Mens so called Ego Pampering

Submitted by समाधी on 1 September, 2018 - 14:27

माझा 1ला धागा
मी कदी काढेन असे वाटलेच नवते पण काडतेय
आता बरेच जण जे आधीपासून टपून बसले असतील माझ्या काई लिहिण्याची, त्यांची मज्जाच मज्जा तोंडसुख घेयाला

मला फक्तत एकच विचाराचे, की काही पुरूष मंडळी जी असे तर स्वताला खूप सभय असे दाखवितात, त्यांचा सो काल्ड इगो का दुखतो जर एखादी स्त्री त्यांच्यामनाविरुद्ध काही बोलली , का त्रास होतो जर एखाद् स्त्रीने स्वतासाठी विचार केल। । त्यांनी काहीही बोलावे पण तेजर ति बोललेली की इगो दुखलाच पायजे असे का। का तयांना त्येंचा इगो पमपेर करावे लागते सारखे।तसे तर कितीतरी जण स्त्री आयडी काढून त्यामागे लपताय हे फकत इकडेच नायतर फेबुवर पण बघितलाय
अजून लिवायचंय, पण ननंतर लिहीन म्हणते
बघू मायबोली वरच्या पुरुषांच्या काय मत आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांचा सो काल्ड इगो का दुखतो जर एखादी स्त्री त्यांच्यामनाविरुद्ध काही बोलली , का त्रास होतो जर एखाद् स्त्रीने स्वतासाठी विचार केल।

>>> रेफेरेन्स द्याल का

काहीही हं समाधी जी. संदर्भ देऊन जरा शुद भासेत लिहीलं असतं तर? आपके इऽऽगोका क्या? आखीर कैना क्या चाह्ती है आप?

बगा। म्हटलं नव्हतं पुरुषांना इगो खुsssss प मोठा आसतो। आता ही लगेच आले कारण संदरब ईचारायला।

घ्या एक सांगते। जर एकाद्या मुद्द्यावर मुलीला बोलाइयचे असेल पण तेंचा मुड नसेल तर ठिकेय। पण चुकून त्येना काई सांगाइयेचे असेल पण मुलीचा मूड नसेल तर दुकला इगो।
आता हा एक छोटासा संदर्भ आहे। अजून हवे असतील तर आठवा । तुमलेच खूप आठवतील

तुमचं बरोबर आहे इगो हा सगळ्यांनाच असतो, अपवाद माझ्यासारखे अजून एक दोन असतीलही, ज्यांना इगो नसतो, अतिशय खडतर तपश्चर्येने आम्ही हे साधले, पण नियमाला अपवाद हा असतोच.,

मी समाजात वावरताना नेहमी इगो बाजूला ठेऊन वावरतो, मी माझा इगो संदुकीत संदुक ठेऊन त्याला भलं मोठं लॉक लावून समुद्रात फेकून दिलाय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच समाजात तसेच मायबोलीवर वावरताना मी नेहमी स्थितप्रज्ञ असतो, लोक काय बोलतात काय म्हणतात याकडे मी नेहमीच दुर्लक्ष करतो, थोड्याशा स्तुतीने हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही तसेच निंदा नालस्तीने खाचिकरण ही होऊन देत नाही, अनेक वेळा माझी निंदा नालस्ती करणारे माझे अनुयायी बनतात आणि माझ्याकडे मनःशांतीच्या क्लासला आपले नाव नोंदवतात, मग त्यांना मी अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालायची वाट दाखवतो.

बोकलत ;स्मित:

ओ 009, बरे झाले तुमी या वेली पुरुश आयडी घेतला। कल धागा रागात काढलं होता। पण तुमि दाखवून दिलंत की ओ इगो कसा हर्ट होता। माजकडून तुमले बी गेट वेळ सून

आनी 1 ओ 009, हितन पुढे तुमि काय बी बोला। तुमचे इगो साती। तुमले सोडून बाकीचेंचे जर कुणी लिवल तर वाचीन मनते। तुमि बसा कुरवाळीत तुमचा इगो।

same to you म्हटल्याने आपला आजार दुसऱ्‌याला कसा जाईल? चांगला तज्ञ बघुन उपचार घ्या . इगु दुकतोय असं सांगा बरं डागदरला.

कलपेशकुमार इगो म्हणजे तोच जो आता तुमचा दुखावला जेवा मी तुमची दुशासन वाली कमेंट कोट केली साडीच्या धाग्यावर Rofl

आणि एक, तुम्हाला जे बोलायचे ते बोला, है आयडीने की दुसऱ्या कुठल्याही, माजकडून इग्नोरस्त्र
कायेना माजेकडे इतका वेळ नाहीये कि मी कुणाचा इगो पमपेर करू की कोणी इतके महत्वाचे पण नाहीये की त्यांचे कमेंट कडे लक्ष देऊ

सोबेस्ट लक्
चालू दे तुमचे

ओ समाधि ताई
जरा शुद्ध लेखनाकडे बी ध्यान द्यावे की माणसाने Lol
मनोगत लेख लई सूद भासेत
आन हयो प्रतिसाद एवढा अशुद्ध Proud
लई नाइंसाफी है यह

एकदा एका जंगलात एक बकरी शिरते. खूप वेळ इकडे तिकडे फिरते पण पाहिजे तसे गवत मिळत नाही, म्हणून मग ती हरिण बनते. खूप जोरात धावून सर्व जंगल पालथे घालते तरी मनाचे समाधान होईल असे गवत मिळत नाही. आता ती गाय बनते आणि जंगलाच्या आजुबाजुलासुद्धा फिरून येते. तरी हवे तसे गवत कुठे दिसत नाही. सरते शेवटी ती हत्तीण बनत मग त्या गावात आणि जंगलात निव्वळ धुमाकूळ घालते आणि मनसोक्त गोंधळ घालून झाल्यावर मग तिला लक्षात येते की अरे आपल्याला तर भुकच लागली नव्हती !

हे अनेकदा असेच होते Happy
मायबोलीच्या जंगलात अनेक आयडी येतात....मग त्यांचे ड्यू आयडी सुद्धा बनतात जसे बकरी पुढे हत्तीण झाली.... अनेक धाग्यांवर मनसोक्त धुमाकूळ घालून झाला की नंतर त्या आयडीच्या ओरिजनल मनाला आठवते Rofl की अरे... मला तर हे काही करायची खरच गरज नव्हती ! माझी ती भुकच नव्हती ! मी तर फक्त छान छान कथा वाचायला इकडे वळलेले...!!
-------------------------------

आता वरील गोष्टीचा संदर्भ कुठे कुठे कोणाच्या कोणाच्या धाग्यावर / कवितांवर गोंधळ घातलेला आढळत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. Proud

मी तर फक्त छान छान कथा वाचायला इकडे वळलेले...!!>>>+11111

हो ना
फकत हे कळायला बराच उशीर झालेला असतो,
मुख्य म्हणजे याची जाणीवही एका संस्कारी मनाला होते
पण काही लोक याचा गैर अर्थ काढतात
समोरच्याला भ्याड समजतात
पण शहाणपण यातच असते की वेळीच सावरणे

शेवटी प्रत्येकाने आपली पातळी आपणच गाठायची, समोरच्याने ती सोडली म्हणून आपण सोडू नये

पण तरी हे मात्र अगदी खरे की पुरुषांना इगो प्रॉब्लेम बायकापेक्ष जास्त असतो, एखादी स्त्री मला इग्नोर करतेय भाव देत नाहीये हे पचविणे त्यांना जड जातेच

बरं...

हे मात्र अगदी खरे की पुरुषांना इगो प्रॉब्लेम बायकापेक्ष जास्त असतो, एखादी स्त्री मला इग्नोर करतेय भाव देत नाहीये हे पचविणे त्यांना जड जातेच>>

सहमत. सद्य परिस्थिती आहे ही.

हे मात्र अगदी खरे की पुरुषांना इगो प्रॉब्लेम बायकापेक्ष जास्त असतो, एखादी स्त्री मला इग्नोर करतेय भाव देत नाहीये हे पचविणे त्यांना जड
जातेच>>
अशी शक्यता कमीच वाटते. कारण आजूबाजूला बघितल्यावर असे वाटते कि सगळे पुरुष प्रत्येक स्त्रीला भाव देत असतो (नैसर्गिक कारण) त्यामुळे भाव न मिळाल्यास एखाद्या स्त्रीला नक्कीच राग येऊ शकतो. पण सगळ्या पुरुषांना सगळ्या स्त्रियांकडून कधीच भाव मिळत नाही त्यामुळे त्यांना 'इग्नोर' पचवण्याची सवयच असते अक्कल आल्यापासुन. Happy

काय्प्पा वरुन -
"ईगो - ढुं** सारखा असतो, दुसर्याचा दिसतो स्वत:चा दिसत नाही ....! "

दुसर्‍याचा असतो तो इगो, स्वतःचा असतो तो स्वाभिमान!
तर हा इगो/स्वाभिमान बायकांपेक्षा पुरुषांना जास्त आहे असे वाटत असले तरी करणार काय? त्रास होतो का कुणाला?
म्हणजे धागा काढण्याचे कारण केवळ एक मत मांडणे की तक्रार करणे, की हा सो कॉल्ड इगो पुरुषांनाच जास्त का असतो याची कारणे शोधून काढणे हा आहे?
असल्या इगो वगैरे गोष्टी अत्यंत वैयक्तिक, कमी अधिक प्रमाणात असतात. त्याचा जास्त त्रास होत नसेल तर सोडून द्याव्यात.

असल्या इगो वगैरे गोष्टी अत्यंत वैयक्तिक, कमी अधिक प्रमाणात असतात. त्याचा जास्त त्रास होत नसेल तर सोडून द्याव्यात. >>
बरोबर आहे !!

कारण पुरूषांचे स्त्रियांवर प्रेम असते. >>> बिग जोक, मला नाय वाटत पुरुश स्त्रियांवर प्रेमकरतात,, बरेचदा हेतु वेगळाच असतो

Pages