चुका

Submitted by Asu on 4 October, 2018 - 22:36

चुका

वागावे कसे
समजत नाही
चुका कळतात
पण,
वळत नाही

आयुष्याच्या वाटे
चुकांचे काटे
पायी टोचतात
पण,
बोचत नाही

चुकांच्या थपडा
गाली बसतात
अश्रू चमकतात
पण,
ओघळत नाही

आयुष्य हीच
चूक खरी
मनी समजते
पण
उमजत नाही

चुकत माकतही
शिकत नाही
'ढ' म्हणा
पण,
गा...वातला नाही

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults