एक रहस्यमयी डोंगर 3

Submitted by Vaibhav Bhonde on 5 November, 2018 - 11:14

'विनाशकाले विपरीत बुद्धी' .लगेच रामने आणि सचिनने ती फळे तोडली आणी खाल्ली .खूपच स्वादिष्ट लागले ते फळ त्यांना .एवढ्यातच त्यांना त्यांच्या शरीरात बदल जाणवू लागला. त्यांचे शरीर बदलत होते . हाताची नखे खूप वाढली होती. केस वाढत होते.एखाद्या भूताप्रमाणे आता त्यांचे शरीर झाले होते आणि निलेशनेही आता त्याचे रूप
बदलले होते. तो आता त्याच्या खर्या रूपात आला होता. तो सुद्धा एक भूत होता. त्याने त्याचे काम साधलै होते.
एवढ्यात निलेशच्या रूपातील भूत बोलू लागले,की कसे फसले तुम्ही माझ्या जाळ्यात ,कसे फसवले मी तुम्हाला.
आता मी तुम्हाला माझा गुलाम बनवणार. आता अवघ्या 30 मिनिटात तुम्ही पूर्णपणे भूत होणार .पण राम आणि सचिन घाबरणार्यांतले नव्हते .राम चे वडील पंडित होते. त्याला सुद्धा मंत्रा-तंत्राचे ज्ञान अवगत होते. त्याने
लगेच मंत्र म्हणायला सुरुवात केली. ते साधे-साधे मंत्र नव्हते.त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेले अमोघ
असे ते मंत्र होते. त्या मंत्राने ते भूत घाबरायला लागले. ते दूर पळू लागले. पण रामने अगोदरच त्या डोंगराच्या भोवती
मंत्राने एक सीमारेषा आखली होती. ते भूत त्या सीमारेषेच्या बाहेर जाउच शकत नव्हते. ते भूत सीमारेषेच्या जवळ गेले की लांब फेकले जायचे.
इकडे रामचा मंत्रोच्चार अखंडपणे चालूच होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users