मुंबई अग्निसंरक्षण दल. एक चांगला अनुभव.

Submitted by अमा on 8 September, 2018 - 09:54

मुंबईच्या सेंट्रल सबर्ब्स मध्ये लाल बहादुर शास्त्री हा एक आर्टेरिअल रूट आहे. दिवस रात्र बिझी अस णारा. इथले अनेक लँड्मार्क वर्षा नुवर्षे प्रसिद्ध झालेले आहेत. मुलुंडातले जाँसन कंपनीची फॅक्ट्री व त्याही पेक्षा तिची बाग अगदी लोकप्रिय आहे. ह्या सिग्नल समोर एक फायर स्टेशन आहे तीन ट्रक कायम गो मोड मध्ये रोड कडे तोंड करून उभे, एक मोठे साधे घड्याळ जे मी जाता येता बघून त्याप्रमाणे आता काय करायचे ते आखत असते. व एक साधे पण सुरेख गणपतीचे देउळ. देउळ आत आहे पण त्याच्या मागच्या बाजूस एक बस स्टॉप आहे तिथे उभे राहणारे व पासरबाय पब्लिक ह्या पा ठच्या गणेशाला पण नमस्कार करतात हे मी रोज बघते. एकदा एक कुत्राचालक कपल से जय जय टू बाप्पा बेबी म्हणताना पण बघितले आहे. ह्या आतल्या मैदानात कुत्रे आणायला परवान गी नाही. इथे पहाटे ह्यांच्या कवायती फिझिकल व्यायाम वगैरे चालतात. बाहेरून फिरताना कमांड र चा आवाज येतो. घरी परत येताना सामान ऑर्डर केलेले डिलिव्हरी घेताना नेहमी वो फायर ब्रिगेड हैना वहांसे टर्न लेलो असे सांगणे असते. मुलुंड सबर्बन लाइफ मध्ये ह्या स्टेशनचा एक अविभाज्य सहभाग आहे.

परवा अचानक ह्या दूर दूरसे प्यारचे एकदम रिलेशन शिप मध्ये रूपांतर झाले. मी सकाळी कुत्र्याला फिरवायला गेलेले. माझ्या अंगात ताप होता. त्यामुळे हे उरकून आता अर्धा तास आराम करून कामाला जावे का रजाच घ्यावी त्या अर्धवट विचारात मी होते. स्वीटी व तिचे दोन स्ट्रे मित्र इथे तिथे मागे बेसमेंट मध्ये फिरत होते. मोकळी जागा आहे व तिथे फिरवायला सोसायटीची परवानगी आहे. अचानक त्यांना एक मांजर गवतात आराम करत होते ते दिसले. ह्यांना बघून ते सुसाट पळले व हे तिच्या मागे....!!! मग बराच वेळ शोधा शोध झाली. डॅशुंड कुत्र्याचे एक आहे प्रचंड हेके खोर. एक करत बसले की तेच पार जीव जाईस्तो थके परेन्त कर णार. मग ते मांजर नाहिसे झाले असले तरी प्रचंड शोधाशोध झाली अचानक एक सलग आवा जात रडके भुंक णे ऐकू आले. मी व एक पोरगा गाडी पुसत होता आम्ही दोघांनी चमकून पाहिले तर दोन मोठी कुत्री सैरभैर फिरत होती व. स्वीटी दिसत नव्हती. Sad

झाले काय मोकळ्या जागेत खूप दिवस आधी ते स्लॅ ब भरताना खाली सपोर्ट लावतात ते पाइप एक मोठी लॉरी भरून आणून टाकले होते. बरोबर पत्रे स्टील ची स्टुले वगैरे. तर स्वीटी बारीक व लांबोळ क्या शरीराची असल्याने ती मांजराच्या शोधात त्या पाइपच्या मोठ्या पाइल मध्ये आत कुठे तरी गेली व मग बाहेर येता येइना. मी दहा मिनिटे प्रयत्न केला शोधायचा आवाज दिला व दिसली तर तिला सांगून सांगून बाहेर आणता येते.

पूर्वी वीनी ने पण असा स्टंट केला होता पण ती बांबूच्या ढिगा खाली अडकलेली. हे पाइ प मला एक पण उचलणे शक्य नव्हते. मग बी ब्लॉक च्या वॉचमनला विचारले तो म्हणे मेन गेटला जा, तिथे दोन तीन माणसे भेटतील त्याना रिक्वेस्ट करा नाहीतर सर ळ फायर ब्रिगेडला बोलवा. आपल्याला ह्या बाबतीत किती कमी अनुभव असतो. फेसबुक व र रेस्क्यू बघतो नाहीतर पेपरात रेस्क्यू, फायर ऑपरेशन्स बघतो व वाचून सोडून देतो. मग सोसाय टीचा केअर टेकर मुलगा आहे त्याला दाखवले मागे आणून !! तो फोन वर बोलत होता मला म्हणे बुलाना पडता १०२ कॉल करो म्हणून चालता झाला. आता काही इलाजच नाही. १०२ नंबर लावला. तो लागला पण पण १०२ हा अ‍ॅम्ब्युलन्स नंबर आहे. ते म्हणे १०१ वर कॉल करा. तो लावला. मग शुद्ध मराठीत काय मदत करू असा प्रश्न आल्यावर केविलवाणे पणे सांगितले आदमी भेजो म्हणून . त्यांनी पण फोन वर समजू त घातली रडू नका म्हणून. .. पण हेल्पलेस वाट्त होते हे खरे...

मग दहा मिनिटात फुल मोठी फायर ट्रक लाइक वी सी इन मुव्हीज आली. चार तगडे बाप्ये तरूण फुल्ली फायर सूट मध्ये व विथ स्पेश ल हेल्मेट्स, एक महिला ऑफिसर व एक मोठे साहेब युनिफॉरम वाले. हे एअर्फोर्स पायलट सारखे दिसत होते. मी त्यांना नमस्कार करून परिस्थिती सांगितली. फोटो दाखवला कुत्र्याचा पेट आहे हे सांगितले. ह्या सर्व टीमला डिस्ट्रेसड व्यक्तींशी कसे बोलायचे वागायचे ते नक्की ट्रेनिन्ग मिळाले आहे. मग त्याम्नी तो गाडिपुश्या मुलगा, अजून एक त्याचा कलीग व दोन त्यांचे जवान मिळून एक एक पाइप उचलायला सुरुवात केली. पण त्यांना फार मेहनत करावी लाग ली नाही. कुत्र्याचे भुंक णे बंद झाले होते..........

मागच्या बाजू ने शेपटी हलवत स्वीटी हजर. सर्वांचे चेहरे उजळले. ....... त्यांनी लगेच परत जायचे चालू केले. कारण कामच झाले होते.
मी साहेबांना काय चार्जेस असतात असा स्टुपीड प्रशन विचारला . त्यांनी काही नाही असे विनम्र पणे सांगून परतीची तयारी केली. मी हात जोडून नमस्कार धन्यवाद करून परत निघाले.

ज्यांची घरे माणसे अग्निच्या संकटात सापडत असतील त्यांचे काय होत असेल हे मी अनुभव ले त्यापेक्षा कितीतरी अवघ ड व भयानक असेल जे व्यक्तिशः जाणव ले. माझी तक्रार खरे तर त्यांच्या साठी चिल्लर टाइपच होती पण मला फुल प्रोफेशनल ट्रीटमेंट मिळाली. व मुंबईचे रक्षक जे पोलीस, सर्विसेस, इमर्जन्सी सर्विस पीपल व फायर ब्रिगे ड ह्यांचा शहराला किती तगडा सपोर्ट आहे त्यांचा बारका डॅशुंड लेव्हल अनु भव मिळाला.

मी कृत ज्ञता म्हणून त्यांना मिठाईचे बॉक्स / फुले/ अत्तर बाटल्या / गणेशो त्सवात डोनेशन द्यावे असा विचार केला पण ते ही कमीच वाट्ते आहे व वर वरचे जेस्चर वाट्ते आहे. आमची कंपनी स णासुधीला पूजेसा ठी वगैरे अत्तर सँपले वाट्तेच नेबरहूड मध्ये . फार आधी पासून त्यात नवे काय.

मुंबई फायर ब्रिगेडला एक सॅल्युट.
ही त्यांची साई ट. आय शुड पे इट फॉरवर्ड. काही वोलेंटिअर ट्रेनिण्ग घेता येते का ते तपासते.
https://en.wikipedia.org/wiki/Mumbai_Fire_Brigade

http://www.mahafireservice.gov.in/Site/Home/Home.Aspx

लक्षात ठेवा १०१ फॉर ट्रक. १०२ फॉर अ अ‍ॅम्ब्युल न्स.

