पहिली कमाई – लाईफ टाईम मेमरी !

Submitted by AMIT BALKRISHNA... on 4 December, 2018 - 23:39

आयुष्यात काही गोष्टीना खूप महत्व असतं, जस कि शाळेचा पहिला दिवस, पहिली गाडी, पहिला मित्र/मैत्रीण, पहिलं प्रेम आणि नोकरी करीत असाल तर पहिला पगार, आणि व्यवसाय असल्यास पहिली कमाई ! सगळं कसं पहिलं वहिलं ज्यास अनन्य साधारण असं महत्व, सर्वसामान्य श्रेणीत हा विषय समान असावा अस मला वाटतं, कदाचित तुम्हीही सहमत असालं.. मी मागील एकोणवीस वर्षापासून व्यवसायात आहे पण मला आठवतं बरोबर एकवीस वर्षापूर्वी झालेला माझा पहिला पगार ! त्यावेळी मी कॉलेज शिक्षण पूर्ण करून एका कंपनीत “इंजिनीअर” म्हणून नोकरीस लागलो होतो, एक महिना/ तीस दिवस काम करायचं आणि पगारा दिवशी म्हणायचं “आजी सोनियाचा दिनू” असचं काहीतरी असतं चाकरमान्यांच ! माझ्याही आयुष्यात तो दिवस आला, खरचं खूप आंनद होतो, तो “धनादेश” अथवा रोख स्वरूपात (आज अवघड आहे !) मिळालेली रक्कम हातात घेवून....अगदी “आज मै उपर, आसमां नीचे” वगैरे म्हणाल्यासारखं !!
त्या दिवशी माझा पगार झाल्यानंतर घरी येताना अनेक विचार मनात आले, कसा खर्च करावा पगार ! आयुष्यात स्वत: कमविलेले पैसे ! आहा ! स्वत:चा एवढा अभिमान वाटतं होता, काय आणि किती सांगू तुम्हाला !! असचं होत असेल ना सगळ्यांना, का? मलाच काहीतरी दिव्य केल्या सारखं वाटतं होतं काय माहिती, आई-वडील कधीच मुलांकडे काही मागत नाही उलट ते देतच राहतात, माझी घरातील २४ तास सुरु असणारी बँक, म्हणजे बाबा !! या बँकेतून जेंव्हा जेंव्हा पैसे लागले तेंव्हा तेंव्हा ते लागलीच मिळाले देखील होते कधीच त्यास मज्जाव केला गेला नाही, पण आज माझी बँक सुरु झाली होती आणि आज माझा टर्न होता (अर्थात त्यांनी कधीच काही मागितलं नाही उलट आयुष्यभर देतच राहिले आणि मी घेत राहिलो ! जसा कि तो माझा जन्म सिद्ध अधिकारच आहे) मला काहीतरी नवं करायचं होतं पण काय करावं सुचत नव्हतं, मी त्याच विचारात सायकल चालवत घराकडे निघालो होतो, इतक्यात मला सुचलं कि आपल्याला वेळेचे महत्व शिकविलेल्या बाबांना एक नवं घड्याळ भेट द्यावं आणि कधीही “नवीन साडी घेवूयात अस म्हणालो तरी मला काय करायची नवीन साडी” अस म्हणणाऱ्या माझ्या आईला एक सुंदर साडी भेट द्यावी ! आणि हो माझी छोटी बहीण “आशु” हिला हि एक ड्रेस भेट देण्याचं मी ठरवलं. असा प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो आणि प्रत्येक जण तो वेग-वेगळ्या प्रकारे सेलीब्रेट करतो मीही करणार होतो आणि मी केले !!
खरेदीचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही आणि तो मला करायचा हि नाही तो एक लाईफ-टाईम अनुभव आहे (मी “होता” म्हणणार नाही कारण त्याची अनुभूती आजही आठवणीत ताजी आहे) खरेदी करून मी घरी आलो आणि पहिला पगार झाला, हि केलेली खरेदी अस सांगताच आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि डोळ्यात दिसणारं कौतुक पाहताना एक समाधान मिळालं.

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
04/12/2018
https://amitkamatkar.blogspot.com/
salary.jpgsalary.jpgsalary.jpgsalary.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अतुल! आपल्या जवळच्या माणसांची आठवण ठेऊन त्यांना भेट देण्यात भारी गंमत असते! तो आनंद भेट देणार्‍याला तसेच भेट घेणार्‍याला सारखाच होत असतो! तुमचे अभिनंदन

छान आठवण असते ही ...

माझा पहिला पगार खरे तर ईन हॅण्ड १४ हजार होता. पण आमचा सुरुवातीला बॉन्ड टाईप रूल होतात ज्यात सुरुवातीचे काही महिने काही पैसे कापले जाऊन ते दोन वर्षे थांबले तरच मिळणार. त्यामुळे फक्त सात ते आठ हजार रुपये पहिला पगार हातात आलेला. त्यात आई म्हणाली की आम्हाला काही नको पण पहिला तुला स्वत:ला एक छानसा मोबाईल घे. मी तेच केले.

पुढे नऊ महिन्यांनी पगारवाढ झाली तसे २० हजार हातात येऊ लागले. आणखी वर्षाने २६-२७ झाले. आणि तीनच महिन्यात बाँडची दोन वर्षे संपताच मी लागलीच जॉब बदलला आणि थेट ३६-३७ हातात येऊ लागले. तो जॉब लागला तेव्हाच आता पुढच्या महिन्यापासून मला दर महिन्याला ईतके पैसे मिळणार या विचारानेच कसला हर्ष झाला होता मला. आईने मात्र तेव्हाही मला काही नको म्हटले. पण तेव्हा फायनली मी तिला पहिल्यांदा काहीतरी घेतलेच. तिच्या आयुष्यातील सर्वात महागडी साडी. आणि नेमके तितक्यात एक तिच्या माहेरच्या फॅमिलीत लग्न होते. त्यात नेस म्हणालो. तसे तिने डोक्याला हात लावला. म्हणाली अरे ईतकी महाग साडी आपल्यात नवरीमुलगी सुद्धा नेसत नाही. एक्चुअली नेसतात. पण माझ्या काटकसरी जुनाट आईला कल्पना नव्हती की लोकं हल्ली कपड्यांवर किती पैसे खर्च करतात Happy

2010 साली माझा पहिला पगार 6000 होता. मी एक फोन घेतला होता आणि घरच्यांसाठी मिठाई.
बाकी मित्राच्या तुलनेत माझा पगार अत्यंत कमी होता पण अजूनपन ती मोमेंट आठवतेय पहिल्या चेक ची.देवापुढे ठेवला होता चेक.
आज वाटते की एक फोटो काढून ठेवायला पाहिजे होता, आठवण राहिली असती चेक ची.