सर तुम्ही नसता तर

Submitted by शुभम् on 4 September, 2018 - 22:50

ज्यावेळी कळत नव्हतं
चांगलं तुम्ही शिकवलं
जेव्हा जास्त कळू लागलं
वाईटा पासून रोखल

तुमचा मार खाऊन सर
यशाची शिडी चढली भरभर
गर्वात बुडून गेलो असतो
तुम्हीच शिकवलं  
नम्रतेने व्हावे सादर

दररोजची प्रार्थना अशीतशीच म्हणायचो
फळ्यावरची सुविचार तुम्ही सांगता म्हणून लिहायचो
कळालं नाही  महत्व तेव्हा आता ते कळत आहे
तेव्हा लावलेले बीज फुल होऊन फुलतं आहेत

छडीच्या भीतीने गृहपाठ आम्ही करायचो
जेव्हा गृहपाठ राहायचा छडीच आम्ही लपवायचो
शिकवण्याची तळमळ तुमच्या आम्हाला समजायची नाही
मारा मागची सदभावना तेव्हा आम्हाला कळायची नाही

जेवणाच्या सुट्टीमध्ये खेळ आम्ही खेळायचो
एकमेकांना भांडायचो भांडता भांडता मारायचो
तुम्ही यायचा तेव्हा भांडण आमचं सोडवायला
समोरच्याची बाजू घेता म्हणून राग तुमचा यायचा

वय वाढलं तसं मस्ती आमची वाढली
टिंगल तुमची करण्यापर्यंत मजल आमची गेली
तुम्ही फक्त हसायचा
मुलं ती मुलं म्हणून ततिथल्या तिथे सोडून द्यायचा
त्यामुळेच सर आमच्या आम्हालाच आमचा अपराधीपणा खायचा

सॉरी म्हणायला सर
आम्ही दुसऱ्या दिवशी यायचं
कशा बद्दल म्हणून
तुम्ही विसरलेला दाखवायचं

तुमची सवय आम्हाला इतकी झाली होती
तुमच्या विना शिकण्याची कधी कल्पनाच केली नव्हती
सेंड ऑफ च्या दिवशी आम्ही खूप रडलो होतो
तुम्ही दुःख जरी दाखवत नव्हता
आम्ही तुमचं मन ओळखायला शिकलो होतो

आता वाटतं सर पुन्हा एकदा यावं
त्याच वर्गात बसावं
तुम्ही आम्हाला शिकवावं......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कविता... पण मला शाळा शिकून काय फायदा नाही झाला, कोणत्यातरी म्हाताऱ्याने काढलेल्या कंपनीत एक्सेल आणि outlook वर टायपिंग करायला लागते, enginerring सोडूनच द्या साधं पाचवीच्या पुस्तकात शिकलेल्या विज्ञानाचा आता काही उपयोग नाही होत,