लेखक, त्यांची पात्रे आणि One Liners

Submitted by हायझेनबर्ग on 1 October, 2018 - 16:47

सिनेमातल्या पात्रांच्या तोंडी चटपटीत, टाळीबाज डायलॉग आपण नेहमीच ऐकतो पण पुस्तकातल्या पात्रांचे? सिनेमात संहितेपासून संवाद लिहिणारे वेगवेगळे तज्ञ लोक असतात पण पुस्तकाच्या/कादंबरीचा लेखक ईमानेईतबारे ह्या सगळ्या जबाबदार्‍या शब्दशः एक हाती पेलत असतो.
मार्लन ब्रँडो किंवा आपल्या राजकुमार सारख्यांनी रंगवलेली पात्रे डायलॉगबाजीतून जबरदस्त टाळ्या मिळवतात पण लेखकांची पात्रे? त्या बिचार्‍यांच्या नशीबी वाचकाच्या चेहर्‍यावर ऊमटलेल्या एखाद्या स्मिताशिवाय, डोळ्यातल्या पसंतीच्या पावतीशिवाय किंवा कपाळावर पडलेल्या वा ऊलगडलेल्या आठीशिवाय फार काही येत नाही.
अशा डोक्यात घर करून राहिलेल्या पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडची प्रसिद्ध किंवा तुम्हाला आवडलेली लहान मोठी वाक्ये लिहिण्यासाठी हा धागा.
तुम्ही वपूंचा पार्टनर वाचा किंवा जेके रोलिंगचा डंबलडोर ... एका ओळीत तत्वज्ञान सांगून जाणारे एखादे तरी वाक्य पुस्तकात सापडणार नाही असे शक्यतो होत नाही... चांगला लेखक एक चांगला विचारवंतही असतोच...

ईंग्रजी, मराठी, हिंदी भाषा चालेल... अनुवाद लिहिणार असाल तर फ्रेंच, जर्मन, बंगाली वगैरेही चालेल.
पण पुस्तकाचे, लेखकाचे आणि पात्राचे नाव जरूर लिहावे(च).

तीनेक वर्षांपूर्वी Midnight's Children वाचून डोके फिरवून घेतले (अर्थात 'भारावलो' ह्या चांगल्या अर्थाने Proud ) तेव्हापासून रश्दींची काही वाक्ये कायमची डोक्यात घर करून बसली आहेत. अजूनही लख्खं आठवतंय Midnight's Children वाचतांना किमान चार ते पाच वेळा ते पुस्तक समोरच्या भिंतीवर फेकून मारण्याची आलेली तिडिक आणि त्या तिडिकेला बळी न पडता नेटाने वाचत राहून... ते पुस्तक संपवल्यावर अनेक महिने जे काय वाटत राहिले ते..... ते वाटणे शब्दात पकडता येण्यासारखे नाही. पण त्याच पुस्तकातली रश्दीची ही काही 'जेम' वाक्ये...

Midnight's Children - सलमान रश्दी
पात्र - सलीम सिनाई.

  • We all owe death a life.
  • Most of what happens in our life happens in our absence.
  • ही पहिली दोन माझी अतिशय आवडती आहेत.

  • What's real and what's true aren't necessarily the same.
  • Children are the vessels into which adults pour their poison.
  • शेवटचे तर गीतेतला श्लोक असावा असे काहीतरी

  • I am the sum total of everything that went before me, of all I have been seen done, of everything done-to-me. I am everyone everything whose being-in-the world affected was affected by mine. I am everything that happens after I am gone which would not have happened if I had not come.

Catch 22 मधली पीळ वाक्ये लिहायचा मोह होतोय पण सध्या थांबतो.. सगळ्यांची त्यांच्या आवडत्या पात्रांची वाक्ये वाचायला आवडतील.

(टीप- सिनेमातले टाळीबाज One liners नको, कवितेच्या ओळी, शेर, लेखकाची पण पुस्तकात नसलेली वाक्ये, संत महात्म्यातले सुविचारही नकोत... फक्त पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडची वाक्ये
एका प्रतिसादात शक्यतो एकाच पुस्तकातली वाक्ये लिहलीत तर बरेच.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला तत्वज्ञान हवंय आणि पुलं आणि वपुंना ऑलरेडी मोडीत काढून झालेलं आहे. Proud
मी आता मृत्युंजय वगैरेमधले (उपनिषदांतून चोरलेले) जीव हा सारथी आणि आत्मा हा यात्री वगैरे उतारे यायची वाट पाहते. Proud

कवितांच्या ओळी/शेर वगैरेंना मनाई केल्याबद्दल निषेध करायचा राहिला होता तोही याच पोष्टीत करून घेते झालं! Proud

सध्या मुला बरोबर हॅरी पॉटर वाचतोय. सो पटकन आठवणारे (कॉपी पेस्टला अर्थात गूगल सर्च वापरुन) कोट्स देतोय.

१. “To the well-organized mind, death is but the next great adventure.” - डंबलडोर. सॉर्सर्र्स स्टोन नष्ट झाल्यावर निकोलस कसा जगणार असं हॅरीने विचारल्यावर डंबलडोर हे म्हणतो. हा कोट मला खरतर आवडला नाही. आणि चाईल्ड अप्रोप्रिएट तर अजिबात वाटला नाही. हे असं का आणि कशासाठी लिहिलं असेल लेखिकेने, काही वेगळं सांगता आलं असतं का? असं वाटत राहिलं आणि त्यामुळेच लक्षात राहिला.

२. “Call him Voldemort, Harry. Always use the proper name for things. Fear of a name increases fear of the thing itself.” - यु नो हू वाचुन आपल्याला एका पॉईंटला उबग येतो, पण मुलगा व्हॉल्डमॉर्ट लिहिलेलं असलं तरी ते बोलू नको, त्याला यु नो हू ने रिप्लेस कर सांगतो... आणि लगेच डंबलडोर असं म्हणाल्यावर त्याची भिती कमी होते. काय सामर्थ्य आहे लेखिलेचं! डंबलडोर म्हणतोय म्हणजे बरोबरच असणार हा विश्वास त्याच्या मनात किती पक्का झालाय! पुस्तक वाचल्यावर आम्ही मूव्ही बघितला आणि त्यातला डंबलडोर इतका लेचापेचा वाटला... कीव आली मूव्हीमधल्या त्याची.

अमित, त्यातल्या 'Never trust anything that can think for itself if you can't see where it keeps its brain'ची परवाच आठवण निघाली होती. Happy

गाळणी, प्रिंसिपल वगैरे काही नाही हो Lol

फक्त पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडचे वाक्य हवे ईतकाच काय तो आग्रह.. पात्राच्या तोंडचे असले म्हणजे त्याला काहीतरी कंटेक्स्ट असतो.. नाही तर असे थोरामोठ्यांचे ऊगीच भरल्या पोटी मारलेले (coin a phrase) वन लायनर्स ढीगाने आहेत.

कवितांच्या ओळी/शेर वगैरेंना मनाई केल्याबद्दल निषेध करायचा राहिला होता तोही याच पोष्टीत करून घेते झालं! >> निषेध मान्य पण ह्याबाबतीत ढील नाही. Proud

Happy ओके माझे एक फेवरिट

"Who steals my purse steals trash; ’tis something, nothing; ’twas mine, ’tis his, and has been slave to thousands;
But he that filches from me my good name Robs me of that which not enriches him, And makes me poor indeed."

शेक्सपियर च्या ऑथेल्लो मधे ही वाक्य आहे (म्हणे). पण मी इथे लिहीत आहे ते वुडहाउस च्या बर्टी वूस्टर च्या तोंडी हा कोट आहे, जीव्ह्ज अ‍ॅण्ड वूस्टर वाल्या असंख्य पुस्तकांपैकी एकात. बहुधा Much Obliged, Jeeves मधे. आणि त्यात तो अत्यंत किरकोळ- टीपिकल बर्टी वूस्टर स्टाइल- बदनामी बद्दल हे लंबेचौडे वाक्य वापरतो.

केवळ पुलंच्याच लेखनात त्यांच्या कॅरेक्टर्सच्या तोंडी अशी अगणीत कोट्स आहेत.

"उन्नती मासिकाच्या विजयादशमीच्या अंकात चौखुरेगुरुजींचा लेख आहे, जीवनोन्नतीचे सहा सोपान"
"स त कुडचेडकर, केतकी पिवळी पडली चे लेखक, ख्यातनाम!"
"योग्य व्यासंगाशिवाय व्यक्तिमत्वाला पैलू पडत नाहीत."

- सखाराम गटणे

"काय करायचाय थेरडीला गर्भरेशमी?"

- नारायण

"कार्यवाहाचा आणि कार्याचा काय संबंध?"

- बापू काणे

"बाबारे! तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं!"

- नाथा कामत

"ल्याबोट्रीतला गणपत, सा इजारी, चार नेरु शर्ट!"
"साहेब, कापडं काढा!"

- नामू परीट

"कोणाची तरी खाट दाखवली नी दिले ठोकून यावर टिळकान् पहिले ट्यां केले"
"वस्ताद हो जावईबापू! कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल."
"एकदा तो प्रवास घडला, की त्या चिकाटीवर माणसाने पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास जावे!"
"दामूनेना कसला प्रेमळ? ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच!"

- अंतू बर्वा

"काय करतात?"

- बापू हेगिष्टे

सर्व कोटस - व्यक्ती आणि वल्ली, पुलं.

"मी माझा धंदा करतो, तू तुझा धंदा कर! तू काय धंदा करतो रे बुर्वे?" -सखाराम आत्मू माईणकर
"साला इडीयट साला कोचर्‍या" - सोकाजीनाना त्रिलोकेकर
"टुडे बिइंग ऑल फादर्स नाईट, डोन्ट गो" - सोकाजीनाना त्रिलोकेकर
"तो कोकणातला असणार!" - काशिनाथ नाडकर्णी
"थर्ड म्हणजे अशा तीन पिवळ्या उभ्या दांड्या असतात." - कोचरेकर मास्तर
"चौपाटीवर हजार वेळा सूर्य बुडताना पाहिलाय त्याला उलटा करा! सूर्योदय!" - काशिनाथ नाडकर्णी
"छत्री म्हणजे समाधी, मग रेनकोट म्हणजे काय ताजमहाल?" - सोकाजीनाना त्रिलोकेकर

- बटाट्याची चाळ, पुलं

मिडनाईट्स चिल्ड्रेन मधलेच अजून एक...
सलीम सिनाईची कट्टर आजी (जिच्या लेखी एकापेक्षा जास्त भाषा बोलू शकणारे तिच्या नवर्‍यासहित सगळे सैतान आहेत)
If God meant people to speak many tongues, why did he put only one in our mouth

"थर्ड म्हणजे अशा तीन पिवळ्या उभ्या दांड्या असतात." - कोचरेकर मास्तर >>> Happy यातला महत्त्वाचा भाग राहिला रिव्हर्स स्वीप. कोचरेकर मास्तर ही माहिती बोरीबंदर स्टेशनवरच्या हमालाला सांगत असतात Happy

<<<मला तर वाटले व पू आणि पु लं च्या Quotes नी वाहत जाईल हा धागा Wink>>>
एक तर ते खूप जुने झाले. नि मराठीत काय लिहायचे? इंग्रजी वगैरे लिहिले की आपण किती विद्वान आहोत ते जगाला कळते.

पुस्तकः झुळूक, लेखक मंगला गोडबोले. ऑक्टोबर १९८५. मित्राने भार्‍अतातून १९८७ मधे आणले. अनेक वर्षांनी मराठी पुस्तक वाचायला मिळाले म्हणून उत्साहाने वाचले. खालील मराठी वाचून फार हसू आले.
कॉलेजमधल्या मुलींचा संवादः
"शिट्S एक सिंगल सोल आपली केअर करत नाहीये. बारा वाजले का ग?"
"मोअर ऑर लेस"
"त्यापेक्षा रिकनं जाऊ का? पैसे शेअर करू. तेव्हढ्या बॅग्स तरी कॅरी करायला नकोत"
"नो बाबा. धिस हॅज बिकम रोजचंच हं "
"मग? व्हाट टू डू? माय आई, यू नो...."
"छोड याSरS! जाना है तो जायेंगे"
"मेरी आई, मालूम, शी इज सच्चएS .... ना बाबाS, वो मेरा खिमा करेगी"

मी फक्त कोटस दिले रे फारेंडा, कोण कोणास म्हणाले राहिलं Lol
आणखीन काही....

