लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवणारे खेळ

Submitted by सिम्बा on 10 December, 2018 - 05:00

0-6 वर्षे या वयात मुलांचा मेंदू अतिशय जास्त कार्यश्रम असतो, अक्षरशः समोर ठेऊ ती गोष्ट ते आत्मसात करायला पाहात असतात,
मोठी माणसे जाणते-अजाणतेपणी त्यांच्या बरोबर जी इन्ट्रॅकशन करतात त्यातून मुले खूप गोष्टी शिकत असतात,

आपण मुद्दामहून ठरवून किंवा सहज झाले म्हणून मुलांबरोबर काही साधे सोप्पे खेळ खेळतो, त्यातून मुलांना काहीतरी नवीन शिकायला मिळते. अगदी साध्या नावाच्या भेंड्या पण मुलांचे फोनेटिक साऊंड पक्के करतात, मोठ्याना इंटरेस्ट असेल तर नावांचे अर्थ वगैरे गोष्टी सांगू शकतात,

असे काही खेळ आपण खाली लिहुया.

1) ए चिकू खेळ-
हा माझ्या मुलीचा ( 3 वर्षे) सध्याचा आवडता खेळ
तिला , "ए चिकू " म्हणून हाक मारायची, मग तिने दुसऱ्या फळांचे नाव घेऊन उत्तर द्यायचे. असे करत करत तिला सगळ्या फळांची नावे माहीत झाली

याचे पुढचे व्हेरिअशन , मी केळे की तिने बनाना म्हणून उत्तर द्यायचे, मग मी दुसऱ्या नावाने हाक मारणार, असे करून फळांची इंग्रजी नावे यायला लागली.

सेम खेळ एक कॅटेगरी च्या गोष्टी घेऊन खेळतो, जसे गोड पदार्थ, फर्निचर आयटम, प्राण्यांची मराठी- इंग्रजी नावे इत्यादी

2) सम विषम खेळ- हा मोठ्या मुली बरोबर खेळायचो
गाडीने जाताना पुढच्या गाडीची नम्बर प्लेट ऑड की एव्हन ओळखायचे,
पुढची स्टेप, त्या 4 आकड्यांची बेरीज किती येते ते सांगायचे.
(हा खेळ 3 4 गाडयांपेक्षा जास्त चालत नाही हर सांगणे न लगे)

3) 2 फासे घेऊन सापशिडी-
निळ्या फाश्यावर जे दान पडेल तितकी घरे पुढे, आणि लाल फाश्यावर असेल तितकी मागे,
आणि मग नॉर्मल साप शिडी चे नियम
या मुळे +/ - कमी जास्त, निगेटिव्ह नम्बर या संकल्पना कळल्या

हे खेळ काही रॉकेट सायन्स नाहीयेत,
काही खेळांना थोडी पूर्व तयारी लागते, ते प्रतिसादात लिहितो.

आपण खेळत असलेले खेळ इकडे लिहिले तर बाकीच्यांना सुद्धा त्यांचा उपयोग होऊ शकेल म्हणून हा धागा Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे atlas खेळू म्हणून मागे लागतात, नकाशावर असेल ते सगळं. पण mag जे सध्या शाळेत शिकवलंय तेच येतं असतं:) आणि मला सगळं जेनेरिक येतं मग एक common factor घेऊन खेळणं अवघड जातं.
भाचरांबरोबर नकाशा खेळायचं तर ती फक्त सिंहगडाच्या आसपासची खेडी सांगतात, घरातल्या मोठ्यांना वैतागून सांगितलंय जरा सिंहगडरोड सोडून अजून कुठंतरी फिरा.

