भयाण ( भयकथा )भाग2

Submitted by shrinand kamble on 24 October, 2018 - 05:35

''ते बघ तिकडे'' . राज तिकडे बोट करत म्हणाला. इतक्यात जोरात वीज कडाडते त्या प्रकाशात सर्व परिसर लखकन दिसतं आणि परत अंधारात गडप होऊन जातं.सुमित्रा त्या वाड्याकडे पहाते.तिकडे पाहतच भयाचा सरसरता स्पर्श तिला होतो.
रात्रीच्या अंधारात तो वाडा खूपच भयानक दिसत होता.समोरचं ते वळलेलं झाड आणि त्यावरती बसलेलं ते विचित्र घुबड त्यात आणखी भर घालत होतं.
'' काय तिकडे नको बाबा, कसलं विचित्र दिसतय ते घर ''
सुमित्रा भयभीत स्वरात म्हणाली.
'' अगं कदाचित ते बाहेरून तसं दिसतय, आतमध्ये कोणीतरी राहत असेलच एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे ''
राज समजुतीच्या स्वरात म्हणाला.
'' पण राज तू पहतोयस ना कसलं विचित्र दिसतय ते घर ''
सुमित्रा म्हणाली.
'' अगं एकदा तिकडे जाऊन बघायला काय हरकत आहे आणि असही आपण गाडीत किती वेळ बसनरोय, गाडीची हेडलाईट पण बंद पडलीय समोरून एखादं वाहन वेगाने येऊन धडकलं तर ?''
राज समजुतीच्या स्वरात तिला म्हणाला.
'' पण राज .....''
'' पणबिन काही नाही चल ''
राज तिचे वाक्य अर्धवट थांबवत म्हणाला.
तीलापण याचं म्हणन पटत होतं कारण असच रस्त्यामध्ये थांबण योग्य नव्हत. तिकडे जाण्याशिवाय यांना पर्याय नव्हता.कारण जवळपास कुठे एखादं घरपण दिसत नव्हत.तिने त्या वाड्याकडे पाहिलं तिकडे पाहतच एक विलक्षण भीती तिच्या मनामध्ये शिरली वाडा जणु आ वासून यांनाच बोलवत होता.घरसमोरील ते वाळलेलं निर्जीव झाड आता बोलकं झालं होतं.त्या झाडात एक वेगळ्याच प्रकारचा जिवंतपणा जाणवत होता.
'' अगं चल ना ''
राजच्या आवाजाने तिची ती भयावह एकाग्रता भंग पावली.
पाऊस आता ओसरला होता.तरीपण रिमझिम पाऊस चालूच होता.
राजने गाडीचे दार उघडले. थंड हवेच्या झुळूकेणे त्यांचे स्वागत केले.
गार वारा अंगाला झोंबत होता.ते गाडीतून बाहेर येताच लागलीच त्या वाड्याच्या दिशेने चालू लागले.पावसाचे छोटेछोटे थेंब अंगावर पडत होते.
वाड्याच्या सभोवती लाकडाचं पडकं तुडकं कम्पाउंड होतं.
आणि समोरच्या बाजूने एक फाटक होतं आत जाण्याचा मार्ग तिकडूनच होता.
ते त्या फाटकापाशि आले. फाटक खूपच जुनाट दिसत होतं.कारण त्याच्या फळ्या कुइजुन झिजून गेलेल्या आणि कीड लागलेल्या दिसत होत्या.राजने हळूच ते फाटक बाजूला केल.अचानक वीज कडाडली त्या आवाजाने सुमित्रा खूप घाबरली तिने गपकन राजचा हाथ घट्ट पकडला.ती भयभीत नजरेने आजूबाजूला पाहत होती.
'' भिऊ नकोस मी आहे ना ''
राज तिला दिलासा देत म्हणाला.
तिने लबाडच मान हलवली. त्यांनी जसा पाय आत ठेवला तशी एक वेगळ्याच प्रकारची भीती त्यांच्या मनात शीरली. आणि त्यांच्या अंगावर भयाने शहारे उभे राहीले.
यांना भीती वाटण्यासारखं काही घडलं नव्हतं तरीपण अंगावरती शहारे येणे हा प्रकार त्यांना समजला नाही.हा प्रकार त्यांच्या विचारशक्तीपलिकडचा होता.
असो तिकडे दुर्लक्ष करत ते पुढे निघाले.
ते अंगणात होते आणि समोरच ते वळलेलं झाड.चालता चालता सुमित्राने सहजच वरती झाडाकडे पहिलं. वाळलेल्या तुटक्या फांदीवर बसलेलं ते विचित्र घुबड यांच्याच रोखाने पाहत होतं. त्याच्या त्या पाहण्यात एक भयानक अमानवी राग दिसत होता.
सुमित्राने राजचा हाथ आणखी घट्ट पकडला. राजला ते जाणवलं
'' काय झालं ?''
तो सुमित्राकडे पाहत म्हणाला.
ती वरती त्या घुबडाच्या दिशेने बोट करत म्हणाली.
'' ते बघ ''
त्याने तिकडं पाहिलं तिकडे पहातच यालापण भयाचा सरसरता स्पर्श झाला.
त्या घुबडाचं ते अमानवी पाहणं म्हणजे भयालाही भय वाटेल असं होतं.
क्रमशः

श्रीनंद कांबळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users