Submitted by शिवाजी उमाजी on 10 December, 2018 - 01:45
खेळ विजेशी
वर्गात हल्ली आभाळाच्या
भरते सगळ्या ढगांची शाळा
'ढ' असलेला थोरला ढग
जोरजोरात उगा काढतो गळा
पाहून त्याचं जोराचं रडू
एकदम लागले सारे रडायला
रडता रडता इतके रडले
लागला पाऊस मोठा पडायला
एक विज रस्ता चुकली
एकटीच सैरावैरा धावत सुटली
वाटेत लागलं मोठ झाड
आदळून त्यावर तीथेच पडली
चमकते जेव्हा विज कधी
झाडा खाली कुणी जावू नका
धोका आहे तीच्यापासून
उगा विजेशी खेळ करू नका
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त.. मस्त
मस्त.. मस्त
शेवटचं कडवं आणि त्यातला संदेश खूप आवडला.
मनापासून आभार... पुन्हा
मनापासून आभार... पुन्हा
मनापासून आभार... पुन्हा
मनापासून आभार... पुन्हा
छान आहे गाणं.
छान आहे गाणं.
अच्छा!!!! हसत- खेळत धोक्याची
अच्छा!!!! हसत- खेळत धोक्याची माहिती देतात तर लहानग्यांना!
मनस्वी धन्यवाद Srd व पाटील जी
मनस्वी धन्यवाद Srd व पाटील जी