्यामुळे सकाळसकाळी हजारो लोकांचा सामुहीक प्राणायामाचा गिनिज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड्स मद्धे नियमीत विक्रम मोडतात मुंबईकर.
कोण कशा स्थितीत कितीवेळ तसाच उभा असतो हे ज्याचं त्याला माहिती असतं. आत चढताना,लोकल मधे चढून गेल्यावरही,पाय हळुहळू रोवताना सबंध शरीराला इतका व्यवस्थित व्यायाम होतो की नंतर कसल्याच प्रकारचा व्यायाम करायची आवश्यकता नसते.कदाचित म्हणूनच मुंबईकर इतरांपेक्षा भरपूर फिट असतात.
काही वेळाने अवघडलेला हात,खाली घेताना मान खाली किंवा कडेला वळवताना,द्रृष्टी पोहचू शकल्यास,वेगवेगळे द्रृष्टांत घडतात.
कधी कुणाच्या कानाशी मोबाईल लागलेला नसला तर ती व्यक्ती हॅंड्सफ्री वर तरी असते,नसल्यास ,ते उपकरण असलेल्या खिशांपर्यंत त्याचा हात तरी पोहचू शकत नसावा,किंवा त्याला हातच नसावा. .ही अभद्र शंका कधीकधी खरी सुद्धा ठरते.

गर्दींत शक्य झाल्यास इकडे तिकडे बघताना बुबुळं हलवताना,त्यापैकीॅ एक क्रृत्रीम आहे हे कळतं. सतत पुढे काय ह्याचा फार विचार न करता लोकल मधून गरजेपोटी किंवा एकमेव परवडणारा पर्याय म्हणून मुंबईकर अविरत प्रवास करतो.
पण त्याच्या संवेदना कायम जाग्रृत असतांनाच ते नवरसस्वादही त्यांच्या परीने तिथेच अनुभवतात , त्यांची विचारशक्ती लोकलच्या वेगाला कायम मागेच टाकत असते ह्याचं कारण मुंबईत राहणारे बह्वंशी लोक गरजेनुसार मल्टीटास्किंग करणारे असतात.

स्वत:सोबत इतरांचा विचार,फक्त जागा देऊ करायच्या विचाराचा अपवाद सोडून, मुंबईकर सहिष्णुपणे करतो.लोकलचा प्रवासी, देहबोलीनेच कित्येक क्रियासुद्धा करतो,कधी तसं सुचवतो,कधीकधी तुमच्या कडून हवं तसं करवूनही घेतो.अत्यंत कमी जागेत सर्वकाही करायचा मुंबईकरांचा सराव इथेही कामी येतोच.
पण कधीकधी येऊ घातलेल्या परिस्थितीची दैवालाही जाणीव नसते..कधीकधी..
मघापासून मला
एवढ्या गर्दीतही बाजुचा मुलगा अस्वस्थ वाटला.
तो खिशातला मोबाईल बाहेर काढू शकत नाहीये.रिंगेमागून रिंग, एक संपला की दुसरा फोन येतोय. .आजुबाजुच्या प्रवाशांच्या लक्षात आलं. त्यानी शक्य तेवढी त्याचा हात खिशांपर्यंत पोहचून मोबाईल काढणं शक्य व्हावं इतकीच जागा त्याला देऊ केली. .
त्याने फोन घेतांना मिळालेल्या जागेत एक दीर्घ श्वास घेतला.
" अं. .हो.तुम्ही पोचलात ? मी गाडीत आहे.हो २० मिनिटं लागतीलच ."
दुसरा फोन
"हो.मी ते फोल्डर डेस्कटॉप वर ठेवलं आहे आणि सध्या १० मिनिटं मला फोन करू नका.मी काहीही. ."
नेटवर्क नेमकं कट झालं.
तो पुन्हा गंभीरच .काहीशी रागीट चर्या.
फोन येतोय.तीच सगळी आसनं करून फोन कानापर्यंत जाणं शक्य नव्हतं म्हणून स्पीकर ऑन केला.
"बाबा,तुम्ही लगेच हॉस्पिटलला पोहोचा.हिचं पोट सकाळपास्नं दुखत होतं म्हणून तिला अॅडमीट करून मला इकडे यावं लागलं. .नाही काळजी करू. ."
फोन कट.पण दुसरा कॉल तयार.शेजारचा प्रवासी मद्धे बोलला. .
"ये फोन आपको चैन नही देगा.आप रख दो इसे.आरामसे सफर तो कर सकेंगे."
तो एक आवाज ह्याची नजर तिकडे वळताच विरला. .पुन्हा फोन.हा जरा चिडलेलाच.
"नाही .I can not get off the train.and nor Im coming to your bloody office.
yes.I ve resigned. .we complete formalities later."फोन ठेवते क्षणी त्याचा चेहेरा गोरामोरा झाला होता.
मीही त्याला जरा सबुरीनं घे असं शक्य तेव्हढी मान वळवून सुचवतो.
त्याची स्तब्ध नजर जरा बोचरी वाटते. .पण डोळ्यांच्या कडा ओल्या जाणवतात. मी चरकतो.मी अस्वस्थ होतो.
पंधरा वीस मिनीटं प्रवासात कधी संपतील ह्याची मी वाट बघत होतो. तो एक अप्रीय निर्णय असा चुटकीसरशी कसा घेतो..
आपली बायको आजारी असेल,तिला तसं टाकून ह्याला निघावं लागलं असेल.कबूल . .
पण कुणीतरी तिथे आहेच नं?आणि तशीही ती हॉस्पिटल मद्धे सुरक्षित आहे.पण हल्लीच्या पिढीला थोडी सबुरी,सामोपचार कमीच असणार . .
लठ्ठ पगार ,आर्थिक सुबत्तेमुळे कुणा दुसर्‍या चा विचार,आस्था किंवा काळजी ह्याना शिवतही नसते.नोकरीची चिंता ह्या पिढीला नाहीचेै.लगेच दुसरी मिळतेही हल्ली.
माझे सगळे विचार कळल्यागत तो माझ्या कडे बघतोय असं जाणवलं.
दादरला गाडी पोहचताक्षणीच एक अजून फोन.आता गर्दी कमी व्हायच्या,स्टेशन येण्या आधीची दाटी झाली.धक्का बुक्की वाढली.एक अजून फोन.
"हो पैसे आहेत माझ्याजवळ. .तुम्ही द्या बाबा.नाही नाही.तीही व्यवस्था मी केलीये.
हो.घरी फर्निचर सगळं बाहेरच्या बाल्कनीत काढून ठेवलं आहे. .आईला ताब्यात घ्या.
मी पोचतोच बाबा."
ह्या वाक्याने मात्र मी पुरता गारद झालो.
गर्दी विरली तसा मी त्याच्याकडे वळलो.
"सगळं व्यवस्थित होईल."आता त्याच्याआवाजाच्या गांभीर्यानं वेगळी पातळी गाठली होती.
"होईल. अाता कसं शक्य आहे. .आणि त्यानं तोंड फिरवलं तसं मी बोललो
"मिसेस आजारी असताना उगाच नोकरी बद्दलच्या निर्णयांत . ."
मला सौम्यपणे अडवलं त्यानी. .
"आई गेली माझी.आत्ता.आजारीच होती. ".
. .
गर्रकन अख्खी लोकल ट्रॅक सोडून माझ्याभोवती गोल फिरल्याचा भास झाला मला.
हल्ली एकावेळी एका अपघातात कित्येक माणसं सापडतात.पण ह्या एका क्षणांत इतके आघात सहन करणारा मुर्तीमंत हाडामासाचा जीव अतिशय निर्विकार पणे इथे माझ्यापुढे उभा होता .
. .मी भानावर यायच्या आत स्टेशन वर गाडी थांबली तेव्हा. .
पुन्हा मल्टीटास्किंग मिशनवर जाताना बघितलं एका मुंबईकराला.

