ज्योतिषी कसा असावा

Submitted by रमेश रावल on 10 December, 2018 - 03:14

आत्ताच एक धागा वाचला..ज्योतिष शिकण्यासंदर्भात होता.. लोक्कांचे वेगवेगळे मत होते.. कोणी कुणा ज्योतिषाला फ्रॉड
म्हणत होते..तर कोणी ज्योतिष शिकू नका पदरी निराशा पडेल म्हणत होते...
काही लिहण्याअगोदर माझ्या विषयी थोडेसे सांगायचे म्हंटले तर
माझे काका ज्योतिषी आहेत त्यामुळे लहानपणापासून त्यांच्या कडे आलेली माणसे व त्यांना आलेले अनुभव मी स्वतः ऐकत आलेलो आहे.
जस जसे मोठा होत गेलो तसतसे इतर पुस्तके वाचू लागलो आणि माझ्या हातात अंधश्रद्धा निमूर्लन ची पुस्तके पडली त्यांचे बहुतेक लिखाण हे जोतिषशात्र
विरोधात होते (किंव्हा माझा त्यातच इंटरेस्ट असल्याने तसे वाटत असेल ) म्हणून त्या दृष्टीने हि विचार करू लागलो, जसे कि एवढ्या लांबून ग्रह म्हणजे निर्जीव गोळे माणसाच्या जीवनावर कसा प्रभाव पाडेल वगैरे.. हेच प्रश्न मी माझ्या काकांना विचारायचो त्यांच्या कडे त्याची तर्कशुद्ध उत्तरे नव्हती पण त्यांनी सांगितलेल्या
भविष्याचा अनुभव मी स्वतः इतरांच्या तोंडून खूपदा एकला असल्याने व मला थोडे थोडे कुंडली वाचन आत्ता जमू लागल्याने या शात्रात काहीतरी दम आहे हे कळत होते पण अजून बरीच प्रश्न बाकी होते मग मी बाहेर कोणी क्लास घेत का हे पाहू लागलो..इतर ज्योतिषांना भेटू लागलो.. तेंव्हा मला खूप वाईट अनुभव आले.. या पवित्र शास्त्रात चालणारा अपवित्रपणा ,फसवणूक,लुबाडणे हे मी पहिले आहे.. थोडं फार तरी कळत असल्याने उगीच ग्रहांचे रत्न देणे,शांती सुचवणे व फसवे उपाय कळत होते बरं त्याबद्धल विचारलं कि म्हणायचे आमच्या गुरूने असेच शिकवले आहे व त्यामागील तर्क आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत.
असो.. आता सर्व काही ज्योतिषांचेच चुकते असे हि नाही.. मी पत्रिका फुकट पाहत होतो..पण जे व्यावयसाय म्हणून ज्योतिष करतात त्यांनी का फुकट पाहावी नाही का ? आणि फुकट म्हंटले तर लोक १० प्रश्न घेऊन उभे असतात वरती एखादे उत्तर चुकले तर ज्योतिश्याच्या नावाने खडे फोडायचे.. बर लोक पण ना मुला मुलीच्या लग्नाला लाखाने खर्च करतील पण लग्न कधी होईल हे उत्तर फुकटात हवे... आणि काही ज्योतिषी तर १००० - २००० च्या खाली पत्रिकेला हात लावत नाहीत.. मी बरेच वेळेला पाहिलंय मोठं मोठे जाहिरात करणारे..पुस्त्तक लिहिणारे जोतिशी दोन दोन हजार रुपये घेऊन काडीचा मात्र योग्य भविष्य सांगत नाहीत..फक्त नाव मोठं..
काही ज्योतिषी तर असे भेटले ते, मी सांगेन तसेच होणार असे ठामपणे सांगतात वर म्हणतात माझा अभ्यास तेवढा आहे.. तिथेच समजून जा याला ज्योतिष किती कळाले ते..
बर चुकत जातकांचेही.. मला जेंव्हा जास्त लोक्कांचे मेसेज व मेल येऊ लागले तेंव्हा मी फुकट ज्योतिष सोडून इच्छित फी (जातकाच्या मनानुसार ११ रुपये सुद्धा चालतील) चालू केली तर अशी फी सांगून हि लोक नाही देत..
म्हणून मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे..तुम्हाला काय वाटत ज्योतिषी कसा असावा व कसा नसावा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

