Submitted by के अंजली on 12 October, 2018 - 01:00
तुझ्या वेल्हाळपणाची ख्याती दूरवर गेली
माझी मोगर्याची बाग अशी बहराला आली
वर आकाशाचा पारा ईथे तळ्यात उतरे
चांदो उगाच जागतो रात्र सरता ना सरे
कुठे अज्ञाताच्या देशी त्याच्या बोटीचे पडाव
ओली घालमेल कशी उभे उदास साकव
जरी पावलां लागते ओल्या काठातली माती
तरी किनारे सोडून शिडे दिगंतरा जाती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छाम जमलीय
छाम जमलीय
_______________
थोड़े टाइपो वाटले ते दुरुस्त करणे योग्य असल्यास जरूर करावे. उदा.-
ओल्या काठातली माती (रेती)
कुठले टायपो वाटले सांगाल का?
कुठले टायपो वाटले सांगाल का?
समजले पण रेती शब्द फारसा नाही रुचत. धन्यवाद
"कुठे अज्ञाताच्या देशी
"कुठे अज्ञाताच्या देशी त्याच्या बोटीचे पडाव
ओली घालमेल कशी उभे उदास साकव"... वाह!
सगळीच आवडली कविता .
संपूर्ण कविता मस्तच झालीय
संपूर्ण कविता मस्तच झालीय
त्यातही शेवटची दोन कडवी जास्त आवडली.
सुर्रेखच....
सुर्रेखच....
खूप दिवसांनी लिहिताय...
सुर्रेख झालीये कविता ! मस्त
सुर्रेख झालीये कविता ! मस्त
धन्यवाद सगळ्यांचे!
धन्यवाद सगळ्यांचे!
खूप दिवसांनी लिहिताय!>>> हो शशांकजी.