खेळ विजेशी

Submitted by शिवाजी उमाजी on 10 December, 2018 - 01:45

खेळ विजेशी 

वर्गात हल्ली आभाळाच्या  
भरते सगळ्या ढगांची शाळा
'ढ' असलेला थोरला ढग 
जोरजोरात उगा काढतो गळा

पाहून त्याचं जोराचं रडू
एकदम लागले सारे रडायला
रडता रडता इतके रडले
लागला पाऊस मोठा पडायला

एक विज रस्ता चुकली
एकटीच सैरावैरा धावत सुटली
वाटेत लागलं मोठ झाड
आदळून त्यावर तीथेच पडली

चमकते जेव्हा विज कधी
झाडा खाली कुणी जावू नका 
धोका आहे तीच्यापासून
उगा विजेशी खेळ करू नका

©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त.. मस्त
शेवटचं कडवं आणि त्यातला संदेश खूप आवडला.