म्हणून मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे..तुम्हाला काय वाटत ज्योतिषी कसा असावा >> लोकांना जे ऐकायला आणि करायला चांगले वाटते... जे ऐकल्याने/केल्याने त्यांना आनंद होतो असेच भविष्य सांगणारा ज्योतिषी असावा असे वाटते.
तुम्ही ३० वर्शांच्या माणसाला जर 'तू १०० वर्षे निरोगी आयुष्य जगशील' असे भविष्य सांगितले आणि १००० रुपये फी घेतली तरी त्या १०० वर्षे निरोगी आयुष्य जगलेल्या माणसाला ७० वर्षे १००० रुपये गेल्याचे दु:ख सलत राहील.
तर चांगला ज्योतिषी तोच जो 'तू १०० वर्षे निरोगी आयुष्य जगशील' हे भविष्य एकही पै न आकारता सांगेल.

हे वरचे लिखाण विनोदी नसेल तर प्रश्नः
ज्योतिष्याला जर कळले की काही वाईट होणार आहे तर त्याने ते सांगायचे नाही? मग जाता कशाला ज्योतिष्याकडे?
लोकांना जे आवडेल ते सांगायला ज्योतिषी कशाला?
किती रुपये दिले तर दु:ख होणार नाही? नि पैसे दिल्याचे दु:ख होत असेल तर पैसे घेणार्‍या ज्योतिष्याकडे मुळात जाताच कशाला?

तो हितचिंतक असावा. तो चांगला समुपदेशक असावा. तो चांगला माणूस असावा. तो चांगला ज्योतिषी नसला तरी चालेल.

<<जे ऐकल्याने/केल्याने त्यांना आनंद होतो असेच भविष्य सांगणारा ज्योतिषी असावा असे वाटते.>>
मला वाटत लोक्काना नाउमेद करणारा नसावा असे तुम्हाला म्हणायचे असेल.. काही ज्योतिषी तर हातात पत्रिका घेतली कि
अक्षरश: फेकून दिलेली ऐकण्यात आहे माझ्या.. माझ्याकडे एक प्रेमी युगल आले होते पत्रिका जुळते का पाहायला.. मुलीला मंगळ होता
(आता मंगळावर वाद नको.. लोकांचे मंगळाबद्दल गैर समज दूर व्हावे म्हणून मी youtube ला व्हिडिओ टाकला आहे..मी हि सद्याच्या प्रचलित मंगळखुळाच्या विरोधात आहे) तर म्हणून हातात पत्रिका पाहून त्या ज्योतिष महाशयांनी पत्रिका फेकून दिली व हात नाचवत हि पत्रिका जुळत नाही असे सांगितले..
पण कधी कधी लोक्काना आवडेल ते सांगितले व तसे घडले नाही तर शात्रावरचा विश्वास उडतो.. निगेटिव्ह वाटले तरी स्पष्ट कल्पना द्यावी व धीर उमेद द्यावी
मुख्य घोड अडत ते फी मध्ये.. जे व्यावसायिक ज्योतिषी आहेत त्यांनी अगोदरच १००० रुपये फी सांगितलेली असेल व जातकाला याची कल्पना असेल तर उद्या त्याचे भविष्य चुकले तरी ज्योतिषाची चूक नाही..(जर ज्योतिषी त्याच १००% खरं होईल व नाही झालं तर फी परत असे म्हणत असेल तर व नंतर रिप्लाय करत नसेल तर ज्योतिषाची चुकी)

