शाही चिकन कोरमा

Submitted by maitreyee on 19 November, 2018 - 08:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बोनलेस थाय चिकन -१ पाउंड, कांदा यलो ओनियन - १ मध्यम आकाराचा, आले १ इंच, लसूण - ३-४ पाकळ्या, हिरव्या मिर्च्या -२-३, धणे - १ चमचा, जिरे - पाउण चमचा, मिरी -५-६ दाणे, लवंगा ३-४, वेलदोडे आख्खे २, दालचिनी १ इन्च, काजू १०-१२, हेवी क्रीम - अर्धा कप, दूध अर्धा कप, कसुरी मेथी

क्रमवार पाककृती: 

हा प्रकार इथे जवळच्या रेस्टॉरन्ट मधे खाल्ला. अगदी माइल्ड आणि क्रीमी अशी ही ग्रेवी मुलांना फारच आवडल्यामुळे बर्‍याच वेळा ऑर्डर केली जाते. तेव्हा म्हटले चला, एकदा स्वतःच घरी करून मुलांची मज्जा घालवावी Proud
चिकन धुवून कापून मीठ, हळद, आले लसूण, मिरचीची पेस्ट लावून अर्धा पाउण तास मॅरिनेट करून ठेवावे. कांदा उभा कापून थोड्या तेलावर सोनेरी रंगावर छान परतून घ्यावा. हा परतलेला कांदा आणि काजू यांची ( कमीत कमी पाण्यात) पेस्ट करून बाजूला ठेवावी. धणे, जिरे, मिरी, वेलदोडे, लवंगा, दालचिनी मंद आचेवर भाजून त्यांची पूड करावी. ही झाली तयारी. हे झाल्यावर जाड बुडाची कढई गरम करून तेल घालावे. ते तापले की मॅरिनेटेड चिकन घालून १-२ मिनिट (लसणाचा कच्चा वास जाईपर्यन्त) परतावे. त्यात कांदा+काजूची पेस्ट , वाटून ठेवलेला मसाला, घालून थोडे परतावे. मीठ चवीप्रमाणे , कन्सिस्टन्सी हवी तशी येण्यासाठी साधे दूध घालावे. मी पाणी नाही घालत यात. क्रीमी ग्रेवी हेच वैशिष्ट्य आहे या रेसिपीचे. यात आंबट काही नसल्याने दूध फाटत नाही. नीट हलवून मंद आचेवर ३-४ मिनिटे चिकन टेंडर शिजेपर्यंत ठेवावे. हेवी क्रीम आणि कसुरी मेथी घालावी, जरा वेळ वाफ जिरेपर्यन्त झाकण लावून ठेवावे आणि मग नान / पराठ्यासोबत खायला घ्यावे.
chicken kurma.png
फोटो फारसा चांगला आलेला नाही - अचानक लक्षात आल्यासारखा काढलेला आहे Happy पण हा पदार्थ खायला यापेक्षा नक्कीच छान लागतो, आय प्रॉमिस! Happy

वाढणी/प्रमाण: 
हे वरचे प्रमाण २-३ लोकांना पुरावे.
अधिक टिपा: 

तिखट जास्त हवे तर हि. मिरची वाढवावी पण ही रेसिपी माइल्ड च छान लागते.
हेवी क्रीम नसेल तर हाफ न हाफ दूध घातले तरी चालेल. ते वापरल्यास साध्या दुधासोबत चिकन शिजतानाच घालावे.
चिकन नको असेल तर फॉर अ चेन्ज, पनीर वापरूनही ही ग्रेवी मस्त लागते Happy

माहितीचा स्रोत: 
रेस्टॉरन्ट मधले खाऊन स्वतः केलेले प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

येस मी आपले हे तेच घालून करोन पाहीन. ग्रेव्ही टेस्टी वाटतेय एकदम.
प्लेटमधला प्रांठा जास्त भाव खातोय. कसलाय?

छान पाकृ.
प्लेटमधला प्रांठा जास्त भाव खातोय. >>+१. गार्लिक नान आहे वाटते .

