बळीराजा

Submitted by सो भि या on 4 November, 2018 - 03:54

बळीराजा

थेंब थेंब धरनीवर
पाणी मातीत नीतळे
ओला सुवास मातीचा
गार वाऱ्यात घुसळे

खोल मातीच्या कुशीत
आहे नीजल बियान
आणि थेंबाच्या स्पर्शाने
उठे डोळे चोळुन

आत अंकुरला बीज
घेई झेप आभाळाला
ओटी धान्याची भरुन
उभा राहील सुगीला

जन्म सार्थकी लागला
बळीराज्याच्या सेवेत
हाच एक राजा थोर
ज्याच्या मुठीत पोषण

बीज रोपाच्या रुपात
पाहे जगाचे वागणे
भोग धन्याचे भोगणे
ओल्या डोळ्यात तरारे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users