मध्य प्रदेशात बेतुल शहरात एक ज्योतिषी बाई आहेत. त्या पत्रिका न बघता केवल नावराशी वरून भविष्य सान्गतात. इच्छित फी अगदि एक रुपया दिला तरी चालतो.
सान्गायचा मुद्दा असा कि त्या (व्यवसायाने संगणक तज्ञ) आणि स्वत: मानसशास्त्राच्या अभ्यासक आणि एक उत्तम समुपदेशक आहेत ़़ जातकाच्या भविष्यात जर कळले की काही वाईट होणार आहे तर त्या अत्यन्त संयमित शब्दात कल्पना देतात त्याच बरोबर त्या परिस्थितीला सामोरे कसे जावे, अडचणीतून कसा मार्ग काढावा याबद्दल सूचना देतात .
मला वाटते की ज्योतिषी असा असावा.

<<तो चांगला माणूस असावा. तो चांगला ज्योतिषी नसला तरी चालेल>>
ज्योतिषी चांगला माणूस असावा हे ठीक पण तो ज्योतिषी नसला तरी चालेल हे काही समजलं नाही
चांगला माणूस असणं हे सर्वा साठीच आहे.. पण ज्योतिषाने चांगुलपणासोबतच शात्राची कोणती आचारसंहिता पाळावी असे वाटते ?
आणखीन एक सर्वांनी ज्योतिषी कसा असावा हे वर सांगितले तसेच जातक हि कसा असावा हे हि सांगावे...
काही जातक जनावर जन्मल्याची वेळ आणतात व याचा विवाह कधी हे विचारतात.. हे योग्य आहे का

ज्योतिषी चांगला माणूस असावा हे ठीक पण तो ज्योतिषी नसला तरी चालेल हे काही समजलं नाही>>>> म्हणजे त्याचे तान्त्रिक ज्ञान कमी असेल तर एक्वेळ चालेल.

मनिम्याऊ,मी बैतुलला 45 वर्षांपासून राहते,पण अश्या बाई बद्दल कधी ऐकले नाही.जमले तर त्यांचे नाव कळव

<<मनिम्याऊ,मी बैतुलला 45 वर्षांपासून राहते,पण अश्या बाई बद्दल कधी ऐकले नाही.जमले तर त्यांचे नाव कळव

Submitted by समई on 11 December, 2018 - 15:17>>
समईताई, तुम्हाला विपू लिहिली आहे

लग्नामध्ये गडबड आहे, लग्नजीवन वगैरे - हे कळते ज्योतिषात म्हणून वीस पंचवीशीतल्या मुलीला कुंडलीत तुला चांगले योग नाहीत हे कुणी ज्योतिषी तोंडावर सांगणार नाही. भले तुम्ही त्यास काही म्हणा.

लग्नामध्ये गडबड आहे, लग्नजीवन वगैरे - हे कळते ज्योतिषात म्हणून वीस पंचवीशीतल्या मुलीला कुंडलीत तुला चांगले योग नाहीत हे कुणी ज्योतिषी तोंडावर सांगणार नाही. भले तुम्ही त्यास काही म्हणा. >>>>

असे नाही आहे. माझ्या माहितींमध्ये आहेत असे ज्यांनी मलाच असे सांगितले होते.

@रमेश रावल
बाकी काही म्हणणे नाही, पण ते ज्योतिष्याला शास्त्र म्हणू नका फक्त. बाकी चालू द्या.

<लग्नामध्ये गडबड आहे, लग्नजीवन वगैरे - हे कळते ज्योतिषात म्हणून वीस पंचवीशीतल्या मुलीला कुंडलीत तुला चांगले योग नाहीत हे कुणी ज्योतिषी तोंडावर सांगणार नाही. भले तुम्ही त्यास काही म्हणा.>> अगदी
हसबे गुरुंजींनी सांगितलेला किस्सा अंधुकसा आठवतो , गुरुजींना एका मुलीच्या पत्रिकेत उशिरा विवाह दाखवत होता जवळ जवळ
अजून ५ वर्ष तरी.. गुरुजींनी तिला सांगितले कि विवाहास विलंब आहे मात्र स्थळ उत्तम मिळेल.
यथावकाश त्या मुलीचे लग्न झाले..स्थळ जेमतेमच मिळाले पण मधील ५ वर्ष "स्थळ उत्तम मिळेल" या गुरुजींच्या वाक्याने चांगले गेले....

दुसरी एक कथा मी वाचली होती व माझ्या क्लास मध्ये हि मी ती अगोदर सांगत असे...
एका राजाला स्वप्नात त्याचे सर्व दात पडलेले दिसतात तो एका ज्योतिषाला बोलावून विचारतो कि याचा अर्थ काय? तर तो ज्योतिषी म्हणतो कि
महाराज तुमचे सर्व नातेवाईक तुमच्या समोर मरतील.. राजाला राग येतो तो त्या ज्योतिषाला फासावर लटकावण्याची शिक्षा सुनावतो व दुसऱ्या ज्योतिषास बोलावून
स्वप्नाचा अर्थ विचारतो.. दुसरा ज्योतिषी राजास सांगतो.. "महाराज तुम्ही खूप भाग्यवान आहात.. तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांमध्ये दीर्घायुषी आहात... "

<<पण ते ज्योतिष्याला शास्त्र म्हणू नका फक्त>>
मानसशात्राच्या बाबतीत हि हेच म्हणायचे का.. (मन नावाचे कोणतेही अवयव नाही मिळाले अजून)

ज्योतिषी म्हणजे वर्तमानातील माहितीवरुन भविष्याबद्दल ठोकताळे बांधणारा अशी व्यापक व्याख्या मनात धरली तर...

ज्योतिषी ग्रह्/तारे यांच्या स्थितीवरुन भविष्य सांगणारा नसावा
ज्योतिषी डीएनए अ‍ॅनॅलिसिस करुन संभाव्य रोगांची सुचना देणारा असावा

ज्योतिषी कुंडली बघुन, गुण जुळवुन लग्नाचं भवितव्य ठरवणारा नसावा
ज्योतिषी व्यक्तिसापेक्ष स्वभावधर्म समजुन घेउन, समुपदेशन करुन नात्यातले संभाव्य वाद नजरेस आणुन देणारा असावा

ज्योतिषी चुकीच्या माध्यमातुन काहितरी वाचुन अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणारा नसावा
ज्योतिषी नियंत्रित महविद्यालयातुन पदवी/पदव्युत्तर शास्त्रीय शिक्षण घेणारा असावा

ज्योतिषी "ज्योतिषी" नसावा
ज्योतिषी डॉक्टर/अ‍ॅनॅलिस्ट/समुपदेशक असावा.

अन्यथा खाली पुम्बा यांनी लिहिल्यानुसार रुढार्थाने ज्याला "ज्योतिषी" म्हटले जाते त्या मर्यादीत व्याख्येनुसार ज्योतिषी नसावा

ज्योतिषी डीएनए अ‍ॅनॅलिसिस करुन संभाव्य रोगांची सुचना देणारा असावा>>>>

म्हणजे ज्योतिषाला उच्च वैद्यकीय ज्ञान पण हवे. भारीच आहे मागणी.

>> म्हणजे ज्योतिषाला उच्च वैद्यकीय ज्ञान पण हवे. भारीच आहे मागणी

तुम्ही अमुकतमुक केले किंवा नाही केले तर तुमच्या आरोग्याला क्ष धोका संभवतो अशी भविष्यवाणी करायला उच्च वैद्यकीय ज्ञान नक्कीच हवे.
मला वाटलं होतं तुम्ही समंजस वाचक आहात साधनाताई, पुर्ण संत्र सोलुन द्यायला हवं का?

ज्योतिष हे statistical science वर आधारित आहे इतपत मान्य करायला हरकत नाही !

>लग्नामध्ये गडबड आहे, >>
म्हणजे त्यातला जरा वाइट योग म्हणतो आहे.
बरं उशिरा करा सांगितले तरी त्याच्या मागेच लागतात सांगाच काय वाइट आहे.

आपल्या शास्त्र्/कला/शक्तीवर लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी इथल्या भविष्यवेत्त्यांना सुवर्णसंधी. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाचे भाकीत वर्तवून इथे प्रसिद्ध करा.

<<आपल्या शास्त्र्/कला/शक्तीवर लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी इथल्या भविष्यवेत्त्यांना सुवर्णसंधी. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाचे भाकीत वर्तवून इथे प्रसिद्ध करा>>
जातक कसा नसावा याच हे उदाहरण..
ज्योतिषामध्ये होरा आणि मेदनीय हे भाग असतात.. त्यातील वयक्तिक माणसाचे / जातकाचे भविष्य वर्तवणारा भाग होराज्योतिष व एका राष्ट्राचे/समूहाचे
भविष्य सांगणे हे मेदनीय ज्योतिषात येते...
मेदनीय ज्योतिषांपैकी कुणाला याचे उत्तर द्यायचे असल्यास द्यावे पण प्रश्न विचारण्याची त्यामागील भावना ज्योतिषशात्राला खिजवण्याची दिसत आहे
म्हणून ज्योतिष कसा नसावा याच बरोबर जातक कसा नसावा हेही महत्वाचे आहे...
हे ज्योतिष शिकल्यावरच समजेल.. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये गेलेली लाईट कधी येईल,मित्र कधी येईल याचे उत्तर देता येते रुलिंग प्लॅनेट च्या साह्याने..
मी सुरवातीला जेंव्हा कृष्णमूर्ती पद्धत शिकायला चालू केली तेंव्हा सर्व गणित हातानेच करायला लागत असे .. त्याच दरम्यान मी नवीन डेस्कटॉप घरी घेतला होता
माझ्या मित्राने मला कुंडलीचे एक सॉफ्टवेअर दिले होते ते इन्स्टॉल कधी करू असे झाले होते.. पण घरी आल्यावर लाईट गेलेली कधी येईल माहित नाही.. निराश होऊन श्री शहासने सरांचे "कृष्णमूर्ती ज्योतिष रहस्य " वाचत बसलो त्यामध्ये लाईट कधी येईल हे गणित करून दाखवले होते त्याचाच आधार घेऊन गणित केलं व फक्त एक मिनिटाच्या फरकाने उत्तर बरोबर आलं.. मला तर हर्षवायूच झाला.. मी माझ्या भावाला हि घटना सांगितली व त्याचा विश्वास या शात्रावर बसावा यासाठी कधी लाईट गेली कि मी त्याला गणित करून सांगू लागलो.. पण प्रत्येक वेळी उत्तर चुकायच.. मी तो नाद सोडून दिला.. मात्र त्यानंतर खरंच ज्यावेळी कळकळीने प्रश्नाचे उत्तर मिळावे अशी वेळ असते त्यावेळी रुलिंग प्लॅनेट नि योग्य मार्गदर्शन केलेले आहे.. गणित तेच असले तरी त्यामागील भावना हि ज्योतिषशात्रात काम करते हे त्रिवार सत्य आहे

खूपच व्हेरिएबल्स आहेत. ज्योतिषाचं ज्ञान, योग्य पद्धत हे पुरेसं नाही.
विचारणाराची भावना, सांगणाराची भावना , मनःस्थिती यांनीही फरक पडतो तर.
म्हणजे ग्रहस्थिती एकच आहे, पण विचारणारा आणि स़ागणारा बदलला की उत्तर बदललं.
AI चा वापर अशक्यच दिसतोय. Sad

गणित तेच असले तरी त्यामागील भावना हि ज्योतिषशात्रात काम करते >>> देजावु म्हणायचे होते का !

