आवाज (शतशब्द भयकथा)

Submitted by किल्ली on 29 August, 2018 - 07:56

रात्रीची वेळ होती. अमावास्या असावी. दिवे गेल्यामुळे किर्रर्र अंधार दाटला होता. सर्वात वरच्या मजल्यावर तिचे घर होते. एकटीच राहणारी ती कुतूहलाचा विषय होती. अंगावर गच्च पांघरूण ओढून ती झोपण्याच्या प्रयत्नात होती. इतक्यात छतावरून धप्प धप्प आवाज येऊ लागले. मागे एकदा इमारतीच्या कुणीतरी आत्महत्या केल्यापासून गच्ची कायमची बंद करण्यात आली होती. हे आवाज कुठून, कसे येत असतील ह्या विचाराने ती घाबरली, भीतीने शब्द फुटेनात, घशाला कोरड पडली. आवाजांची तीव्रता कमी जास्त होत होती. अचानक तिला खिडकीबाहेर काळ्या सावल्या हलताना दिसल्या. कमकुवत मनाची ती भयातिरेकाने कोसळली.

सकाळी खाली राहणाऱ्या बाई बोलत होत्या, "बरं झालं,गच्ची खुली केली, काल रात्री पोरं मस्त मिळून खेळली नाही!"
------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
अमानवीय धाग्यावरती अनुभव लिहिताना ही शशक सुचली, सहन करा Proud
---------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे. बिच्चारी.
(स्पेशल दुआ दिल्याबद्दल पुढील ३० दिवस तुमच्या सर्व लेखनाचे कौतुक केले जाईल. Lol )

किल्लि मला कळली नाही
सविस्तर समजावून सांग प्लिज>>> कथा लिहिताना मला अभिप्रेत असणारा अर्थः
तिच्या मनाला माहित आहे की गच्ची बन्द आहे, पण गच्चीचा इतिहासही तिच्या मनाच्या कोपर्यात सेव आहे. शिवाय एकटी राहते. त्यामुळे छतावरुन येणारे आवाज ऐकुन घाबरली, मनाने कमकुवत असल्यामुळे कोसळली (बेशुद्ध/मृत ).
गच्ची उघडली जाउ शकते आणि पोरे खेळू शकतात, हा विचारच तिच्या डोक्यात आला नाही.

ती" तीच होती ना जीने आत्महत्या केली होती.>>> हा ही अर्थ लावता येउ शकतो..
कारण कथेत जास्त सविस्तर वर्णन, कारणे नाहीत शशक असल्यमुळॅ

धन्स दक्षिणा,akki320,द्वादशांगुला,शाली Happy
@ शाली : कवतिक खर खर करा हो, जे काही असेल ते मत द्या Proud
रही बात दुआ की, हमारे राज्य मे दुआ के बदले दुआ करो Lol

छान कथा!
या कथेतुन हा संदेशदेखील मिळतो की, कमकुवत मनाच्या लोकांनी रात्रीचे एकटे राहू नये. Light 1

धन्स दासानु दास Happy
भीती हेच मूळ आहे भुत वगैरे गोष्टीन्च आणि अशा समस्यान्च Happy

छान.

> "ती" तीच होती ना जीने आत्महत्या केली होती. > हा अर्थ भारी आहे.

धन्स अॅमी Happy

> "ती" तीच होती ना जीने आत्महत्या केली होती. > हा अर्थ भारी आहे.+११११११

गोष्ट म्हणून चांगली पण ...

अमावस्येच्या रात्री झोपायच्या वेळी, दिवे गेले असताना कुठल्या आया पोरांना खेळायला सोडणार? पोरे खेळताना ओरडणार, पायांच्या आवाजासोबत तोही आवाज येणार. आणि किट्ट काळोखात काळ्या सावल्या कशा दिसणार? आणि कुठे? तळमजल्यावर घर असते तर जमीNइवर दिसल्या म्हणता आले असते.