हिपोक्रसी ६ - लैंगिक शोषण

Submitted by कटप्पा on 28 August, 2018 - 13:29

गोष्ट मागच्या रविवार ची आहे. असेच आम्ही काही मित्र मैत्रिणी बसून ड्रिंक्स घेत होतो. एकेकच ड्रिंक झाले होते आणि आमच्यापैकी एकीने विषय काढला की भारतात लहान मुली कशा सेफ नाहीत आणि कित्येक वेळा नातेवाईक कसे लैंगिक शोषण करतात. दुसऱ्या एकीने तर शिव्याच घालायला सुरू केले की सगळे पुरुष कसे mcp आहेत, मौका पाहिजे असतो वगैरे वगैरे. कायदे कसे कडक हवेत, शिक्षा कशा व्हायला हव्यात वगैरे वगैरे..प्रत्येकजण सहमत होता.
आणखी एक मित्र होता तो म्हणाला माझा स्वतःचा अनुभव आहे. तो लहान असताना त्यांच्या लांबच्या एका काकूने कसा त्याचा फायदा उचलला होता आणि कसे त्याच्या सहमतीशिवाय त्याचे शोषण केले गेले.
त्याने घटना सांगितली, आणि 10 सेकंदस शांतता आणि लगेच ती मैत्रीण जी शिव्या घालत होती थोड्या वेळापूर्वी ती म्हणाली - क्या बात हैं, तुने तो बचपन मे ही सारे मजे ले लिये .. आणि हसायला लागली, सगळेच सामील झाले हास्यात.
माझी चिडचिड झाली, तो मित्र तर शॉक च झाला या बिहेवियर मुळे.

हिपोक्रेसी !!!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hmmm, या वेळी मात्र नेम बरोबर बसलाय,
भले तुलनात्मक कमी प्रमाणात असेल पण लहान मुलांचे सुद्धा लैंगिक शोषण होते,

सतत दोन वर्षे लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक शोषण?
माझ्या नात्यात अशी एकजण आहे.मल्टीचॉइस वुमन म्हणावे लागेल तीला. अगोदर नादाला लावणार नंतर फुटवणार.नवीन बकरा पाहणार. ऐकले नाही तर पोलिसात तक्रार करण्याची धमकी देणार. नवराही बाहेरख्याली आहे. पण फार एकनिष्ठ असल्याचं नाटक करतात दोघेही.

आपल्याकडे पुरूषाचे लैंगिक शोषण झाले असे मानण्याची पद्धत नाही. कुणी तक्रार केली तर त्याला वेड्यात काढले जाईल किंवा चेष्टेचा विषय होईल तो. ब-याचदा अशा थापाही असतात. त्यामुळे कुणी असे सांगितले तर स्वाभाविकपणे अशीच प्रतिक्रिया येते. (चूक की बरोबर हे अलाहिदा)

कटप्पा पर्फेक्ट हिप्पोक्रेसी...
बचपन मे ही मजे लिये हे वाक्य वाचून किळस वाटली आणि डोक्यात तिडिक गेली.
पुरूषांना लैंगिक शोषण हवे असते असा एक अलिखित समज आहे आपल्या समाजात जो अत्यंत चुकिचा आहे. माझ्या ही मित्र मंडळीत मी एकच गोष्ट ऐकली आहे ज्यात एका लहान मुलाला एक मध्यमवयीन बाई अंतर्वस्त्राची हुक्स लावायला सांगायची. हे सुद्धा शोषणच आहे.
पुरूषांना अब्रु नसते फक्त स्रियांना असते हा एक पण चुकिचा समज.
अनेक वेळा लग्नात सुद्धा शरिरसंबंधांना स्त्री नाही म्हणाली आणि तिच्या इच्छेविरूद्ध पतीने ते केले तर तो बलात्कार ठरतो, पण अनेक वेळा स्त्रीची इच्छा असताना आणि पुरूषाची नसताना ही त्याने त्यात भाग घेतला तर तो बलात्कार होत नाही का? Uhoh
फारच कन्फ्युजिंग आहे.

वेळा स्त्रीची इच्छा असताना आणि पुरूषाची नसताना ही त्याने त्यात भाग घेतला>>>>
पुरुषाची इच्छा नसताना तो काही करू शकेल का?

सिम्बा विषय फारच क्लिष्ट आहे हा. आणि त्याला अनेक फाटे सुद्धा फुटू शकतात पण.
स्त्रियांची इच्छा नसताना त्या भाग होऊ शकतात या क्रियेचा तर पुरूष पण होऊ शकतात.