दे सर्व्ह टू सेव्ह . हाउ ट्रू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, छान,
कृतज्ञता व्यक्त करायची पद्धत आवडली,

मुंबई अग्निशमन चे FB पेज असेल तर तिकडेही टाका,
आणि अर्थात तुमच्या FB वर

सर्व अनुभवाचा पोस्ट परि णा म म्हणून कि काय कुत्र्याला १०४ ताप भरला मग नेक्स्ट डे नो वॉक!!! नो वॉक हे डॉग ओनरसाठी फार विचित्र फीलिन्ग असते. कारण दोन वेळा फिरायचे कुत्र्याने आपल्याला ट्रेनिन्ग दिलेले असते!!! आज सर्व परत नॉर्मल आहे. सकाळी तिघे वेअर अप टू नो गुड अ‍ॅज युजवल. मी एक लहान मुलांची कविता केली. पक्षी बडबड गीत.

Three idiots chased a brown cat
Cat ran away....
The sausage dog got stuck
till the pipes c ame away...
One ignored the whole thing
and the other waited
for the Doxie buddy
and watched mommy pray. Wink

एकदम अमा स्टाइल लेख.
मला शाळेत असतानाची आठवण झाली.
शाळेशेजारच्या योगानंद सोसायटीच्या एका window overhang वर एक मनिमाऊ अडकलेली. तिला सोडवायला फायरब्रिगेडला बोलवलेलं.
आमच्या सोसायटीत एक पारसी बावाजी घरात एकटेच गाढ झोपले होते.
तेव्हा खिडकीतून जाऊन दार उघडायला ( तेव्हा खिडक्यांना जाळ्या, ग्रिल्स मस्ट नसत) फायरब्रिगेड आलेलं.
धोकादायक झाडं तोडायलापण ते येतात.

मुंबई अग्निशमन चे FB पेज असेल तर तिकडेही टाका,
आणि अर्थात तुमच्या FB वर>>. हो शोधून करायचे आहे. पण हे सर्व किती वर वरचे आहे. असे वाटून स्वतःचा कमी पणा जा ण वतो. ऐरोली मध्ये त्यांचे फायर हॉस्पिटल आहे. तिथे जाउन भेटता येइल . फार जखमी झालेले अग्नि कर्मचारी तिथे अ‍ॅडमिट असतात. पहिले तर गणे शो त्सवात मंदिरात जाणार आहे.

शाळेशेजारच्या योगानंद सोसायटीच्या एका window overhang वर एक मनिमाऊ अडकलेली. तिला सोडवायला फायरब्रिगेडला बोलवलेलं.>> खरं मी पण रोजचा टाइम्स खरे तर शहरातले असे अपघात, गुन्हे व त्यांचे फॉलो अप फार मन लावून वाचते. फार शिकायला मिळते. बिचारे विक्टीम्स त्यांच्या जीवना बद्दल विचार करते.

अहो महत्वाचे म्हणजे ८ तारीख आमच्या एका जवळच्या नातेवाईक बाईंचे वर्श श्राद्ध. त्यामुळे माझी व मुलीची मन स्थिती तशीच नाजूक होती. ये वीक एंड निकल जाई बस... फिर देख लेंगे सिचुएशन होती. त्यात माझ्या चुकीने कुत्र्याला काय झाले असते तर वी वेअर क्रश्ड. फॉर शुअर. आता धडा घेतला आहे. लीश सोडत नाही जाम. Wink

मुंबई अग्निशमन चे FB पेज असेल तर तिकडेही टाका,
आणि अर्थात तुमच्या FB वर
<<
Tweeting it reaches the officials. And it usually counts during so called appraisals

<<< मी सकाळी कुत्र्याला फिरवायला गेलेले. >>> .... <<< बेसमेंट मध्ये फिरत होते. मोकळी जागा आहे व तिथे फिरवायला सोसायटीची परवानगी आहे. >>>
पण मुळात प्रश्न हा आहे की कुत्र्याला फिरवायला नेताना पट्टा बांधला नव्हता का? आणि तो हातात धरला न्हवता? की बेसमेंटमध्येच आहे म्हणून कुत्र्याला मोकाट सोडले होते? मग अशा परिस्थितीत तो कुत्रा कुणाला चावला तर?

कुणाला चावेल, कुणाला नाही हा प्रश्न नसून कुत्रा बाहेर असताना लीशवर आहे हे बघणं ही कुत्रामालकाची जबाबदारी आहे. सगळीच मंडळी कुत्राप्रेमी नसतात.

छान अनुभव. सरकारी संरक्षण व मदतीची काय व्यवस्था आहे हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे असे काही झाले की गहिवरून येते. संबंधित लोकांना ते रोजचे काम असते.

बाहेर फिरवताना कुत्रा लिशवर असलेला बरा, काही लोकांची पळापळ होते कुत्रे पाहिल्यावर. कुत्रेच काय, कुठलाच प्राणी कारण नसताना आक्रमण करत नाही, कारणाशिवाय चावणे फक्त माणसाची मक्तेदारी आहे.

