कुठले पॉडकास्टस ऐकता?

Submitted by स्वप्ना_राज on 2 November, 2018 - 12:30

गेल्या अनेक महिन्यांपासून मी सगळ्या एफएम चॅनेल्सना रामराम ठोकलाय. बीबीसी वरून डाऊनलोड केलेले बरेचसे पॉडकास्टस ऐकतेय. सहज वाटलं की इतर मायबोलीकर काय ऐकतात ते विचारावं. तुम्ही ऐकत असलेल्या पॉडकास्टस बद्दल लिहाल का?

माझी बीबीसी पॉडकास्टसची लिस्ट पुढीलप्रमाणे:

१. हिस्टरी अवर: https://www.bbc.co.uk/programmes/p016tmg1/episodes/downloads - जगातल्या सद्य आणि भूतकालीन घटनांवर आधारित. प्रत्येक एपिसोड जवळजवळ ४५-५० मिनिटांचा. त्यात ४-५ विषय असतात.

२. विटनेस: हttps://www.bbc.co.uk/programmes/p004t1hd/episodes/downloads - हिस्टरी अवर मधलेच भाग सुटे करून. प्रत्येक भाग ९ मिनिटांचा. विटनेस ऐकायला लागल्यापासून मी हिस्टरी अवर ऐकायचं सोडलंय. त्यात कदाचित अधिक माहितीही असू शकते.

३. डेथ इन आईस व्हॅली: https://www.bbc.co.uk/programmes/p060ms2h नोव्हेंबर १९७० मध्ये नॉर्वेच्या एका व्हॅलीत एका स्त्रीचं मृत शरीर सापडलं. ह्या गुन्ह्याच्या उकलीची माहिती देणारा पॉडकास्ट. एकूण १० एपिसोड्स.

४. अ‍ॅसासिनेशन: https://www.bbc.co.uk/programmes/p05r6cgx/episodes/downloads पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तों ह्यांच्या हत्येबाबत तपासाची माहिती देणारा पॉडकास्ट. एकूण एपिसोड्स १०.

५. क्केकः https://www.bbc.co.uk/programmes/p052lph7/episodes/downloads कल्पित कथा. भूकंपात अडकलेल्या विविध लोकांच्या दृष्टीकोनातून कथन केलेली. एकूण एपिसोडस १२

६. हू किल्ड एल्सी फ्रॉस्ट: https://www.bbc.co.uk/programmes/p02vn2mt/episodes/downloads ऑक्टोबर १९६५ मध्ये यूकेमध्ये हत्या झालेल्या एल्सीच्या मारेकर्‍याचा शोध घेणारा पॉडकास्ट. एकूण एपिसोडस १०

७. बॉडी ऑन द मूर: https://www.bbc.co.uk/programmes/p03wy14r/episodes/downloads यूकेमधल्या एका moor वर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवणं आणि मृत्यूचं कारण शोधणं ह्या हेतूने केलेल्या तपासाची कहाणी. एकूण एपिसोडस ७

८. अवर मॅन इन द मिडल इस्टः https://www.bbc.co.uk/programmes/b08rmkcd/episodes/guide मध्यपूर्वेच्या इतिहासातल्या अनेक घटनांचा वेध तसंच सद्यस्थितीचा आढावा.

९. जर्मनी मेमरीज ऑफ अ नेशनः https://www.bbc.co.uk/programmes/b04dwbwz/episodes/downloads

ह्याखेरीज https://www.bbc.co.uk/programmes/p02nq0lx/episodes/downloads इथेही खूप छान माहिती मिळते.

हॉरर स्टोरीज आवडणार्यांना https://www.thenosleeppodcast.com/ सुध्दा आवडेल.

https://serialpodcast.org/season-one - हाही खूप इंटरेस्टींग होता. सीझन २ चा विषय आवडला नाही म्हणून स्किप केला. सीझन ३ https://serialpodcast.org/ इंटरेस्टींग वाटतोय. डाऊनलोड करून बघेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऍमेझॉन ची audible ही पुस्तके ऐकण्याची सर्व्हिस भारतात लाँच झाली आहे .

३० दिवस फ्री असून नंतर महिना १९९ रु , १३४५ रु सहा महिने व २३३२ रु १२ महिने असे प्लॅन्स आहेत.

जरूर ट्राय करून बघा .

https://play.google.com/store/apps/details?id=com.audible.application&hl=en

उत्तम धागा!

खुपच पोड् कास्ट्स आहेत. पण मला खर्‍या आयुष्यात घडलेल्या गोष्टी ऐकायला आवडतात.
वर अजुन धिस अमेरिकन लाईफ चे नाव नाही आले! हा घ्या दुवा: https://www.thisamericanlife.org/

आणि रेडियोलॅब्स
https://www.wnycstudios.org/shows/radiolab

(यातही काहीवेळा अतिशय हुषारीने चपखलपणे राजकिय अजेण्डे घुसवलेले असतात.)

याशिवाय बेटी इन द स्काय विथ सुटकेस मजेदार किस्से ऐकवते.
https://www.bettyinthesky.net/

अरे वा! मस्तं आहे हा धागा.

@स्वप्ना_राज
आयटीमधल्या लोकांनी मशिन लर्निंग, आर्टिफिशल इन्टेलिजन्स, ब्लॉकचेन ह्या विषयांवरचे प्राथमिक माहिती देणारे काही पॉडकास्ट्स असतील तर प्लीज सांगा. मी मध्यंतरी एक लिस्ट बनवली होती पण एकही ट्राय नाही केला. >>

१. http://ocdevel.com/mlg/1
याच्या पहिल्या भागात इतर पॉडकास्टबद्दल पण माहिती आहे. अजून असे इतर विषयांबद्दल बेसिक्स कोणाला मिळाले तर नक्की टाका.

@ टवणे सर,
२. http://boltipustake.blogspot.com/
हा पॉडकास्ट नाही. जुनी मराठी ऑडीयो बुक्स आहेत. ज्यांना थोडा वेळ आणि इंटरेस्ट असेल ते लोक स्वतःही सहभागी होउ शकतात.

Cambridge university siteवर ग्रीक पौराणिक कथा मिळाल्या त्या ऐकतोय.
Storytel.in - मेघना एरंडे मुलाखत.

पॅाडकास्ट अॅप्सच्या मेन्युमध्ये दोन सर्च बॅाक्स असतात. एकात लिंक टाकायची असते त्या सर्च बॅाक्समध्ये या दिलेल्या लिंक्स चालत नाहीत. Feed links वेगळ्याच असतात का? दुसऱ्या एका सर्च बॅाक्समध्ये फक्त "bedtime stories" असे काही शब्द टाकून शोधायचे असते ते टाकल्यावर मात्र बरेच पॅाडकास्ट दाखवले जातात.
( लिंक्स ब्राउजरमध्ये बरोबर उघडतात, त्यातून फीड लिंक्स कशा मिळतात? अॅप्समध्ये डाउनलोड पर्याय असतो तो वापरायचा आहे.)

सध्या मी https://historyofindiapodcast.libsyn.com/ हा पॉडकास्ट ऐकत आहे. पाटलीपुत्र आणि मौर्यन साम्राज्य ह्यावर प्रामुख्याने भर असला तरी खूप माहिती मिळतेय. बीबीसी इराणच्या शहा राजवटीच्या अस्तावर नवा पॉडकास्ट सुरु करणर आहे https://www.bbc.co.uk/programmes/w13xtttx/episodes/downloads

द हरिकेन टेप्स हा खर्‍या आयुश्यात घडलेल्या ट्रिपल मर्डर वरचा त्यांचा नवा पॉडकास्ट https://www.bbc.co.uk/programmes/w13xttt6/episodes/downloads

मशीन लर्निंग वर एक पॉडकास्ट ऐकायला सुरुवात केली आहे. झेपला तर इथे नक्की सांगेन Happy पीनी धन्यवाद! पॉडकास्टची लिस्ट देणार्या सर्वांचे आभार.

लोक्स, इतिहासात आणि आंतरराश्ट्रीय राजकारणात रस असेल तर बीबीसीचा Fall Of The Shah हा ४० वर्षांपूर्वी इराणच्या शाहची राजवट कोसळून खोमेनीची सत्ता आली त्यावरचा पॉडकास्ट नक्की ऐका. ९ च एपिसोड्स आहेत. प्रत्येकी २८ मिनिटांचे.

न्यू यॉर्क टाइम्स चा बूक रिव्ह्यू पॉडकास्ट ऐकतं का कोणी. एक-दोन लेखकांशी बोलणे आणि न्यू यॉर्क टाइम्समधल्या २-३ लोकांशी नवीन काय वाचलेत अशा धर्तीची ५ मिनिट चर्चा असा फोर्मॅट आहे. वेगवेगळे विषय / लेखक असतात दरवेळेस .

>>वा स्वप्ना! छान वाटतोय.

Happy

BBC चा 13 minutes to the moon हा 1969 च्या moon landing वरचा पॉडकास्ट छान आहे. मी अजूनही काही नवे पॉडकास्टस ऐकायला सुरुवात केली आहे. नंतर लिहेन त्याबद्दल

Pages