एक रहस्यमयी डोंगर 2

Submitted by Vaibhav Bhonde on 5 November, 2018 - 08:30

आता ते द्रुष्ट शक्तिच्या नियंत्रणात असलेल्या जागेत घुसत होते. ते दोघे आता संकटाच्या खाईत जात होते. हे त्यांंना ठावूकच नव्हते .एवढ्यात राम सचिनला म्हणाला " हे डोंगर मस्त आहे पण आपण आणखीन मित्रांना आणायला पाहिजे होते. डोंगरात कोणीही मनुष्यप्राणी नसल्यामुळे खूप भीतिदायक वातावरण होते ते.
आतातर ते अश्याठिकाणी आले होते जेथे सूर्यप्रकाश
सुद्धा पडत नव्हता.
एवढ्यात त्यांना झाडाच्या मागून कोणीतरी येताना दिसले , तो व्यक्ती त्यांच्याच दिशेने येत होता. तो व्यक्ती दुसरा-तिसरा नसून त्यांच्याच वर्गातला निलेश होता.
सचिनने विचारले की निलेश तू इकडे कसा. तर निलेश म्हणाला की "लाकडे गोळा करण्यासाठी आलतो ,ह्या डोंगराच्या पलीकडेच माझे घर आहे .तुम्ही दोघे इकडे कसे निलेश म्हणाला."
"आम्ही आलतो डोंगर बघायला "राम म्हणाला. मग ते तिघेजण डोंगर पाहत-पाहत मार्गक्रमण करतात.मग निलेश
त्यांना डोंगर दाखवितो .विविध प्रकारची झाडे दाखवितो.
मग अचानकच त्या तिघांना दोन मोठमोठाले झाडे
दिसतात. त्या झाडांची पाने चमकत असतात.ती झाड खूपच चमत्कारिक असतात. त्यांंना फळे लटकत असतात.ती फळे पाहिल्यावर कोणालाही ती फळे खाण्याचा मोह झाला असता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users