आम्ही एक खेळ खेळायचो..
आपण कुठलीही दोन वस्तुंची नाव सांगायची, मग समोरच्यानी त्यातला परस्पर संबंध ओळखायचा नी मग त्यातले एक नाव घेउन आपण सांगितल्या पेक्षा वेगळा संबंध असेल अशी एक जोडी सांगायची
म्हणजे
कॅमल नी एलिफंट सांगितले
तर दोन्ही अ‍ॅनिमल्स हे ओळखयच
नी त्यातले समजा कॅमल घेतल तर कॅमल नी ओअ‍ॅसिस अस सांगायच

मस्त धागा सिम्बा !
१)वर्ड गेम ची सध्या आमच्या कडे चलती आहे. म्हणजे शब्दांची अंताक्षरी. एका इंग्रजी शब्दाने सुरु करुन, त्याच्या स्पेलिंगचं शेवटचं लेटर घेऊन त्यापासून पुढचा शब्द. Rafflesia हे जगातलं सर्वात मोठं फूल आहे बाबा, असं सांगून पोरानं क्लिन बोल्ड केलं होतं हे खेळताना !
२) साप शिडी उलटी खेळणे, म्हणजे शिडीवरुन घसरणे आणि सापाची शेपूट पकडून वर चढणे .

आमच्याकडे लहान मुलांसाठी सांगा सांगा पटकन सांगा एक एका मुलाचे/नदीचे/रंगाचे/देशाचे आणि असे अनेक ऑप्शन ठेउन नाव सांगा असा खेळ खेळतो.

तसच कोडी टाकतो.

म्हणजे एक अस फळ आहे ज्यात पाणी असत
एक अस वाहन सांगा जे हवेत उडत
एक असा मासा जो उडी मारतो

अशी पहिली दुसरीतल्या मुलांसाठी.

छान उपयुक्त धागा .. आयड्या मिळतील

माझ्या संबंधित एफबी पोस्टच शेअर करतो..

२६ ऑगस्ट २०१८

Colour colour which colour do you want..?
काल परी आणि तिची एक मावशी हा खेळ खेळत होत्या. मी गरीब बिचारया बापासारखा रुनूला डाळभात भरवत होतो. दोनचारदा त्यांचा कलर ओळखायचा खेळ करून झाल्यावर मला एक नवीन गेम सुचला.
Letter letter which letter do you want..?
म्हणजे ईंग्लिशचे एक अक्षर द्यायचे आणि त्यापासून स्पेलिंग सुरू होणारी वस्तू शोधायची. उदाहरणार्थ C म्हटले की chair ला हात लावायचा आणि F म्हटले की fan दाखवायचा ..

सुरुवात परीने केली,
Letter letter which letter do you want..?
पहिलेच अक्षर मावशीने दिले - B
बी म्हणजे ब ब ब.. असे म्हणत माझ्याकडे धावत आली आणि रुनूचा हात पकडत म्हणाली .. बेबी Baby Happy

.
.

९ सप्टेंबर २०१८

Letter Letter which Letter do you want? हा खेळ आमच्याकडे सध्या खूप चालतो.

त्या दिवशी असेच बेडरूममध्ये खेळत होतो. मी तिला लेटर "M" दिले.
म म.. करत ती My बोलली. मी लगेच फाऊल काढला, परी, माय असे काही असते का? काहीतरी वस्तू पाहिजे.
लगेच तिने जवळच पडलेली डॉल उचलली, आणि म्हणाली My Doll Happy
फाऊल काढायला काही शिल्लकच ठेवले नाही.

मागे एकदा तिच्याबरोबर फिरायला जात होतो. टॅक्सीत आम्ही दोघेच होतो. मध्येच तिला हा खेळ खेळायची हुक्की आली. टॅक्सीत फार काही करण्यासारखे नाही तर बोअर झाली असेल. ते ठिक आहे, पण टॅक्सीत बसल्याबसल्या हा खेळ कसा आणि किती खेळणार होतो..
पण ऐकेल ती परी कसली म्हणून खेळायचे ठरवले. टॅक्सीतल्या टॅक्सीत आणखी काय शोधणार म्हणून पहिले लेटर टॅक्सीचाच "T" दिला.
आता तिची "टी फॉर ट्यूब" पेटून ती "टी फॉर टॅक्सी" हे उत्तर कधी देतेय याची मी वाट बघू लागलो. पण तिने टॅक्सीच्या बाहेर ईथे तिथे पाहिले आणि ट ट करत मला रस्त्याकडेचे "T for Tree" दाखवले. आणि आपण टॅक्सीत बसलो असतो तेव्हा आपले जग टॅक्सीपुरतेच मर्यादीत नसते याचा मला साक्षात्कार झाला.