मस्त रेसिपी Happy
<< प्लेटमधला प्रांठा जास्त भाव खातोय. >>+१. गार्लिक नान आहे वाटते .
मला आलू परोठा वाटतोय Proud

खोपडी एकादशीच्या निमित्ताने आमच्यासोबत तुम्ही ही नॉणव्हेज रेस्पी टाकून पुण्यात वाटेकरी झाल्याबद्दल धन्नेवाद!
रेस्पी करूण पाहणेत येईल.

त.टी.
पुण्ण्यात.
त.त.टी.
पुण्यात आमची कोणतीही जहागीर नाही. असली तरी त्यात कुणी वाटेकरी होण्याची शक्यता नाही.
हे निगडीत व्यक्तींनी ध्यानी घ्यावे Lol

अरे वा, मस्त. Happy
दीर्घसप्ताहांताला लेक घरी येतोच आहे, नवीन रेसिपी ट्राय करता येईल (त्याला! Proud )

>>> एकदा स्वतःच घरी करून मुलांची मज्जा घालवावी
Lol

प्लेटमधला प्रांठा जास्त भाव खातोय. कसलाय? >>> घ्या, आता परत आमच्या पटेल ची जाहिरात करावी लागणार! आमच्या इथल्या पटेल ब्रो. मधे हे रोटी आणि नान यांच्या मधले प्रकरण मिळते. एकदम फ्रेश लुसलुशीत , नान च्या पेक्षा लाइट वाटतात खायला. हे गार्लिक वाले आहेत.
खोपडी एकादशी >> Lol भंपक बोटीत एकादश्या सेलिब्रेट होत नसल्याने लक्षातच आले नाही!

टोमॅटो नाहीच आणि दुधात शिजवलंय तरी इतका सुंदर लाल रंग कसा आलाय पदार्थाला ? Happy नक्की करुन बघणार. मस्त रेसिपी !
चार हिरव्या मिरच्या घालून ग्रेव्ही माईल्ड होते हे वाचूनच मला घाम फुटला Proud

रंग फिका ब्राउनिश येतो जरा. कांदा परतून ग्रेवी मधे आहे ना, त्यामुळे. चिकन मॅरिनेशन मधे हळद आहे . इथे मिरच्या लहान लहान मिळतात म्हणून ४ लिहिल्या होत्या. कमी घातल्या तरी अगदी चालतील. बदलच करते रेसिपीत.

आमच्या इथल्या पटेल ब्रो. मधे हे रोटी आणि नान यांच्या मधले प्रकरण मिळते. एकदम फ्रेश लुसलुशीत , नान च्या पेक्षा लाइट वाटतात खायला. हे गार्लिक वाले आहेत.>>> येस्स! वाटलेच मला. भारी लागतात.

रोटी आणि नान यांच्या मधले प्रकरण > नाव सांगा की ओ...!
पनीर चा शोध लागलाय नुकताच फ्रीजर उत्खननात. चांगलं सीलबंद पाकीट गावलंय. रेस्पी नक्कीच घडणार आता...

मस्त. नक्की करणार.
३-४ मिनिटे आणि वाफ जिरेपर्यंत म्हणजे आपल्या त्या ह्यांच्या भाषेत स्टंट पॉटात केलंय का? त्यात केलं तर आमच्या कडे दोन मार्क जास्त मिळतात. Proud
आरारा Rofl

मस्त वाटते आहे रेसिपी. वीकेंडला टर्की आणि मॅश्ड पटेटो ला उतारा म्हणून करणेत येईल

छानच आहे रेसीपी. दोन चमचे टोमाटो प्युरे घातले व दुधा ऐवजी सर्व्ह करताना क्रीम घातले की बटर चिकन. ह्या बरोबर मलबार पराठा किंवा पुदिना पराठा मस्त लागतो. एवंच पनीर घालून करते . अमृतसर मध्ये एकाठिकाणी पूर्ण पणे दुधात शिजवलेले व सायीत बनवलेले चिकन मिळते. त्यात मिरेपूड वगैरे घालतात. असे रॉकी मयूर शो मध्ये पाहिले होते. त्या लेव्हलचे लागत असेल मस्त पैकी.