सुशांत झाडगांवकर.
8600104764
3.8.18.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बेस्ट आहे च्रप्स.. मजबूरीका नाम गांधीजी !

लिखाण कथा छान आहे. पुलेशु.

माणसाच्या आयुष्यात प्रायोरीटीज क्लीअर असाव्यात आणि त्यानुसारच त्याने जगावे.

<<<माणसाच्या आयुष्यात प्रायोरीटीज क्लीअर असाव्यात आणि त्यानुसारच त्याने जगावे.>>>
तसा मलाही भक्कम पगार होता, आर्थिक सुबत्ता नसली तरी चिंता नाही. पण त्याचा नि इतरांचा विचार करणे, साहानुभूति दाखवण्याच्या वेळी
फुकट सल्ले देणे असे करण्याचा नि भक्कम पगाराचा काही संबंध नाही.
मी फक्त मायबोलीवर फुकटचे सल्ले देतो. ज्या लोकांना स्वतःचे प्रश्न सोडवायचे सोडून मायबोलीवर येऊन जाहीर चर्चा करायला वेळ आहे,
त्यांच्याबद्दल मला साहानुभूति नाही.

<<<लठ्ठ पगार ,आर्थिक सुबत्तेमुळे कुणा दुसर्‍या चा विचार,आस्था किंवा काळजी ह्याना शिवतही नसते>>>
त्यांनाहि त्यांच्या काळज्या असतातच. व्यवस्थित लाच भरून भले मोठे काँट्रॅक्ट वेळीच मिळाले नाही तर लाथ मारून हाकलून देतीलच. मग आणखी एक मर्सिडिज गाडी कशी घेणार? नि रात्रीच्या पार्टीला कुणाला बोलवायचे, डान्स कुणाचा ठेवायचा, मुलाला पैसे पाठवायचे आहेतच! त्यातून हा मुंबईचा ट्रॅफिक! !

नंद्याजी तुम्ही माझी पोस्ट कोट केलीत खरी...
पण त्या खाली जे लिहीलेय त्याचा आणि मी जे काही लिहीलेय त्याचा काही ताळमेळ लागत नाहीये.