तो वीनर डाॅग आहे हो, राॅटवायलर नाहि. तरीहि डाॅग सदासर्वकाळ लिशवर असणं याबाबत सहमत...

वीनर म्हणजे लहान का?

बहुतेक बिल्डिंगच्या बेसमेंट मध्ये असल्याने मोकळे सोडले असणार. आमच्या इथे काही लोक लॅबरी किंवा अल्सशियनएवढे मोठे कुत्रेही लिश न लावता स्वतःबरोबर घेऊन चालायला येतात. कुत्रे अगदी समजदाराप्रमाणे कुठेही न भरकटता मालकाला सोबत बरोबर चालवत नेतात.

आमच्या इथे काही लोक लॅबरी किंवा अल्सशियनएवढे मोठे कुत्रेही लिश न लावता स्वतःबरोबर घेऊन चालायला येतात. कुत्रे अगदी समजदाराप्रमाणे कुठेही न भरकटता मालकाला सोबत बरोबर चालवत नेतात.>>>> बापरे, किती भयानक प्रकार आहे हा. मला कुत्र्यांची खूप भीती वाटते, एकवेळ रस्त्यावरचे परवडले, पण पाळीव नको. अगदी बांधलेले , मालकाच्या हातात दोरी असलेले कुत्रे जरी पाहिले तरी माझी वाट बदलते मी किंवा ते जाईस्तोर कुठंतरी थांबते, तेही त्यातल्या त्यात सुरक्षित अंतर ठेवून. उगा रिस्क कशाला.☺️

छान अनुभव ,

२५ वर्षापुर्वी आमच्या सोसायटीच्या एका व्यक्तीने मुम्बई फायर ब्रिगेड ला किती वेळात गाडी येते ते बघण्यासाठी कारण नसताना कॉल केला होता, तेव्हा गाडी १५ मिनिटात कंपाऊड मध्ये होती. नंतर त्या माणासाला भरपुर दंड केला होता. सोसायटीचा सेक्रेटरी असल्याने विनाकाराण यात वेळ गेला होता. पण त्यावेळी त्याची चुक नसताना पण ते खुप प्रोफेसनली वागले होते.
माझा शाळेतील मित्र मुम्बई अग्निशामक दलात ऑफिसर आहे. त्याचा फेसबुक वर ट्रेनिंग चे फोटो / रेस्कु ची माहिती येत असते. बातम्यात पण फायर ब्रिगेड बद्दल फक्त चांगलेच एकण्यात येत असते.

मूंबईत पाळीव कुत्रापेक्षा कितीतरी पटीने जास्त भटकी कुत्री आहेत आणि ती जास्त चावरी असतात. मागच्याच आठवड्यात माझ्या वडलाना एक भटका कुत्रा कारण नसताना चावला होता. भारतात पाळीव कुत्र्याला पट्टा बांधला होता की नाही याचा काही फरक पडत नाही.

Vb, कुत्रे नाही चावत. मीही आधी खूप घाबरायचे, कुत्रा दिसला की रस्ता बदलायचे. माझ्या मुलीच्या क्रेश मालकिणीकडे पॉम्मी भेटले. मला बघितले की ते धावत येऊन मला खाजव म्हणून आग्रह धरायचे. भीतीपोटी तो आग्रह मोडायचे धाडस मी करू शकत नव्हते. हळूहळू सवयीने कुत्र्यांची भीती मोडली. आता मी पाळीवच काय भटक्या कुत्र्यांच्या डोक्यावरूनही हात फिरवते. तेही डोळे मिटून शांत प्रतिसाद देतात.

साहिल, तुमचे बरोबर आहे, काही भटके कुत्रे खूप अग्रेसिव्ह असतात. झुंडीने फिरतात व येताजाता खूप भुंकतात. त्यांना बघूनच भीती वाटते. त्यांच्यापासून दूर राहिलेले बरे, विशेषतः सोबत लहान मूल असेल तर त्याला अशा वेळी उचलून घेतलेले बरे. लहान मुलांवर हल्ला केल्याच्या काही घटना मुंबईत घडलेल्या आहेत.

<<< आता मी पाळीवच काय भटक्या कुत्र्यांच्या डोक्यावरूनही हात फिरवते. तेही डोळे मिटून शांत प्रतिसाद देतात. >>>
हॅ हॅ हॅ, आयुष्यात कधी संधी मिळाली की नक्की पुढील ब्रीडच्या डोक्यावरूनही हात फिरवत जा.
१. Pit Bull Terriers
२. Staffordshire Terriers
३. Rottweilers
४. German Shepherds
५. Presa Canarios
६. Chow Chows
७. Doberman Pinschers
८. Akitas
९. Wolf-Hybrids
१०. Mastiffs
११. Cane Corsos
१२. Great Danes
१३. Alaskan Malamutes
१४. Siberian Huskies

लेखिकेने लिहिलेले Dachshund कुत्रे देखील अग्रेसिव्ह असतात.

अगदी सहमत आहे. खाजगी पाळीव प्राणी वाचवायला फायर ब्रिगेडने येणे बंद केले पाहिजे किंवा मालकाकडून त्या कामाचे पैसे वसूल केले पाहिजेत.
हे वाचा.

उ बो, इथे कुठून दिसणार हे, इथे अल्सशियन, लॅबरी, पॉमी व बाकी लोकल ब्रीड. आणि मी काही तुम्हाला किंवा अजून कोणालाही तुम्हीही डोक्यावरून हात फिरवा म्हणून सांगत नाहीये, मी काय करते ते सांगितले.

<<कारण नसताना आक्रमण करत नाही, कारणाशिवाय चावणे फक्त माणसाची मक्तेदारी आहे.>>
हे कुत्र्यांना माहित आहे का?
नि कारण काय हे ठरवायचे कुणि? कुत्र्याने की माणसाने? की कुत्रा नि माणूस यावर चर्चा करून ठरवतात?

अमा, आशय चांगला आहे पण लेख वाचवला नाही. वाक्य पूर्ण करणारी क्रियापदे आणि मोजके शब्द वगळता इतके जास्त इंग्रजी शब्द का वापरलेत? मुद्दाम ओढूनताणून मराठी शब्द वापरू नये याच मताचा मी आहे, पण ह्या लेखात लंबक पलीकडे गेलाय असं वाक्यवाक्याला जाणवत होतं.

ते म्हणे १०१ वर कॉल करा. तो लावला. मग शुद्ध मराठीत काय मदत करू असा प्रश्न आल्यावर केविलवाणे पणे सांगितले आदमी भेजो म्हणून .
--
?
Uhoh

Submitted by अमितव on 9 September, 2018 - 20:43
ते म्हणे १०१ वर कॉल करा. तो लावला. मग शुद्ध मराठीत काय मदत करू असा प्रश्न आल्यावर केविलवाणे पणे सांगितले आदमी भेजो म्हणून .
-->.. अहो निराश होउ नका. मी शुद्ध्ह मरा ठीतच बोलले.

ते: नमस्कार, आपल्याला काय मदत करू?
मी : माझा कुत्रा पाइप खाली आडकला आहे. भ्याआआआआआअ
ते: अहो रडू नका.
मी: हो सॉरी. कुत्रा अडकला आहे. तर कृपया माण्से पाठ्वा माझ्या एकट्याने तो निघणे शक्य नाही.
ते: तुमचा फोन नंबर द्या.
मी : हा घ्या हा इंग्रजीत सांगितला.
व नंतर धन्यवाद म्हटले
ते : पाठवतो..
मी :आदमी भेजो प्लीज. ( पार्ट हैद्राबादी पार्ट कॉस्मोपॉलिटन मुंबईकर.)
असे झाले ते.

अमितव>> हो मान्य आज एडिट करायला गेले तर पूर्ण लेखच उडला. मग बॅक येउन सेव्ह होता ते बघितले. नाहीतर उगीच प्रतिसाद वाचून लेख उडविला कि काय असे वाटा यचे.

> खाजगी पाळीव प्राणी वाचवायला फायर ब्रिगेडने येणे बंद केले पाहिजे किंवा मालकाकडून त्या कामाचे पैसे वसूल केले पाहिजेत. > +१

बड्बड्गीत किती गोड आहे Lol
तुमचा लाडका भूभू सुखरूप राहिल्याबद्दल अभिनंदन. Happy ending! thanks to fire brigade.

अग्नीशमनदलाचा भार कमी करावा, त्यांचे कार्यक्षेत्र हे त्यांचे कौशल्य आणि मानवशक्ती यांच्या सुसंगत असावे.

तसेच जी कामे त्यांच्या आखात्यारीतून काढण्यात येतील त्या करीता वेगळे दल स्थापन करावेत. त्यांनी दिलेल्या सेवेचा मोबदला सेवार्थींकडून वसूल करण्यात यावा.

खाजगी मालमत्तेस लागलेल्या आगी विझवण्यास दिलेल्या सेवेचा मोबदला सुद्धा मालकांकडून वसूल करण्यात यावा.

Pages