हसरा चेहरा (भाग २)

Submitted by इंग्रजी माध्यमच... on 16 October, 2018 - 06:54

जसे तसे काही वर्ष निघून गेले. सिद्धेश अाता सी. ए कोर्स करत होता. एकदा फेसबुकच्या नोटिफिकेशन मधे सजॅशन अालं “संजीवनी गुपता”. ते नाव वाचल्या बरोबर. त्याच्या मनामधे खळबळ उटली. जुन्या आठवणी परत दुःख देत होत्या. त्याने तिचा अकाउंट उघडला. तिचे पोटो बघु लागला. फोटो बघता बघता कधी त्याच्या अोठांवर हसू उमठलं त्याला ही कलळं नाही. त्याने तिच्या अकाउंट मघे ती ज्या सी. ए फर्ममधे काम करते ते नाव लक्षात ठेवलं व इंटरनेट वरुण त्या फर्मचा फोन नंबर काडला. काही महीन्यांनी त्यानी अार्टीकलशिपसाठी त्या फर्म मधे कॉल केला. त्याला इंटरव्ह्यूला बोलावला व तो पास झाला. तो सामील झाल्यावर योगायोगने तिचं त्याची सिनिअर होती. ती त्याला काम शिकवणार. ती त्याला अोळखत ही नाही असं वागायची. तो तिच्याशी खुप काही बोलायचा प्रयत्न करायचा. पण ती नेहमी टालायची. तो दुःखावला. रागाने त्याने ही बोलायचं टाकलं. “एवढा काय माज तिला. मी इथं तिच्यासाठी अालो अाणि ती बोलत देखील नाही. बर्‍याच मिळतील तिच्यासारख्या. असही मी तर फक्त मैत्री साठी अालो होतो. जेणेकरून ती अायुष्यात राहील”.बर्‍याच दिवसांनंतर “तो हल्ली जास्त बोलत का नाही” हा प्रश्न तिला पडला. शेवटी ती बोलायला लागली. बोलता-बोलता परत ते जवळ अाले. तिच्या मनामधे पुन्हा प्रेम निर्माण झाले. तो सुद्धा प्रेम कराचा. ती फक्त वाट पाहत होती ते त्याच्या प्रपोजची. पण बरेच वर्ष झाले तरीही त्याने प्रपोज मारला नाही. “त्याच्या अायुष्यात नवीन मुलगी अाले की काय” असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. त्याच्या बद्दल चौकशा केल्यावर समजलं, त्याच्या अायुष्यात कोणीच नाही अाहे. ते दोघेही अाता सी. ए झाले होते. दोघांमधील नातं गच्च झालं होत अाणि प्रेम सुद्धा. एक दिवस सुद्धा फोनशिवाय जात नव्हतं. ती प्रेमात गुंगत जात होती. सिद्धेश ह्ल्ली काही वर्षापासून समाजात बसायला लागला अाहे. त्याचे वडलांना गावकरी अादर्श म्हणून पहात असत. गावकर्‍यांच्या भांडणं अाणि वादविवाद झाला की ते लोक सिद्धेशच्या वडलांकडे येत असत. सिद्धेश सी. ए झाल्यापासून त्याला गावच्या मुंबई मंडळाचा खजिनदारपद दिला अाहे. तो शहरात त्याची अाणि संजीवनी सोबत असलेली पार्टनरशिप फर्म संभाळून गावच्या गोष्टही संभाळतो. दोघेही २५ वर्षाचे झाले होते. तिला सिद्धेश सोबत लग्नं कराचं होतं. त्यासाठी तिने बरेच मांगने टाळले. शेवटी तिनेच प्रपोज मारला अाणि तो तिच्याशी प्रेम करत असतानाही, त्याने हसता हसता नकारला. ती रडवेली झाली. त्याने तिला दुसर्‍यांदा रडवलं होतं. त्याच्याही डोळयांतून पाणी अालं. त्याने तिला समजावलं. “अापला समाज वेगळा अाणि बोलीभाषा वेगली. मी जर का तुला स्विकारलं. तर माझी अाणि माझ्या वडलांची समाजात काय इज्जत राहील”. ती त्याच्यावर चिडली. “जर मला स्विकारायचं नव्हतं, तर का माझ्या अायुष्यात परत अालास, का माझ्या मनामधे परत प्रेम निर्माण केलास, का. . . ?”
त्याला फक्तं ती अायुष्यात परत हवी होती, त्याच्या डोळयांसमोर. अगोदर ती सोडून गेल्यावर तो तिच्याविना जगायचं शिकला होता. त्याने वडलांचा मान त्याच्या प्रेमापेक्षा जास्तं महत्वाचा मानला होता अाणि शेवटी जात, पात, बोलीभाषा अाणि समाजापुढे पुन्हा एकदा प्रेम हरला होता. तो नेहमी प्रमाने मनामधे हजारो दुःख घेउन हसरा चहरा लोकांना दाखवायचा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Shame on that guy. केस करा त्याचावर. अन् अशा मूर्खासारख्या गोष्टी लिहिणं बंद करा.

अच्छा हा पुढचा भाग का?
मस्त होती कथा.
सिद्धेश आणि संजीवनीचे प्रेम नात्यात बदलू शकले नाही हे वाचून वाईट वाटले.
माणूस वाईट नसतो.... परिस्थिती आणि समाज वाईट असतो. प्रेम खरे आणि पवित्र असले तरी परिस्थिती आणि समाजापुढे कधीकधी दुबळे पडते.
छान लिहिता तुम्ही... लिहित रहा... आम्ही वाचत राहू.

मी नेहमी इंग्रजीमधे लिहितो. हल्लीच मराठीत सुरवात केलेय.>> सहीच.. नक्कीच कौतुकास्पद आहे तुमची सुरुवात.. सराव सोडू नका इथे सतत काही तरी लिहिण्याचा प्रयत्न करत रहा.. सवईने लेखन सफाईदार होत राहील.... मायबोलीकर आहेतच मार्गदर्शन करायला..
पुढील लेखनास शुभेच्छा.