------------

ज्योतिषामध्ये होरा आणि मेदनीय हे भाग असतात.. त्यातील वयक्तिक माणसाचे / जातकाचे भविष्य वर्तवणारा भाग होराज्योतिष व एका राष्ट्राचे/समूहाचे
भविष्य सांगणे हे मेदनीय ज्योतिषात येते...>>>

मेदनिय राहु दे ओ बाजूला सध्या. पण जी व्यक्ति उमेदवार म्हणून निवडणूक लढवतेय तिच्याबद्दल तर काही बोलाल की नाही उरलेल्या राज्यांबद्दल ! हां होरा मांडता येईल का शास्त्रानुसार ?

<<ज्योतिषी का असावा?>>
माझ्या अल्पबुद्धीने याचे नेमके उत्तर देता येईल कि नाही माहित नाही.. पण जे लोक कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहतात त्यांच्यासाठी ज्योतिषी (ज्योतिषीच काय देव पण नसावा.. ) कारण त्यांना वाटत असत कि आपण लाथ मारू तिथे पाणी काढू.. (कुठे लाथ मारायची या साठी ज्योतिषाचे मार्गदर्शन इतकेच, दहा लाथा मारण्याऐवजी चारच लाथा माराव्या लागतील)
पण हाताची सर्व बोट सारखी नसतात सर्व जण तुमच्या सारखे खंबीर नसतात.. काहीजण छोट्या छोट्या मानसिक तणावातून आत्महत्या करणारे पण असतात..
त्यांना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणणारे कोणीतरी हवे असते..
आता तुम्ही म्हणाल त्यासाठी ज्योतिषी कशाला हवा ?
तर ज्योतिषशात्रातून अंदाजे वाईट काळ चांगला काळ गोचर व इतर पद्धतीने कळतो.. नाव फुटल्यावर जे पोहत पोहत किनाऱ्यावर पोहचण्यासाठी धडपडत असतात ते कधीतरी दैवाजवळ हात टेकतात व प्रयन्त थांबवतात.. ज्योतिषशात्राने त्यांना कळेल कि अजून थोडे पुढे किनारा नसला तरी छोटेसे बेट आहे व ते अमुक दिशेला आहे , तू त्या दिशेने प्रवास कर.. म्हणजे प्रयन्त व दैवी साथ यांच्या जोडीने काम फत्ते होईल...
ज्योतिषी हा नशीब बदलू शकत नाही.. पण तो मार्गदर्शन करू शकतो..

<<< नेमका खिळा मारला. >>>
अगदी अगदी. लाईट कधी येईल हे तुम्ही गणित करून दाखवले आणि ते उत्तर एका मिनिटाच्या फरकाने बरोबर आले, हे असले तुमचे अगाध ज्ञान देऊन तुम्ही स्वतःच्या शवपेटीवर खिळा मारला आहे.

ज्योतिषी हा नशीब बदलू शकत नाही.. पण तो मार्गदर्शन करू शकतो. म्हणजे नक्की कसले मार्गदर्शन करणार? ज्योतिषाने सांगितले म्हणून अट्टाहासाने C-section करून मुलाचा जन्म अमक्या दिवशीच तमक्या वेळीच करणारी लोकं आपल्या देशात आहेत त्यांना मार्गदर्शन करणार की मुलीला मंगळ आहे सांगून लग्नाचा योग आता नाही म्हणून घाबरवायचे मार्गदर्शन करणार की मुलाला पाण्यापासून धोका आहे असे सांगून मर्चंट नेव्हीचा जॉब नाकारावा असले मार्गदर्शन करणार? माझे फक्त एकच म्हणणे आहे, ज्योतिष्यांनी स्वतःसाठी पाहिजे तो अभ्यास करावा, हवी ती ज्योतिष्याची पुस्तके वाचावीत, व्हिडिओ बघावेत, काहीच हरकत नाही. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा ते इतरांना सल्ले देऊ लागतात आणि इतर मूर्ख लोक त्याच्यावर विश्वास ठेऊ लागतात तेव्हा. कुठे लाथ मारायची या साठी ज्योतिषाचे मार्गदर्शन लागत नाही, सारासार बुद्धी आणि स्वतः विचार करण्याची क्षमता पुरेशी आहे.

ज्योतिष्याला शास्त्र का म्हणू नका आणि खरे शास्त्र कसे असते, यासाठी Richard P. Feynman: Theory, Prediction, Observation हा व्हिडिओ बघा. थोडा मोठा आहे, पण पहिली २३ मिनिटे महत्वाची आणि ईंटरेस्टिंग आहेत.

इतर मूर्ख लोक त्याच्यावर विश्वास ठेऊ लागतात तेव्हा. >> तुम्हाला त्या मूर्ख लोकांना शहाणे करून सोडायचे आहे का?
ऊद्देश खरच खूप चांगला आहे... पण मी म्हणेन 'तुम्ही शहाणे असाल तर हा ऊद्देश गाठायच्या फंदात पडणार नाही'
तुमची शक्ती अयोग्य ठिकाणी खर्च होऊ नये म्हणून लिहिले... कृपया गैरसमज नसावा. चुकीचे लिहिले असे वाटल्यास आधीच अनकंडिशनल माफी मागून टाकतो.

तुम्हाला बहुधा ज्योतिष्याचा धंदा चांगला कसा होईल या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. तुम्ही जसजसा धंदा वाढवाल तसतसा तुम्हाला अनुभव येत जाईल की हा धंदा करणार्‍या माणसाने कसे असावे.
इथे ज्यांनी हा धंदा केला आहे व यशस्वी झाले आहेत त्यांनीच उत्तर द्यावे. कदाचित या क्षेत्रातील अनुभवी अकॉउंटंट असतील तर त्यांचाहि सल्ला घ्यावा. साधारणपणे मायबोलीवर कोण खरा सल्ला देतात नि कोण नुसतीच टवाळी करतात हे ज्याला ओळखू येते, त्यानेच इथे असले प्रश्न विचारावेत, मजा म्हणून.

<<तुमचे अगाध ज्ञान देऊन तुम्ही स्वतःच्या शवपेटीवर खिळा मारला आहे>>
<<तुम्हाला बहुधा ज्योतिष्याचा धंदा चांगला कसा होईल या प्रश्नाचे उत्तर हवे आहे>>

जर मला ज्योतिषाचा व्यवसाय (तुम्हच्या शब्दात धंधा ) करायचा असता तर ते ज्ञान मला आहे..आणि मी मूर्ख नसल्याने <ज्योतिषी हा नशीब बदलू शकत नाही.. पण तो मार्गदर्शन करू शकतो> हे वाक्य बोलून मी माझ्याच शवपेटीवर खिळा मारला नसता..
हा लेख प्रपंच कशासाठी?.. मला ज्योतिष्याचा व्यवसाय करायचा आहे म्हणून ?.. तसे असते तर बाहेर मला बरेच भेटलेत.. मला एका सोनाराकडून चक्क ऑफर आली होती कि मी तुम्हाला ज्योतिषाचे ऑफिस काढून देतो तुम्ही फक्त आमच्याकडील रत्नाचे खडे सुचवा व जेवढे खडे जातील त्यातही कमीशन देतो...
मला भरभक्कम नसेल तरी पुरेश्या पगाराची नोकरी आहे.. व लोक्काना लुबाडून/फसवून खाण्याची प्रवूत्ती तर अजिबात नाही..तसे असते तर फुकटात मी हे ज्ञान दिले नसते.. मी साताऱ्याला कृष्णमूर्तीचे क्लास घेत होतो तेंव्हा फक्त जागेचे भाडे अधिक माझा पुणे ते सातारा प्रवास खर्च भागिले विद्यार्थी संख्या हि माझी फी होती.. मी हे शात्र शिकलो ( व शिकतच आहे) व मला वाटत कि काही निव्वळ पोटभरू ज्योतिषांमुळे या शात्राची बदनामी होते आहे.. तसेच एखादे शात्र लयास जाण्यास जसे त्याचे विरोधक कारणीभूत असतात तसेच त्याचे आंधळे समर्थक ही जबाबदार असतात..म्हणून लिहले..

Pages