ज्योतिषी कसा असावा

Submitted by रमेश रावल on 10 December, 2018 - 03:14

आत्ताच एक धागा वाचला..ज्योतिष शिकण्यासंदर्भात होता.. लोक्कांचे वेगवेगळे मत होते.. कोणी कुणा ज्योतिषाला फ्रॉड
म्हणत होते..तर कोणी ज्योतिष शिकू नका पदरी निराशा पडेल म्हणत होते...
काही लिहण्याअगोदर माझ्या विषयी थोडेसे सांगायचे म्हंटले तर
माझे काका ज्योतिषी आहेत त्यामुळे लहानपणापासून त्यांच्या कडे आलेली माणसे व त्यांना आलेले अनुभव मी स्वतः ऐकत आलेलो आहे.
जस जसे मोठा होत गेलो तसतसे इतर पुस्तके वाचू लागलो आणि माझ्या हातात अंधश्रद्धा निमूर्लन ची पुस्तके पडली त्यांचे बहुतेक लिखाण हे जोतिषशात्र
विरोधात होते (किंव्हा माझा त्यातच इंटरेस्ट असल्याने तसे वाटत असेल ) म्हणून त्या दृष्टीने हि विचार करू लागलो, जसे कि एवढ्या लांबून ग्रह म्हणजे निर्जीव गोळे माणसाच्या जीवनावर कसा प्रभाव पाडेल वगैरे.. हेच प्रश्न मी माझ्या काकांना विचारायचो त्यांच्या कडे त्याची तर्कशुद्ध उत्तरे नव्हती पण त्यांनी सांगितलेल्या
भविष्याचा अनुभव मी स्वतः इतरांच्या तोंडून खूपदा एकला असल्याने व मला थोडे थोडे कुंडली वाचन आत्ता जमू लागल्याने या शात्रात काहीतरी दम आहे हे कळत होते पण अजून बरीच प्रश्न बाकी होते मग मी बाहेर कोणी क्लास घेत का हे पाहू लागलो..इतर ज्योतिषांना भेटू लागलो.. तेंव्हा मला खूप वाईट अनुभव आले.. या पवित्र शास्त्रात चालणारा अपवित्रपणा ,फसवणूक,लुबाडणे हे मी पहिले आहे.. थोडं फार तरी कळत असल्याने उगीच ग्रहांचे रत्न देणे,शांती सुचवणे व फसवे उपाय कळत होते बरं त्याबद्धल विचारलं कि म्हणायचे आमच्या गुरूने असेच शिकवले आहे व त्यामागील तर्क आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत.
असो.. आता सर्व काही ज्योतिषांचेच चुकते असे हि नाही.. मी पत्रिका फुकट पाहत होतो..पण जे व्यावयसाय म्हणून ज्योतिष करतात त्यांनी का फुकट पाहावी नाही का ? आणि फुकट म्हंटले तर लोक १० प्रश्न घेऊन उभे असतात वरती एखादे उत्तर चुकले तर ज्योतिश्याच्या नावाने खडे फोडायचे.. बर लोक पण ना मुला मुलीच्या लग्नाला लाखाने खर्च करतील पण लग्न कधी होईल हे उत्तर फुकटात हवे... आणि काही ज्योतिषी तर १००० - २००० च्या खाली पत्रिकेला हात लावत नाहीत.. मी बरेच वेळेला पाहिलंय मोठं मोठे जाहिरात करणारे..पुस्त्तक लिहिणारे जोतिशी दोन दोन हजार रुपये घेऊन काडीचा मात्र योग्य भविष्य सांगत नाहीत..फक्त नाव मोठं..
काही ज्योतिषी तर असे भेटले ते, मी सांगेन तसेच होणार असे ठामपणे सांगतात वर म्हणतात माझा अभ्यास तेवढा आहे.. तिथेच समजून जा याला ज्योतिष किती कळाले ते..
बर चुकत जातकांचेही.. मला जेंव्हा जास्त लोक्कांचे मेसेज व मेल येऊ लागले तेंव्हा मी फुकट ज्योतिष सोडून इच्छित फी (जातकाच्या मनानुसार ११ रुपये सुद्धा चालतील) चालू केली तर अशी फी सांगून हि लोक नाही देत..
म्हणून मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे..तुम्हाला काय वाटत ज्योतिषी कसा असावा व कसा नसावा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages