सोशल मीडीयात ट्रोल्सना का फटके पडताहेत ?

Submitted by थॅनोस आपटे on 16 December, 2018 - 06:52

मोदी, केजरीवाल आणि बाबा रामदेव यांनी ट्रोल्सची फॅक्टरी काढली. बनावट आयडीजने शिवीगाळ, फोटोशॉप, खोट्या बातम्या, तथ्यहीन भडकाऊ संदेश यांच्या सहाय्याने वातावरण निर्माण केले गेले. पुढे तिघे वेगवेगळे झाले. यांना सेवा देणा-या कंपन्या सामाईक होत्या. वेगवेगळे झाल्यानंतर यांचे वेगवेगळे अजेण्डे ते जपत बसले.

साधारण दीड दोन वर्षे त्यांनी सोशल मीडीयावरून एक लाट निर्माण केली. याचा फायदा तिघांनाही झाला. त्या आधी संघी ट्रोल्स होतेच सोशल मीडीयावर. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झुंडीने फिरताना त्यांना पाहीले नाही. स्तर तोच होता. ना कम ना जादा. यांना ट्रेनिंग देणारेच ट्रोल्सना ट्रेनिंग देत असावेत इतका यांचा अजेण्डा सेम होता. नंतर अनेक नेत्यांना विविध पोर्टल्सवर सर्रास शिवीगाळ सुरू झाली. महिलांचा फक्त अनादरच नाही तर उघडपणे रंडी म्हणणे, बलात्काराच्या धमक्या देणे हे पहायला मिळाले.

मोदींच्या विजयानंतर कुठेतरी अंथरूणात लोळणारे पुरोगामी सोशल मीडीयात येऊ लागले. त्यांनी सावकाश हा अपप्रचार खोडून काढायला सुरूवात केली आणि त्यांना प्रतिसाद मिळू लागला. सुरूवातीला ट्रोलधाडीचा त्यांना त्रास झाला. काही वेळा घाऊक रिपोर्टिंगने आयडी उडवणे असे प्रकारही झाले. पण नंतर या ट्रोल्सकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या पातळीवर न उतरता फक्त मुद्यांना उत्तरे देणे यामुळे पुरोगाम्यांच्या विरोधात फेसबुक इंडीयानेही सबुरीचे धोरण घेतले. सुरूवातीच्या चुका होऊ दिल्या नाहीत.

त्यामुळे ट्रोल्सची अवस्था बिकट झाली. दोनच वर्षात ट्रोल्स फेसबुकवरून नाहीसे झाले. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप कडे मोर्चा वळवला. तिथे दुतर्फा संभाषण नाही. अजून तरी पुरोगाम्यांनी व्हॉट्सअ‍ॅप कडे पाहीलेले नाही. मात्र फेसबुक सारख्या समाजमाध्यमात आता ट्रोल्स ना फटके पडताना दिसताहेत. त्यांचे तेच तेच मुद्दे (जे कधी काळी नवीन असल्याने गडबडून टाकत) आता घासून गुळगुळीत झालेले आहेत. ज्याप्रमाणे भाजपच्या ट्रोल्सना फटके पडताहेत त्याचप्रमाणे मध्यंतरी काँग्रेसनेही एडीटेड व्हिडीओज आणि फोटोजचा सहारा घेतला. त्यांनाही फटके पडले.

भाजपच्या असत्य प्रचाराची पिसं निघताहेत. गोबेल्सनीती + दंगली + ध्रुवीकरण एकीकडे आणि दुसरीकडे मिथ्य विकासाच्या बाता या समीकरणाच्या चिंधड्या उडताना दिसताहेत.

एकंदरीत ट्रोल्सना फटके पडणे हे त्यांच्यासाठी अच्छे दिन आले असे म्हणता येत नाही.
अजून काय कारणे असतील ट्रोल्स नाहीसे होण्याची ?

Group content visibility: 
Use group defaults

< ही लिंक पाहाल का जरा प्लीज?
https://www.livefistdefence.com/2018/12/year-before-shortlisting-rafale-... >

------- रिव्हर्स स्विप लिंक बघितली/ वाचली... तुम्ही HAL (माजी ?) प्रमुखांचे मत पण वाचा. HAL च्या क्षमतेची, काय करु शकते, काय नाही याची जास्त जाण त्यांना आहे.

HAL चे प्रश्न आणि कामाचा व्याप/ पसारा याबाबतचे जे प्रश्न असतील ते सोडवता येणे सहज शक्य आहे. त्या प्रश्नांचा सामना करुन ते सोडवणे बहुमतातल्या देशप्रेमी सरकारसाठी अशक्य कोटीतली गोष्ट नाही.

काल पर्यंत अस्तित्वातच नसलेली, शुन्य अनुभव असणारी कम्पनी (पिपा... विकत घेतली... म्हणुन अनुभवी हे पटत नाही) सुरु करुन त्यांच्यावर विश्वास ठेवणे या धोक्यापेक्षा हल चा प्रश्न सोपा आहे.

व्यावहार पारदर्षक आहे तर JPC साठी अडेलतट्टू पणा कशाला? विरोधक उघडे पडतील तर फायदाच आहे ना.

भारतीय नौदलाने रिलायन्स नेव्हल ची बँक हमी वाटवून घेतलीये. रिलायन्स डिफेन्स ची पण अशीच अवस्था न होवो

इथल्या ट्रोल मंडळींसाठी आदर्श उदाहरण. असे प्रेम असेल तरच नाव घ्या आपल्या नेत्याचे. उगीच फुकाच्या गप्पा नकोत. तीन राज्यांच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर असा परमोच्च त्याग असेल तरच २०१९ ला काहीतरी धूसर आशा आहे. आता इथे टाईमपास नको, कृती हवी कृती !!

Screenshot_2018-12-20-15-12-33-092_com.facebook.lite__0.png

Pages