"हे काय तबला वाजिवतय का मांडी खाजिवतय वो?"
"उगाच रांडेचं गळ्यात हार घालून घे आणि हिंड."
"झोप की रे लेका निवांत! ढुंगण वर करुन!"
"आलं तिच्यायला लोकांच्यात काड्या सारुन."
"एक थोडं गच्ची बसतय का बघा वो."
"उगाच शिंचं जमत नाही तर उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घ्यायला जायची गरज काय वो?"
"तुमचं बाप लावलवतं काय हो चाल?"
"त्याच्यासारखी एक तान तुम्ही घ्या, मूळव्याध होईल की नाही बघा."
"काय वो हे धैर्यधर? याच्यावर त्या भामिनिचं कुत्रं खुश होणार नाय वो."
"तुमी तरी शाणेच की वो! माझी बायको नाय सुख देत वो मला, एक तुमचं पोरगी देता काय थोडसं अस मागितल तर कोणी देतात काय वो? त्याला बोगारवेशीचाच रस्ता धरावा लागतो."
"जिम्या भाड्या, ये की च्यायला ...."

- रावसाहेब, गणगोत, पुलं

"तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ, सर्व धर्म सारखे! ऑम्लेट!" - मास्तर
"एका कोंबडीस तीन तास, तर म्हशीस किती? घाल बोटे, मोज." - बघुनाना
"येशा, मयत" - धर्मा मांडवकर
"मोटार चालू असताना वाटेत म्हैस आली, तर म्हैस मरेल नाही तर काय दूध देईल?" - मास्तर
"जिभेचं हाड मोडलं असेल."
"आमाला पावर नाय!" - आर्डर्ली
"आमाला आमच्या लायनीपरमाने जावू द्या." - आर्डर्ली
"पूर्वी हे नव्हतं. स्वातंत्र्यपूर्व काळात...." - बाबासाहेब मोरे
"म्हैशीना चालते का हो तुमची होमिओपदी?"
"नाय तर हीर नाय मोडत?"

- म्हैस, पुलं

"असा तुकारामच नाय! खरा तुकारामबी असा नाय!"
"अरे भावसाहेब लय पुरानी वार्ता, पण मला वाटते मी पण तिला इकडे तिकडे हात लावित होता"
"आणखीन दोन मिनिट तुम्ही आला नसता ने, तर पँटमध्येच आमचा घंपतीबाप्पा मोर्या"
"ते सिरडीला साईबाबा होता ने? हंड्रेड पर्सेंट गॉड!"
"साला ग्घाम ने ग्घाम ने ग्घाम. साला रॉटन साला."

- हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका, व्यक्ती आणि वल्ली, पुलं

"पुर्ष्या, शिंच्या फुकट हो तू!"
"कार्टे, बूड हलवून उभी रहा अश्शी!"
"खालच्या पानवाल्यालाही ठाऊक नाही तू वर राहतोस ते!"
"काही मास-मटण खायला घालशील तर तुझ्या शिक्षणमंत्र्याला जावून सांगेन याने तिसरीत भूगोलाच्या पेपरची कॉपी केली होती म्हणून."

- चितळे मास्तर

"माय गुड फेलोज..." - अण्णा वडगावकर

"पूस म्हटलं लेका किती नाकं पुसतोस ते" - नारायण

अरे हो, आणि बाकी वाक्यांचे बरोबर आहे. पण त्या स्पेसिफिक लाइन मधला विनोद तो संदर्भ सांगितल्याशिवाय पूर्ण होत नाही. स्टेशनवर ज्याचा दिवस जातो, डबे शोधणे हा ज्याच्या कामाचा मुख्य भाग असतो, त्या हमालाला तिसरा वर्ग कसा ओळखायचा हे कोचरेकर मास्तर सांगतात Happy

हिलरी क्लिन्टन वर लिहिलेलया ' A woman in charge " लेखक कार्ल बर्नस्टाईन या वाचन सुरु असलेल्या पुस्तकातील एक वाक्य ( बिल क्लिन्टन ची व्हाईट हाउस मधील एक कर्मचारी महिला कु.मोनिका लेवेन्स्की बरोबर असलेले संबंध जगजाहीर झाले त्यावेळी) " The cover up is worse than the crime " ( pp 487) हे वाक्य फार महत्वाचे आहे, असे मला वाटले.
बॉब वुडवर्ड व कार्ल बर्नस्टाईन या तरुण पत्रकारांनी १९७२ मध्ये " वॉटरगेट " प्रकरणाचा शेवटपर्यन्त शोध लावल्याने,त्याची परिणीती,प्रेसिडेंट निकसन यांना राजीनामा देणे भाग पडले होते.

