अज्ञात..

Submitted by के अंजली on 12 October, 2018 - 01:00

तुझ्या वेल्हाळपणाची ख्याती दूरवर गेली
माझी मोगर्‍याची बाग अशी बहराला आली

वर आकाशाचा पारा ईथे तळ्यात उतरे
चांदो उगाच जागतो रात्र सरता ना सरे

कुठे अज्ञाताच्या देशी त्याच्या बोटीचे पडाव
ओली घालमेल कशी उभे उदास साकव

जरी पावलां लागते ओल्या काठातली माती
तरी किनारे सोडून शिडे दिगंतरा जाती...

Group content visibility: 
Use group defaults

छाम जमलीय
_______________

थोड़े टाइपो वाटले ते दुरुस्त करणे योग्य असल्यास जरूर करावे. उदा.-
ओल्या काठातली माती (रेती)

"कुठे अज्ञाताच्या देशी त्याच्या बोटीचे पडाव
ओली घालमेल कशी उभे उदास साकव"... वाह!
सगळीच आवडली कविता .

सुर्रेखच....
खूप दिवसांनी लिहिताय... Happy