हिपोक्रसी ६ - लैंगिक शोषण

Submitted by कटप्पा on 28 August, 2018 - 13:29

गोष्ट मागच्या रविवार ची आहे. असेच आम्ही काही मित्र मैत्रिणी बसून ड्रिंक्स घेत होतो. एकेकच ड्रिंक झाले होते आणि आमच्यापैकी एकीने विषय काढला की भारतात लहान मुली कशा सेफ नाहीत आणि कित्येक वेळा नातेवाईक कसे लैंगिक शोषण करतात. दुसऱ्या एकीने तर शिव्याच घालायला सुरू केले की सगळे पुरुष कसे mcp आहेत, मौका पाहिजे असतो वगैरे वगैरे. कायदे कसे कडक हवेत, शिक्षा कशा व्हायला हव्यात वगैरे वगैरे..प्रत्येकजण सहमत होता.
आणखी एक मित्र होता तो म्हणाला माझा स्वतःचा अनुभव आहे. तो लहान असताना त्यांच्या लांबच्या एका काकूने कसा त्याचा फायदा उचलला होता आणि कसे त्याच्या सहमतीशिवाय त्याचे शोषण केले गेले.
त्याने घटना सांगितली, आणि 10 सेकंदस शांतता आणि लगेच ती मैत्रीण जी शिव्या घालत होती थोड्या वेळापूर्वी ती म्हणाली - क्या बात हैं, तुने तो बचपन मे ही सारे मजे ले लिये .. आणि हसायला लागली, सगळेच सामील झाले हास्यात.
माझी चिडचिड झाली, तो मित्र तर शॉक च झाला या बिहेवियर मुळे.

हिपोक्रेसी !!!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आख भौ असे सर्व्हे धर्मवाईज व्हावेत म्हणजे चांगला,त्यातल्या त्यात बरा धर्म कोणता हे पुढे येईल.
प्रत्येकाने स्वतः पाहिलेले हिपोक्रसीचे उदाहरण द्यावे ही अपेक्षा आहे. एकाने एक प्रतिसाद दिला की बाकीचे तीच री ओढतात.
व चर्चा एकांगी होते. काहींना विषय न समजल्यानं वेगळेच फाटे फोडतात.

उदा. एखाद्या लहान मुलाला तुला हरीण बघायचे का ? असे विचारून हो उत्तर आले की त्याच्या कानावर दोन्ही हात ठेवून उचलणे हा एक खेळ होता (आताचे माहीत नाही ). ते मूल ओरडलं की सगळे हसायचे. यात आपण काही चुकीचे करतोय हे या मंडळींच्या गावीही नसते.-> मी लहान असताना माझे काका (मला ४ काका आहेत) अस करायचे मला..आता ते त्यान्च्या नातवडाना तसे करतात. ह्यात काही चुकीचे आहे असे अजुनही मला वाटत नाही. एक गम्मत म्हणुन मी त्याच्या कडे पाहतो. ते सुद्धा गम्मन्त म्हणुनच करत असतील.

प्रामाणिकपणे सांगायचे तर त्यावेळी आम्हाला त्याचा कसलाही शारीरीक वा मानसिक त्रास झाला नाही.
>>> लैंगिक शोषण म्हणजे शारीरिक किंवा मानसिक त्रास व्हायलाच हवा असे नाही.

>>>>
हो, मग मी कुठे म्हणालो की ते लैंगिक शोषण नव्हते. वा मी कुठे त्या मुलीला क्लीन चीट दिली आहे. मी फक्त प्रामाणिकपणे ईतकेच म्हटले की मला त्यावेळी तिच्या त्या कृतीचा कसलाही त्रास झाला नाही. वा नंतरही त्या आठवणींचा त्रास झाला नाही. ईतकेच.

..

परपुरुषाचा नकोश्या स्पर्शाचा स्त्रीयांना जितका त्रास होतो तसा पुरुषांना तो होत नाही किंवा मुळातच तो तितका नकोसा वाटत नाही.
>>>>>
हे विधान ज्यांना पटलेले नाही ते विधान समजून घेण्यात गल्लत करत असतील तर सांगतो, मी "प्रमाणावर म्हणजेच टक्केवारीवर" भाष्य करत आहे.

जर समाजात पुरुषांकडून स्त्रियांचे लैंगिक शोषणाच्या तुलनेत स्त्रियांकडून पुरुषांचे होणारे लैंगिक शोषण तुलनेत नगण्य असेल तसेच पुरुषांना त्याचा होणारा त्रासही तुलनेत कमी असेल तर समाजमन तसाच विचार करते आणि त्याच विचारांनी ती बाई पटकन ते वाक्य म्हणाली. तर यात मला हिप्पोक्रसी हा शब्द चुकीचा वाटतो. असे शोषण होऊ शकते आणि वाईट टोकाचे होऊ शकते याची बरेच लोकांना कल्पनाही नसते. अश्यांना हिपोक्रसी हे विशेषण पटत नाही.

धागा हिपोक्रसीचा आहे, लोकांनी लैंगिक शोषणाला सेंटरला आणलेय आणि माझी पोस्ट वाचत आहेत.

Pages