काल असाच घरी खेळ चालू होता.
मी तिला Letter "W" दिले होते.
तिने उत्तर दिले, व व व.. Winter ..
मी पुन्हा फाऊल काढला, परी विंटर कुठे आहे ईथे, दाखव?
"अरे पप्पा एसी तर चालू आहे, मला थंडी वाजत आहे, म्हणून विंटर :):)

त्यानंतर मग उलटा डब्ल्यू Letter "M" दिला.
म म मिरर आधी बोलून झालेले, त्यामुळे ते पुन्हा अलाऊड नव्हते. म्हणून मग ती म म मेटल म्हणाली.
मी विचारले, ईथे कुठे आहे मेटल? दाखव.. तर तिला मेटलचा अर्थ माहीत नव्हता.
मी फाऊल काढणार ईतक्यात म्हणाली, अरे पप्पा मी मेटल नाही मेन्टल म्हणाले.
आता कुठे आहे मेंटल विचारायचा प्रश्नच नव्हता. याआधीही मला बरेचदा मेंटल बनवून झालेय तिचे आणि आताही तिचे बोट माझ्यावरच रोखले होते Happy

.
.

१० सप्टेंबर २०१८

Letter letter which letter खेळता खेळता पोरीला मध्येच एक नवीन गेम सुचला..
पप्पा आपण number number which number खेळूया?
आता हा कसा खेळायचा? मला काही समजले नाही म्हणून तिलाच विचारले.
अरे म्हणजे वन फॅन, टू ट्यूबलाईटस.. असा खेळायचा..
माझी ट्यूबलाईट अजूनही पेटली नाही. तरी मी तिला गेम स्टार्ट करायला 3 नंबर दिला. तसे तिने ईथे तिथे पाहिले आणि थ्री लोडस म्हणत तीन लोड जमा केले. मला गेम समजला.
मी फोर नंबर दिला तसे तिने चार पिलो (उश्या) जमा केल्या. मी फाईव्ह नंबर देताच तिने अजून एक उशी आणली. मी लगेच गेममध्ये एक रूल टाकला. एकदा काऊंट झालेली वस्तू पुन्हा मोजायची नाही.
पुढे सात नंबर दिला तसे तिने सात टोप्या आणल्या. दहा नंबरसाठी तिच्या पर्सवरच्या डिजाईनमधील दहा सर्कल मोजले.
बारा नंबरसाठी तिच्या नेकलेसमधील फक्त पिंक मणी काउंट केले. आणि ते बरोब्बर बाराच भरले.
पुढे मी १५ नंबर दिला तसे माझे कपडे मोजायला घेतले. दरवाज्याला लटकवलेले सात आठ मोजून झाल्यावर पुढचे मोजायला कपाटात शिरली.
२० नंबर तर खूपच सिंपल होता. पटापट हातापायांची वीस बोटे मोजली.
२५ नंबरसाठी मण्यांची मोठी माळ घेऊन आली.
फायनली बाहेरच्या रूममधून ३० प्लेईंग कार्डस मोजून आणले आणि पहिल्याच दिवशी शंभर नंबर पर्यंत मोजामोज नको म्हणून अखेर आम्ही थांबलो Happy

१. तोंडी गणितं (अर्थातच सोपी)
कारण आमच्याकडे जस्ट बेरीज वजाबाक्या शिकणे चालू आहे.
२. आय स्पाय समथिंग स्टार्ट विथ लेटर '-----'

काल नातीशी (भाचीची मुलगी) वय वरष ६ शी खेळलो... गेस द आॅब्जेक्ट : एक किंवा अनेकजण खेळू शकतात. आपण एक मनात वस्तु धरायची . मनात धरलेल्याने फक्त हो/नाही मध्येच उत्तरे द्यायची. बाकीच्यांनी प्रश्न विचारायचे. घरातली वस्तु आहे का ? वस्तु सजीव आहे ? हलणारी आहे का? रंग काळा आहे का ? धातूची आहे का अश्या अनेक प्रश्नांतून वस्तू ओळखायची...

