एक रहस्यमयी डोंगर (अंतिम भाग)

Submitted by Vaibhav Bhonde on 10 November, 2018 - 06:03

इकडे रामचा मंत्रोच्चार अखंडपणे चालूच होता. मग त्याने रामला अडथळा आणायला सुरुवात केली. पण रामभोवती
त्याचे अडथळे पोहचू सुद्धा शकत नव्हते. कारण रामने दोघांच्याभोवती सुरक्षाकवच आखले होते. त्याने वार्याने अडथळा आणायचा प्रयत्न केला पण त्याने सुद्धा काही उपयोग झाला नाही.
आता भूताचे काही. चालणार नव्हते आणि त्या द्रष्ट शक्तीचेही. ज्या द्रष्ट शक्तीने त्या डोंगरावर ताबा ठेवला होता
ती द्रष्ट शक्ती सुद्धा हरणार होती. कारण ते मंत्र एवढे शक्तीशाली होते की आता काय पुढील वर्षात तेथे भूत सुद्धा भटकू शकणार नाही.शेवटी ते भूत असहाय्यपणे मरणाच्या गर्तेत ढकलले गेले आणि त्याची मुक्तता. झाली.
त्याचा आत्मा आता मुक्त झाला आणि आता तो चालला होता पुढील प्रवासाला. जाता-जाता त्याने रामला आशिर्वाद
दिला की इथून पुढे तु उच्चारलेल्या मंत्राची ताकद १०० पटींनी वाढणार.
आता ती द्रष्ट शक्ती सुद्धा हतबल झाली ती प्रकट झाली. ती द्रष्ट शक्ती म्हणजे भूतांची राजा होती. ती रामला म्हणाली "आता मी या डोंगरातून जात आहे कारण या डोंगरात तुझ्या मंत्राची ताकद आहे. इथे आम्ही राहू शकत नाही .आता तू आम्हाला या डोंगराच्या बाहेर जाउ दे.मी तुला वचन देतो की या डोंगरात असलेल्या सर्व भूतांकडून मानवजातीला कोणतीही हानी होणार नाही .आम्ही कधीही
कोणाला त्रास देणार नाही."मग रामने डोंगराभोवती असलेले बंधनास्त्र काढून घेतले. मग त्या द्रष्ट शक्तीने रामचे आभार मानले आणि ती त्या डोंगराच्या बाहेर जायला लागली. त्या मागून सर्व भूतेही त्या डोंगराच्या बाहेर जायला लागली. त्याचबरोबर रामचे आणि सचिनचे शरीर पूर्वरुपात आले.
एवढा वेळ चाललेला खेळ सचिन बघत होता. आत्ता त्याच्या जीवात जीव आला होता .त्याला अभिमान होता की त्याला रामसारखा मित्र मिळाला. आता त्या डोंगरात कोणत्याही द्रष्ट शक्तीचा वावर राहिला नव्हता. लगेच थोड्याच वेळात तेथे पक्षी किलबिलाट करायला लागली .
मधुर स्वर ऐकायला येउ लागले. मग ते आता परतीच्या प्रवासाला लागले. घरी लवकर पोहचायचे होते .साधारणतः ते ६:०० ला घरी पोहोचले .
आता ते पुढच्या रविवारी सर्व मित्रमंडळींना त्या डोंगरात घेऊन जाणार होते आणि मस्त आनंद लुटणार होते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults