कनिस्तर!! (तुंबाड न पाहिलेल्यानी वाचू नका)

Submitted by mi_anu on 25 October, 2018 - 07:41

नेहमी प्रमाणे पांडुरंग तुंबाड च्या वाड्यात लिफ्ट समोर उभा होता.लिफ्ट थांबली.दार उघडताच भुश्श आवाज होऊन छतातून पिठाचा वर्षाव झाला.खाली जात असताना पांडुरंग हिशोब करत होता."बार मध्ये उडवायला-5 मोहरा.घरखर्च-8 मोहरा.गुंडू ला स्मार्ट वॉच हवंय दिवाळी ला.6 मोहरा.बायको ला पीठ भरायला सोन्याचा चमचा-4 मोहरा.इन हॅन्ड 30 मोहरा तरी पाहिजेत यावेळी.खर्च वाढतच चाललेत.काहीतरी जबरा डाकू डाव टाकून जास्त मोहरा मिळाल्या पाहिजेत."

लिफ्ट मध्ये व्हॉइस सिस्टम चा आवाज आला."पूर्तीज युटेरस.प्लिज स्विच ऑफ ऑल फॅन्स अँड आटा डिस्पोजर बिफोर यु एक्झिट." पांडू पिठाच्या बाहुली ची ट्रॉली बॅग घेऊन लिफ्ट बाहेर आला.त्याने इन्फ्रारेड चष्मा लावला.आणि पिठाचा स्प्रे मारून वर्तुळ बनवलं.दीर्घ श्वास घेऊन ट्रॉली बॅग उघडली आणि पिठाच्या बाहुलीवर रेडी फॉर शिपिंग चं कागदी लेबल लावलं.

"भो!!" मागून हस्तर मोठ्याने ओरडला.
"हे बघ ब्रो, तू अजून आईच्या पोटात असलास तरी माझं वय झालंय.स्टॉप सच चाईलडीश गेम्स.हे घे बाहुली घे आणि लवकर पाठमोरा होऊन खा." पांडुरंग वैतागून ओरडला.
"ए, गप बसायचं.एकतर इतके दिवस येत नाही.वर आल्यावर असं रूडली बोलणं.डुड इफ यु आर रूड, डोन्ट गिव्ह मी एनी फूड अँड गेट पूअर व्हीच इज नॉट ऍटॉल गुड." हस्तर गुरगुरला.
"गेट पूअर" ही तंबी ऐकून पांडुरंग नरमला. "अरे भौ. तू वाईट वाटून घेतलं गड्या. मला तसं नव्हतं म्हणायचं.आपलं जॉईंट व्हेंचर 100 वर्षांचं.एकमेकांना समजून घ्यायला हवं आपण.थोडं कमी जास्त होणारच."
हस्तर पांडूच्या गॉगल कडे संशयाने बघत होता. "काय रे हे?हा काय तो परदेशातला चष्मा आहे का, त्यातून आरपार दिसतं तो? मी मीटू टाकेन यावर.कणकेच्या गोळ्याचे आमिष दाखवून पीडितावर आरपार चष्म्याचा वापर."
पांडू ने कपाळावर हात मारला. "अरे सोन्या, हा इन्फ्रारेड गॉगल आहे.डोळे जळजळतात. डॉक्टर म्हणाले उघड्या डोळ्यांनी लाल रंग बघणं कमी करा."

हस्तर ने कालच दात व्हाइटनर ने चमकवले होते.कमरेला सॅमसोनाईट चा ट्रॅव्हल पाऊच होता.त्यामुळे आतले अमूल माचो चे अंतर्वस्त्र उघडे पडले होते.
पांडूरंग म्हणाला, "हे काय? चक्क कापडी वस्त्र? आणि रेक्झिन चा बटवा?कोणी दिलं हे सगळं?"
हस्तर जरा लाजला.त्याचा लाल चेहरा लाजेने काळाकुट्ट पडला. "अरे ते जरा खाजगीए रे.परवा आई म्हणाली अजून किती वाट पाहू?घरात एव्हाना 4 छोटे हस्तर खेळायला हवे होते.ते तुमचं प्लॅनिंग का फ्यानिंग बस करा आता.म्हणून डॉक्टर कडे गेलो मी आणि ही तर ते म्हणाले लेदर चं कटीवस्त्र वापरू नका.त्यामुळे उष्णता वाढून सगळा घोळ होतोय.मग कोणाला न चावता बाहेर बाजारात गेलो तर पहिलं दुकान हेच दिसलं.त्याला एक मुद्रा दिल्यावर त्याने एक महिन्याची वस्त्रं पुरवली आहेत."
"येडा का खुळा तू? एक मुद्रा 5 तोळ्याची.तेवढ्यात तुझ्या 4 पिढ्याची कटीवस्त्रं आली असती.तू मला सांगत जा काय पाहीजेय ते.मी आणत जाईन." पांडूरंग हसत म्हणाला.

पांडुरंग ने बाहुली खायला दिली आणि हस्तर ने गळ्याला नॅपकिन लावून ती खायला घेतली. त्याने पटकन हस्तर च्या कमरेचा पाऊच उघडला.तर त्यात मोहरा नाहीतच!! एनर्जी 40 च्या गोळ्यांचं एक पाकीट, एक डॉमिनोज चं कार्ड आणि एक कागद मिळाला.

"हा काय चावटपणा बे हस्तर?थट्टा सोड लवकर सांग मोहरा कुठे ठेवल्या ते.इथे घरी हालत टाईट झालीय.अजून 1 महिना असा मोहरांशिवाय गेला तर रोज ग्रीन टी पिऊन जगायची वेळ येईल." पांडुरंग ओरडला.

हस्तर ने बाहुली खाऊन ढेकर दिला. "अरे हां मी सांगणारच होतो ती स्टोरी.बाजारात अमूल माचो घेऊन बाहेर आलो.तर एक माणूस बाहेरच उभा होता.तो कानात कुजबुजला. "साहेब, या गोळ्या घेऊन बघा.40 की उमर मे नया जोश.नयी उमंग. फक्त 10 मोहरा मध्ये 20 गोळ्या.हिमालयात पोलर बिअर च्या शी मधून पडून रुजलेल्या दुर्मिळ बियांचं झाड.त्याचा फक्त 32 फेब्रुवारी ला येणारा वेचलेला मोहर.त्या मोहरा तुपात आटवून सुवर्णभस्म मिसळून बनवलेल्या या गोळ्या.परत अशी ओरिजिनल चीज मिळणार नाय साहेब.माझी गॅरंटी.1 वर्षात घरी पाळणा नाय हलला तर येऊन मला खाऊन टाका." घेऊन बघूया म्हटलं गोळ्या."

पांडुरंग म्हणाला "आणि बाकी मोहरा?"
"अरे हां.फिरून फिरून मला लागली भूक.एका ठिकाणहून खमंग वास येत होता.आत शिरलो तर तिथे लोक पिठाच्या गोळ्यांवर अनेक चविष्ट वस्तू घालून खात होती.माझा दमलेला चेहरा बघून एका लाल टोपी वाल्या स्त्री ने अगत्याने चौकशी केली.मी कोण आहे वगैरे सांगितल्यावर तिने मालकांना बोलावलं.त्यांनी मला स्पेशल डिस्काउंट दिला HASTARNEVERHUNGRY असा कोड लावून.त्यांना 50 मोहरा द्यायच्या आणि ते आयुष्यभर दर आठवड्याला चीज घालून एक पिठाची बाहुली खाली टाकणार.काय मस्त आहे म्हणून सांगतो तुला..तू पण खाऊन बघ.ताजं ताजं विटांच्या भट्टीत भाजलेलं पीठ, त्यावर इटली हून नुकतंच आलेलं लोणी..वर स्पेशल टोमॅटो, हलापीनो आहाहा..तुझ्या त्या खडेवाल्या बाहुल्या खाऊन बोअर झालं होतं."

"हस्तर, वेडा का तू?इतक्या मोहरा वाटून बसलास?आणि बाकीच्या कुठे गेल्या?"

"अरे खाऊन बाहेर निघालो.तर एक टोकदार नाकाचे बडबडे सद्गृहस्थ भेटले.गप्पा मारत बसलो कट्ट्यावर.त्यांच्याकडे मस्त मोमो नावाचे पिठाचे गोळे होते डब्यात.थायलंड ला म्हणे आचारी होते ते काका भटारखान्यांत. सगळ्या देशातल्या पिठाच्या डिश बनवायचे.काकांना म्हटलं तुम्ही येता का खाली..आयुष्यभर जॉब गॅरंटी.फक्त मला पिठाचं काय काय मस्त मस्त बनवून खाऊ घालत राहायचं.ते म्हणाले मी शौचालय, पॅड यावर पिक्चर बनवले.अजून कचराडेपो, कंपोस्ट, बायोगॅस, कागदाचा लगदा, रद्दी,भंगार यावर पिक्चर बनवायचेत.खाली यायला वेळ नाही."

पांडुरंग आता आपले प्रश्न विसरून या गोष्टीत गुंतत चालला होता. "मग?" त्याने विचारलं.

"मग अरे मी माझ्या भुकेचं सांगितलं तर काका उभं राहून गाणं गायला लागले. "जर घरात आहे सोनं तर कश्याला आता रडणं" असं. स्कीम अशी होती की ते सगळं सोनं घेऊन मला गोल्ड लोन देतील.आता मी हा असा अशिक्षित.मग ते म्हणाले की ते माझं सोनं घेऊन मिळवलेले पैसे डबल करतील आणि मला दर महिन्याला एक मोठा बाहुला व्याज म्हणून पाठवतील.मी मरेपर्यंत. मी त्यांना सगळं सोनं देऊन टाकलं.त्यांनी कागदावर अंगठा मारून घेतला आणि तो कागद मला दिला.जॉइनिंग गिफ्ट म्हणून तो बटवा पण दिला.मी म्हटलं तुला आल्यावरच सांगावं.आता परत यायची गरज नाही."

पांडुरंग रडायला लागला. "असा एखाद्याच्या फॅमिली बिझनेस वर पाय आणायचा एकदम?माझ्याकडून चूक झाली असेल भिडू.तुला बाहुलीत दगड टाकून दिले.बरेच वेळा चुना आणि कॉर्नफ्लोअर पण मिसळायचो. पण आता मी चांगल्या बाहुल्या देईन.आपला धंदा असा तोडू नकोस.या वयात मी दुसरा काय धंदा करणार?मला चाव आणि राक्षस म्हणून इथेच कामावर ठेव.मी काय करू त्या कटकट्या महामायेकडे जाऊन?"

हस्तर चं अंतःकरण विरघळलं. वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध असे थोडेच तुटतात? "असं रडू नको पांड्या गड्या.आपण काहीतरी मार्ग काढू.तुझ्या घरच्यांना इथे घेऊन येतोस का?सगळे इकडेच राहू मिळून मिसळून.सगळ्यांना पुरतील इतक्या पिठाच्या बाहुल्या आहेत माझ्याकडे."

पांडू च्या डोळ्यासमोर आपली घरात पण दिल्ली विमानतळासारखा वॉकवे बसवून चालणं वाचवणारी सखी आणि दिवसभर लोळत टेम्पल रन खेळणारा गुंडुरंग आला.यांना इथे विहिरीत इतक्या खोल काय उतरवणार डोंबल.आणि पिठाच्या बाहुल्या खायच्या म्हणे आयुष्यभर.सखी दीक्षित डायट करते. फक्त भाकऱ्या खाते.गुंडू फक्त लाईफहर्बल चे प्रोटीन शेक पितो.आयुष्यभर मी मोहरा कमावतोय.हे लोक 'मोहरा' मधल्या जिंदाल सारखे डोळ्यावर पट्टी बांधून ऐश करतायत.बघुदे थोडी गरिबी यांना.

"नकोरे हस्त्या.ते नाय वर्क आऊट होणार."
"अरे पांडू!! आयडिया.तू त्या पत्र्याच्या कनीस्तरात पीठ भरून आणतो ना?परवा एकदा तुझी बॅग तुटली होती तेव्हा आणला होता तो?तू त्या चीज च्या बाहुल्या वाल्याना पीठ ठेवायला ते कनिस्तर भाड्याने द्यायचे.मी त्यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये क्लॉज टाकतो की त्यांनी तुझ्याकडूनच कनिस्तर घ्यायला पाहिजे.आणि तू भाड्यातली 10% रक्कम खर्च करून मला फ्रॉजन कणकेचे गोळे दे महिन्याला.तुझा पण धंदा झाला माझा पण."

पांडुरंग ला एकदम भरून आलं."किती छान आहेस रे तू.माझी तर इच्छा आहे की तू मला चावावं आणि मी एकटा आयुष्यभर इथेच राहावं."
"अरे नको.जा घरी जा.कनिस्तर विकून पैसा कमव.आणि परत लागलं तर फोन कर.मला त्या गोल्ड लोन वाल्या काकांनी जिओ सिम आणि डाटा पॅक फुकट दिलाय."