आम्ही लहानपणी मेमरी गेम खेळत असू. आताही खेळतो बच्चे कंपनी जमली की.
एकाने १ नावाने सुरूवात करायची. मग दुसर्याने ते १ आणि दुसरे नाव सांगायचे. तिसर्याने १, २ आणि तिसरे असे चालू ठेवायचे. नंतर ज्याचा क्रम चुकतो तो बाद.

मेमरी गेमचाच दुसरा व्हेरिएंट,
घरगुती वापराच्या 10 15 छोट्या वस्तू जमा करायच्या नेलकटर, टूथ पीक, चमचा, पेन, खोद्गबर ताईप्स, मुलांना त्या पाहायला द्यायच्या 30 सेकंड, मग त्यांना बाहेर जायला सांगून, त्यातली एखादी वस्तू लपवायची, मुलांनी ती ओळखायची.

किंवा मुलांनी आठवतील तितक्या वस्तू लिहून काढायच्या

प्रवासात लेकरू लहान असताना गाड्यांचे नंबर वाचणे, ऑड-इव्हन ओळखणे, गाडीचे मॉडेल, कंपनी ओळखणे इ खेळायचो.
रस्त्यातल्या बोर्डावरची नावे वाचणे, स्पेलिंग गेम पण चालायचे.

मध्यंतरी बोर्ड गेम्स मध्ये गेस हू खूप पॉप्युलर होता घरात. प्रवासात असताना शहरांच्या नावाच्या भेंड्या चालतात हल्ली. या दिवाळीत पूर्णवेळ मेमरी गेम ची व्हेरिएशन्स चालली होती. दोन मुलं आणि किमान 4-5 मोठे खेळत असल्याने मजा यायची. नावं, आडनावं, नद्यांची नावे, शहरांची नावे असे मेमरी गेम खेळले गेले. 150 च्या आसपास नावापर्यंत खेळले जायचा गेम.

सध्या स्क्रबल चालू आहे घरी.

वय वर्षे पावणे चार साठी खेळ,
तिला अजून पेन पेन्सिल देऊन अक्षर गिरवण्यास सांगितले नाहीये, कारण हाताचे स्नायू तितके विकसित झालेले नसतात असे म्हणतात.
पण हातावर साधारण कंट्रोल येण्या साठी हा खेळ,

व्हाइट बोर्ड मार्कर ने जमिनीवर ठिपके देत पॅटर्न काढायचा,
आधी सरळ लाईन, मग साइन वेव्ह, मग त्रिकोणी डोंगर रांग, चकली सारखे गुंडाळे इत्यादी. आकार मोठे काढावेत साधारण 1x1 फूट च्या फरशीत एक आकार.

मुलाच्या हातात स्पनज चा तुकडा किंवा रुमालाची घडी देऊन तो पॅटर्न पुसायला सांगणे.

पत्ते-
1) सगळ्यात पहिला खेळ इस्पिक बदाम चौकट किलवर ओळखणे.

