अंडररेटेड सेलिब्रिटी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2018 - 15:58

ओवररेटेड सेलिब्रेटींच्या धाग्यावर सातत्याने या धाग्याची मागणी होत असल्याने....

ईथे लिहू शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न हा आहे की सुबोध भावे वर जे बायोपिक येईल त्यात जर स्वप्नील जोशी सुबोध भावे बनला>>>>> शक्य नाही.
आता लगेच काही सुभाचा बायोपिक येणार नाही. तर बायोपिक जेव्हा येइल तेव्हा स्वजोही सुभाएवढाच असेल.
जेव्हा येइल तेव्हाचा कुणी उमदा नट साकारेल सुभा. Happy

स्वप्निल जोशी एव्हरग्रीन चॉकलेट बॉय आहे. अजून पंधरा वर्षांनीही तो बालकृष्णाची भुमिका साकारू शकतो.

झिरोमध्ये शाहरूखचा रोल नवाझुद्दीन सिद्दीकीला द्यायला हवा होता का?>>> obviously yes..
ट्रेलर बघून झालेलं मत:
शून्य conviction = झिरोमधला शाहरुख..

स्वप्निल जोशी एव्हरग्रीन चॉकलेट बॉय आहे. अजून पंधरा वर्षांनीही तो बालकृष्णाची भुमिका साकारू शकतो.>>>
क्या बात है.. मस्त जमलाय पंच.. Lol हहपुवा

शाहरुखच नाही सांगता येत पण सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी यांनी इथले धागे वाचले तर मजा येईल .... कदाचित ऋन्मेषराव स्वप्नीलरावांचे खास मित्रपण असतील

मला सपनील रात्रभर भिजून फुगलेला चणा वाटतो.
( सेम विथ धारकका- पण ती ओव्हररेटेड आहे, अंदररेटेड नई, तिचा उल्लेख दुसऱ्या धाग्यावर केला पाहिजे)

माणिक इराणी
डॅन धनोआ
जॅक गौड
महेश आनंद

काही लोकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, बालकृष्णाची भुमिका स्वप्निलनेच अजरामर केली आहे. आजही करोडो लोकं जेव्हा डोळे बंद करून बालकृष्णाची आठवण काढतात तेव्हा गोड चेहरयाचा स्वप्निलच त्यांच्या डोळ्यासमोर येतो. लहान वयात अभिनयाची जाण सर्वांनाच नसते. एखादाच सचिन तेंडुलकर असतो जो सोळाव्या वर्षीच पदार्पण करून चमकतो. योगायोगाची गोष्ट म्हणजे असाच पराक्रम करणारया आणखी एका कलकाराचे नाव सचिनच आहे Happy

अगदी बरोबर ऋन्मेष, काही काही माणसं मोठी होतच नाहीत.
>>>>
येस्स
प्रत्येक लहान मुलाला वाटते की आपण लवकर मोठे व्हावे. आणि मोठे होणारया प्रत्येकाला वाटत राहते की आपण लहानच राहावे. पण प्रत्येकाला हे जमत नाही. काहीच नशीबवान असतात Happy

मुक्ता बर्वे ,
दुर्दैवाने तिची ओळख मुंबई पुणे मुंबई पर्यंतच राहिली आहे

मुक्ता बर्वे ,
दुर्दैवाने तिची ओळख मुंबई पुणे मुंबई पर्यंतच राहिली आहे>>>
काय सांगता??
आमच्यात तरी तिला हम तो तेरे आशिक है, कबड्डी कबड्डी , एक डाव धोबीपछाड, जोगवा, रुद्रम यांसाठी ओळखतात

कच्चा लिंबू. हे चित्रपट आपल्याला माहीत आहेत हे चांगलेच आहे.
हर्पेन. मलाही ते माहीत आहेच. किंबहुना सूक्ष्म विचार करता माझ्या वाक्याचा अर्थच तो होता की मुंबई पुणे मुंबई व्यतिरीक्तही तिचे सुण्दर अभिनयाने नटलेले चित्रपट आहेत.
पण मी ओवरऑल पब्लिक बद्दल बोलतोय. रस्त्यावर उतरून सर्व्हे घेतला तर समजेल..

हे चित्रपट आपल्याला माहीत आहेत हे चांगलेच आहे.>>>
कुठले चित्रपट?
माझ्या लिस्ट मध्ये फक्त चित्रपट नाहीत.
चित्रपट, नाटक, मालिका अशी तिन्ही माध्यमं आहेत

माझ्या लिस्ट मध्ये फक्त चित्रपट नाहीत.
चित्रपट, नाटक, मालिका अशी तिन्ही माध्यमं आहेत
>>>>

पुन्हा मुद्दा तोच !
तुम्ही मुक्ता बर्वेला किती ओळखता, काय म्हणून ओळखता हा मुद्दा नाहीये तर बहुतांश जनता काय म्हणून आणि कितपत ओळखते हा प्रश्न आहे.

@ मालिका, एका लग्नाची दुसरी की तिसरी गोष्ट.. पुन्हा मुक्ता-स्वप्निल ..

तिथे काही कलाकारांना ओवररेटेड म्ह्टले की त्यांच्या चाहत्यांना राग येतोय. ईथे अंडररेटेड म्हटले तरी लोकांना आवडत नाहीये. वेल डिझर्व्हड कलाकारांचा एक वेगळा धागा काढायला हवा.

मुक्ता बर्वे ला अंडर रेटेड म्हटले तर लोकांना राग येणारच ना, कारण ती ओव्हररेटेड आहे.
तिचे या धाग्यावर काय काम?

Pages