पांडुरंग डोळे पुसत लिफ्टमध्ये शिरला.
-यानंतर पांडुरंग ने अनेक पत्र्याचे कनिस्तर विकले आणि भाड्याने दिले.आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव त्याने कनिस्तर ठेवले.
-हस्तर बायका मुलांसोबत देवीकिकोखमे हाऊसिंग सोसायटीत अनेक वर्षे सुखाने नांदला.
-पांडुरंग ची बायको एका हिरे व्यापाऱ्याकडे निघून गेली.
-गुंडुरंग ने 'हस्तर ब्रँड भूकबुद्धीवर्धन सुवर्णभस्म' म्हणून आपल्या घरच्या चुलीतली राख पॅक मध्ये विकण्याचा धंदा काढला.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Lol

अमेझिंग Lol

तुंबाडवर फार विचार केलायस तू. ते तुझं आता वन आॅफ द लाईफटाईम मेमरी झालंय बहुतेक Proud फॅंटसी माईंड्स. Happy

Lol भारी लिहीलय. सिनेमा बघण शक्य नाही पण तरी लेख वाचला. अर्थात सगळे स्पॉयलर धागे वाचले असल्याने संदर्भ लागला.
फक्त पुण्यातला त्या नगरसेवकांचा उल्लेख टाळता येईल का आता ते हयात नसल्याने.

ओह.12 जून ला गेलेले त्यांचा म्हणून नाही केलेला उललेख.पुण्यात सध्या भरपूर गोल्ड मॅन आहेत.पण हा गैरसमज होणे साहजिक आहे.

न आवडणे शक्य आहे. ☺️☺️☺️
खरं तर मला स्वतःला ही कन्सेप्ट खूप आवडलिय.पण नीट मांडता आली नसावी.

मजेशीर आहे, मला आवडलं वाचायला.
निगेटीव्ह प्रतिसादांनी खचुन जाउ नका, लिहित रहा अशा कल्पनांवर.

त्या तिकडे बोकलत यांचा किस्सा पण मस्त आहे.

सिनेमा बघण शक्य नाही पण तरी लेख वाचला. अर्थात सगळे स्पॉयलर धागे वाचले असल्याने संदर्भ लागला.>> मला पण!!
भन्नाट लिहिलय ! Lol

सस्मित, असं अजिबात नाहीये गं.एडिट करू नकोस.
मी माबोवर गेली 11 वर्षे आहे.इथे इतक्या लिखाणाची गर्दी असताना निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणतेही प्रतिसाद येणे हा धाग्याचा सन्मान आहे.(हे वाक्य सारकास्टिक सुरात नाहीये.)

नाही आवडलं. उगीच ओढुन ताणुन विनोदी करण्याचा प्रयत्न वाटतंय. >>>>> चहयेद्या मध्ये तरी वेगळ काय असत ?

(हे वाक्य सारकास्टिक सुरात नाहीये.)

आय क्नो >>>>>>>> Proud

@अनु,
परवा पासून थांबलो होतो हा धागा वाचायचा वैधानिक इशारा वाचून. काल रात्री पाहीला पांडूरंगाला आणि मग इथे आलो.
धन्य आहात.

उगीच ओढुन ताणुन विनोदी करण्याचा प्रयत्न वाटतंय.>> प्लस वन.
ह्या पेक्ष तुंबाड किरणुद्दीन ह्यांच्या बाफावर प्रतिसादात जे पंचेस होते ते खूप उत्स्फूर्त होते. इथे त्या भयात्कारी संकल्पनेचा सीरीअस नेस जाउन त्याला विनोदाची डूब द्यायचा प्रयत्न आहे. व्हिच इज ओके. बट यू कांट मिक्स ह्युमर अँड हॉरर बियाँड अ पॉईंट. धारपांचं वाचताना कधी कधी कसं आतनं जीव बंद बंद होत असल्याचं फीलिन्ग येतं ते तसंच राहिलं पाहिजे.
मध्येच हसायला आले तर ते ऑरगॅनिक हवे. प्रयत्नांचे पाच मार्क.

भारी आहे हे! मीपण शनिवारी तुंबाड पाहिला! जाम भीती वाटली टीव्हीवर बघूनसुद्धा! पण आता हसायला येतंय Lol

मीपण शनिवारी तुंबाड पाहिला! जाम भीती वाटली टीव्हीवर बघूनसुद्धा >>>>>> तुंबाड इतक्या लवकर टिव्हीवर आला सुद्दा! Uhoh

उगीच ओढुन ताणुन विनोदी करण्याचा प्रयत्न वाटतंय.>
>>> मलाही असेच वाटले वाचून. माफ करा अनु !

Pages