Submitted by Asu on 24 September, 2018 - 08:27
आम्ही ‘अनुभव हॉलिडेज’ तर्फे दि.१५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०१८ च्या दरम्यान ‘कोस्टल कर्नाटकची’ टूर केली त्या निमित्ताने -
‘अनुभव’चा अनुभव
जन्मा येऊन एकदा तरी
‘अनुभव’सह सैर करावी
साईट सीर्इंग सोडूनच द्या
जेवणामध्येच वसूल करावी
गडबड नाही गोंधळ नाही
आरामात करावे सर्व काही
घरची माणसं आपली सारी
वाटे आपण आपल्याच घरी
पैशाचा हिशोब काही
पैशामध्येच होत नाही
पैसे तर सगळेच घेतात
त्याहून भरपूर हे देतात
मालक कोण नोकर कोण
इथे असती सगळे समान
सेवा करण्या सगळेच तत्पर
न बोलावताही येती सत्वर
आभार तुमचे मानू कसे
सेवेला तुमच्या मोल नाही
कुणा कुणाचे नाव घेऊ
आम्हां काही उमजत नाही
विनंती एवढी आहे देवा
वर आम्हां फक्त द्यावा
नेहमी नेहमी ‘अनुभव’चा
अनुभव आम्ही अनुभवावा
- प्रा.अरुण सु.पाटील(असु)
(22.09.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा