पौष्टिक सलाडः- मेथी

Submitted by अतरंगी on 16 November, 2018 - 04:17

तेल, साखर, मीठ या सर्वाने होणारे नुकसान सर्वांनाच माहित आहे. ते वगळून पण ताटातील सर्व महत्वाचे घटक आणि त्यातून मिळणारे पोषक मुल्य मिळातील अशा सलाडच्या पाककृतींसाठी ही मालिका. ही सगळी सलाड आपल्या जवळच्या भाजी मंडईत मिळणार्‍या घटकांपासून आणि घरी बनवता येण्यासारखी आहेत.

घटक क्र १:- मोड आलेली मटकी (एक मुठ)
घटक क्र २:- मेथी ( एक वाटी)
घटक क्र ३:- किसलेले गाजर ( अर्धी वाटी)
घटक क्र ४:- छोटे/ मध्यम आकाराचे डाळींब.
घटक क्र ५:- सुर्यफूल, कलिंगड, भोपळ्याच्या बिया, पाइन नट्स ( सर्व मिक्स करुन दोन ते तीन चमचे)

कृती:-
मटकी धुवून घ्या
डाळींब सोलून घ्या
मेथी धुवून निवडून घ्या

मटकी स्टीम बास्केट वापरुन वाफवून घ्या. सगळे घटक पदार्थ एक बाउल मधे मिक्स करुन घ्या.

WhatsApp Image 2018-11-16 at 2.25.51 PM.jpeg

टीप्सः-
१. मी मेथी वाफवत नाही. कच्चीच चांगली लागते. पाने मोठी असतील तर चिरुन घ्यायला विसरु नका.
२. असेच सलाड मेथी, मटकी, थोडा कांदा, टोमॅटो टाकून पण बनवता येते.

मागच्या कारल्याच्या सलाड नंतर दुसरे सलाड काहीही कडवट किंवा डाळींब न टाकता करायचा प्लॅन होता. पण आज हाताशी वेळ असल्याने मी बर्‍यापैकी नियमितपणे करतो तेच सलाड पोस्ट करतो आहे. Happy

मी स्वतः आहारतज्ञ नाही, मला त्यातले काही कळत नाही. हा आहारविषयक सल्ला नाही. मीठ, तेल, साखर विरहीत जेवण बनविण्याच्या अट्टहासात तयार झालेल्या/ मिळालेल्या/ ट्राय केलेल्या रेसीपी आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! सुरेख लागेल.
आणि नाही लागले तरी सलाड कंटीन्यू करणार आहे.
मी मेथी थोडी वाफऊनच घेईन.
अतरंगी, अजुन पाकृ येऊद्या.

सोपी आणि खाउ शकेन अशी सलाद रेस्पी.
करुन खाउन बघेन.
मला मेथी म्हणजे मेथीचे दाणे घातलेत असं वाटलं. मटकी दिसतेय पण तशीच.

मस्त लागेल
मेथी कोवळी असेल तर अजूनच.

रेसिपी मस्त आहे.

समुद्रमेथी बारीक चिरुन त्यात बारीक कापलेला कांदा,दाण्याचे कूट, हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या.हे सारे कच्चे घ्यायचे.त्यावर लिंबू पिळायचे.वरून हिंग राईची अतिशय कमी तेलाची फोडणी घालायची.अजिबात कडू लागत नाही.

अत्रंगी अप्पा,

सॅलडला कपडे नाई घातलेत?

नुसतं कच्चं/वाफवलेलं एकत्र केलंत. ड्रेसिंग काहीच नाही का? अगदी मीठ-चाटमसाला-लिंबू-ऑऑ इत्यादी?
बिनमसालावाले फिरंगी पण ब्लँड म्हणतीलसं वाटतंय.

बाकी,

मीठ, साखर, तेल यांनी नक्की काय नुकसान होते? (रीफाइन्ड शुगर जाऊ द्या, इतर गोडवा बर्‍याचप्रकारे मिळतो. उदा. मध, फळांतील साखर.)

सर्वांचे धन्यवाद. Happy

मीठ, साखर, तेल यांनी नक्की काय नुकसान होते?>>>>

यांच्या अतीसेवनाने असा गर्भित अर्थ आहे Wink

मी सलाड मधे फळे वापरतो. फळे वापरुन केलेले सलाड लवकरच टाकेन.

या सलाड वर लिंबू, मीठ चांगला लागत नाही. देवकी यांनी टाकलेले किंवा मी टिप्स मधे टाकलेली जी दुसरी रेसीपी आहे त्यात चांगले लागते.

नुसतं कच्चं/वाफवलेलं एकत्र केलंत.>>>>
मी ड्रेसिंगच्या फंदात पडत नाही. कधी तरी निवांत एखाद्या दिवशी सलाड खायचे असेल तर ड्रेसिंग करता येईल पण जर रोज एक वेळ सलाड वर रहायचं असेल तर सगळी कामे संभाळून ड्रेसिंग करणं मला तरी अवघड आहे.

आधी मी विकत आणलेली ड्रेसिंग वापरत होतो. पण रोज रोज ते बोअर होतं. शिवाय त्यातून जाणार्‍या कॅलरीज, preservatives वगैरेचा हिशोब कोण करत बसणार. आता वर्षानूवर्ष बिना ड्रेसिंगची सलाड खाउन खाउन मला त्यांची नैसर्गिक चवच आवडायला लागली आहे. Happy

मला आवडले हे सॅलड. कोवळी मेथी वापरुन करेन, म्हणजे कडवट लागणार नाही. मटकी ऐवजी मोडाचे हिरवे मुग पण छान लागतील. पण मटकी सुद्धा कच्ची मस्त लागते.