There is only one thing that makes a dream impossible to achieve, the fear of failure !!!
- The Alchemist , Paulo Coehlo

थोडा विचार केल्यावर असे वाटते , मराठीमधे अशी स्थळ - काळ - व्यक्ती निरपेक्ष वचने कोणाच्या लिखाणात दिसत नाहीत , सर्वसाधारण जीवनावर , नियतीवर भाष्य करणारी ! ( का मला आठवत नाहियेत ?)
वर जी मराठीतली अवतरणे आली आहेत ती एकतर व्यक्तींच्या संवादातील तरी आहेत किंवा एखाद्या विशिष्ठ व्यक्तीला उद्देशून लिहिलेली आहेत....

थोडा विचार केल्यावर असे वाटते , मराठीमधे अशी स्थळ - काळ - व्यक्ती निरपेक्ष वचने कोणाच्या लिखाणात दिसत नाहीत , सर्वसाधारण जीवनावर , नियतीवर भाष्य करणारी ! (
>>>
तुम्ही आख्खं वपुसाहित्य निकालात काढले की. झालच तर मा. दवणे सर.

"आपल्या देशातल्या लोकांच्या ढुंगणावर, सदैव हंटर हवा, काय? हंटर"
"उगाच शिंच्या त्या पत्रिका-बित्रिका छापून उगाच आमच्या पोस्टाची कामं नका वाढवू निष्कारण"
"साह्य्बानं तारा आणल्या, आणी केली की नाही वेळच्या वेळी सुतकाची सोय"
"राधा, हूज दॅट पार्ट ऑफ द फिजीक, बिलो द नेक अँड अबोव्ह द अ‍ॅबडोमेन"
"वाचलय?, मीच लिहीलय"
"हनिमोर इन मसूरी"
असा मी असामी

"सादंय का येडी?"
"आक्षरास हासू नये"
"नवव्या महिन्याची डिलिव्हरी दहाव्या महिन्यात होते. देव चुकतो, माणसाचं काय?"
पौष्टीक जीवन

"अहो, ती पानपतची लढाई, म्हणतात, ती पुण्यात कुठशी झाली हो?"
"म्हणजे, मी त्यांना गुरूच मानत आलेलो आहे. पण ते मला शिष्य मानतात की नाही, ते मला माहीत नाही"
"कोणाय?"
"काय ही बेटी, तुमची पुण्या-मुंबईची कंजुषी?, घ्या, चहा घ्या"
पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर

एवढ्याने काय होतंय? समग्र पुलं लिहावे लागतील अहो. Proud

वपु साधारण समग्रातले अर्धे लिहावे लागतील. कारण अर्ध्याधिक माराष्ट्रला विनोद फार आवडतो, आणि वपुंचं विनोदाशी फार काय जमलं नाही म्हणे. उरलेल्यातल्या साधारण अर्ध्या लोकांनाच तत्त्वज्ञानाचं आकर्षण असतं. पण उरलेल्यातले उर्लेले अर्धे महाराष्ट्रीय लोक तत्त्वज्ञान समजलं नाही तरी वहीत लिहून ठेवतात. त्यामुळे हिशोब पुन्हा अर्ध्यावर आला.

रस्त्यावरील खड्डे हे लहान मुलांसारखे असतात, पटापट वाढतात<<<<<<<<<<
चैतन्य दीक्षित, मायबोली<<<<<<<<<<

आशुचँप, हे वाक्य चैतन्य रासकरच्या काथ्याकूट मधलं आहे.

वि स खांडेकर यात चपखल बसतात. पण ते फारच विस्मरणात गेलेत. मला शाळेत असलेल्या पाठात त्यांचे एका पर्वताच्या वर्णणात पुढील क्वोट होता ' रुद्रतेतही रम्यता असते "

पुढे वास्तववादी साहित्य, डावे साहित्य, दलित साहित्य आल्यावर खांडेकरांची फारच हेटाळणी झाली... तरी बरं त्याना ज्ञानपीठ होते. नाहीतर त्यांचा ना सी फडके झाला असता....

प्रेमचंदांच्या एका कथेतले मार्मिक वाक्य, 'हिंदूस्तान मे किसके पुरखों के पास बहुत जायजाद नही थी!' किंवा अश्याच धर्तीचे.

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

पु ल

अपूर्वाई

Pages