2) वर चार प्रकारची 4 पाने लावून ठेवायची आणि मुलाने चौकट वर चौकट, बदाम वर बदाम करत अक्खा कॅट या चार गठ्ठ्यात लावणे. हा खेळ 3 4 दिवसच चालतो मग मुलाला कंटाळा येतो

3) राजा राणी गुलाम ओळखायला शिकवणे

4) पाहुणा कोण खेळ,
गटाबाहेरील पान ओळखणे,
4 किलवर एक बदाम अशी पाने लावून पाहुणा पान कोणते ते ओळखायला सांगणे,
यात काठिण्य पातळी वाढवत न्यायची, सुरवातीला फक्त वेगळा संच ओळखणे, किंवा बाकी आकडे आणि एक चित्र वाले पान
थोड्या वेळाने सगळ्या पंज्या आणि एक दश्शी, नंतर अजून फाईन फरक सगळ्या तिरर्या एक चौवी etc.

5) नेहमीचा खेळ भिकार सावकार

आमच्याकडे जमीन आणि व्हाइट बोर्ड मार्कर्स हे या सुट्टीतील हिट कॉम्बिनेशन आहे,
मोठी मुलगी (9 वर्षे) खाली ठिपके काढून रांगोळी डिझाईन चा प्रयत्न करते.
2 प्लेयर्स नि 2 2 ठिपके जोडून घर करायचा खेळ
फुल्ली गोळा

गोष्ट सांगताना जमिनीवर चित्र काढून स्टोरी बोर्ड करायचा प्रयत्न केला होता, पण त्यात खूप वेळ जातो आणि गोष्टी ची लिंक तुटते,

मेमरी गेम
घरातल्या नेहमीच्या पाहण्यातील 8 10 छोट्या वस्तू जसे खोडरबर, शार्पणर, पेन्सिल चा तुकडा, हेअरपिन वगैरे घेऊन बसावे,
तुम्ही 3 वस्तूंची नावे एकत्र सांगा ( आधी 3 मग 5 मग 7 ) सांगाल त्या क्रमाने मुलाने वस्तू तुमच्या हातात द्यायच्या.

थोड्या मोठ्या मुलांसाठी जास्त वस्तू घेऊन मुलांना त्या एकदा पाहायला द्यायच्या, मग त्यांच्यावर रुमाल टाकून 2 3 वस्तू उचलायचा, कोणत्या वस्तू उचलल्या त्या मुलाने सांगायचे.

सिम्बा, मस्तच.
थोड्या मोठ्या मुलांसाठी जास्त वस्तू घेऊन मुलांना त्या एकदा पाहायला द्यायच्या, मग त्यांच्यावर रुमाल टाकून 2 3 वस्तू उचलायचा, कोणत्या वस्तू उचलल्या त्या मुलाने सांगायचे.>>>> आम्ही गाइड कॅम्पला जायचो तेव्हा स्मरणशक्तीचा हा खेळ असायचा. माझा नंबर यायचा नेहमी Happy

आता मी zephyr memory game आणला आहे. मुलांना आवडलाय. आम्ही खेळतो बरेचदा.

छान माहितीपूर्ण धागा आहे. सिम्ब तुम्ही आणि इतर काही जणांनी सुचवलेले गेम आवडले. आता प्रतिसाद थोडे आहेत तोवर ठीक, नंतर गेम्स शोधणं अवघड जाईल, म्हणून सुचवलेले सिलेंक्टेड छान गेम्स तुमच्या मुख्य लेखात ऍड करत जाणार का? मला अगदीच आवडला आहे या धाग्याचा विषय आणि जमा होणारी माहिती.

शशांक जी कुणाला तरी खिजवण्यासाठी हा धागा वर आणला गेलाय.

नवीन Submitted by शक्तीवान on 3 May, 2019 - 06:22

>>>

निदान मला तरी तसे वाटत नाही.

बरं

नंतर गेम्स शोधणं अवघड जाईल, म्हणून सुचवलेले सिलेंक्टेड छान गेम्स तुमच्या मुख्य लेखात ऍड करत जाणार का? >>>+१

मी कधीही लेखन केले नाही, त्यामुळे मूळ लेखाला सुद्धा संपादन मुदत असते, हे माहीत नव्हतं.

तसही छान आणि उपयुक्त धागा आहे, त्यामुळे इंटरेस्टेड लोक पूर्ण वाचून माहिती मिळवतील