हिपोक्रसी आहेच परंतू बरेचदा पूर्वग्रह अणि अज्ञानातूनही अशा प्रतिक्रिया येतात. अल्पवयीन मुली बाबत जो कंसेंटचा मुद्दा आहे तो अल्पवयीन मुलासाठीही लागू होतो. अल्पवयीन व्यक्तीला योग्य अयोग्य काय हे कळत नसते, त्यामुळे मिळवलेली संमती हीच ग्राह्य धरली जात नाही. अल्पवयीन व्यक्तीने शारीरिक पातळीवर राजीखुषीने प्रतिसाद दिला तरी मोठ्या माणसांनी केलेले ते एक प्रकारचे शोषणच असते. याची जाणीव करुन दिली, त्या जागी तुमचा अल्पवयीन पुरुष नातेवाईक आहे अशी कल्पना करुन बघा असे सांगितले की बरेचदा मतपरीवर्तन होते.

पौगंडावस्थेतीला मुलांचे नात्यातील, ओळखीतील स्त्री-पुरुषांकडून किंवा शिक्षक/काउंसेलर/कोच्/मेंटर वगैरे गटातील स्त्री-पुरुषांकडून अशाप्रकारे शोषण होण्याची शक्यता बरीच असते. पालक वयात येणार्‍या मुलीबाबत सावधगिरी बाळगतात तशी मुलांबाबाबत सहसा बाळगत नाहीत. त्यातच पूर्वग्रहामुळे शोषण करणारा म्हणजे पुरुष हेच डोक्यात असते त्यामुळे परिचित स्त्री आपल्या मुलाचे अशा प्रकारे शोषण करेल ही शक्यताच विचारात घेतली जात नाही. बरेचदा आपले शोषण होत आहे याची मुलांना जाणीवच नसते. . मनाविरुद्ध असे काही घडले तर एकंदरीत पूर्वग्रहांमुळे, बदनामीच्या भीतीने मुलांचे मदत मागायचे प्रमाणही खूप कमी असते.
नुसते हिपोक्रसी म्हणून थांबण्यापेक्षा या विषयावर मोकळा संवाद साधला तर पिडीत व्यक्तीला मदत मागायला बळ मिळेल. भोवतालचे लोकं सजग असतील तर अशा शोषणाला आळा घालणे शक्य होईल. दोन वर्षापूर्वी आमच्या स्कूल डिस्ट्रिक्टमधे मुलांनी सजग राहून केलेल्या तक्रारीमुळे मदतनीस म्हणून काम करणारी स्वयंसेवक स्त्री पकडली गेली.

स्वाती२ प्रतिसाद आवडला.

लहान मुलग्यांचेदेखील लैंगिक शोषण होत असते पण त्यात शोषण करणारी स्त्री असणे हे कितीदा असते याचा विदा शोधावा लागेल.

===
आणि धाग्याचा विषय लहान मुलग्यांचे लैंगिक शोषण हा आहे ना?
मग त्यात

> सतत दोन वर्षे लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक शोषण?
माझ्या नात्यात अशी एकजण आहे.मल्टीचॉइस वुमन म्हणावे लागेल तीला. अगोदर नादाला लावणार नंतर फुटवणार.नवीन बकरा पाहणार. ऐकले नाही तर पोलिसात तक्रार करण्याची धमकी देणार. नवराही बाहेरख्याली आहे. पण फार एकनिष्ठ असल्याचं नाटक करतात दोघेही. >
∆ हे आणि

> अनेक वेळा लग्नात सुद्धा शरिरसंबंधांना स्त्री नाही म्हणाली आणि तिच्या इच्छेविरूद्ध पतीने ते केले तर तो बलात्कार ठरतो, पण अनेक वेळा स्त्रीची इच्छा असताना आणि पुरूषाची नसताना ही त्याने त्यात भाग घेतला तर तो बलात्कार होत नाही का? Uhoh
फारच कन्फ्युजिंग आहे. >
∆ हे कुठून आलं?

एनिवे भारतात लग्नांतर्गत बलात्कार हा कायद्याने गुन्हा नाही बायकोचे वय १४+ असेलतर.

विषय ' हिपोक्रसी ' हा आहे व 'जी मैत्रीण शिव्या घालत होती , ती म्हणाली .......' यावरून ती मैत्रीण 'हिपोक्रसी'चा नमुना म्हणून दाखवण्यात आलं आहे , असा माझा समज आहे .

'पुरुषाने केला तर तो बलात्कार मग स्त्रीने तसंच वागलं तर त्याचीही तशीच दखल कां घेतली जात नाही ?', हा विषय वेगळा व खूपच मूलभूत आहे. पूर्णपणे पुरूषप्रधान असलेल्या पूर्वीच्या समाजपदधतीत हे विशेष खटकलं नसलं तरी आतां मात्र हा प्रश्न स्वाभाविक वाटतो . ( बहुधा , त्यावेळीं स्त्रीला तसं वागायला वावच नाही किंवा हिंमतच होणार नाही, असः गृहीत धरलं गेलं असावं ) आपल्या कायद्यात तशी तरतूद होण्याचे संकेतही मिळत आहेत. माझ्या माहितीनुसार कांही प्रकरणात न्यायालयानीही याची गंभीर दखल घेतली आहे .

> विषय ' हिपोक्रसी ' हा आहे व 'जी मैत्रीण शिव्या घालत होती , ती म्हणाली .......' यावरून ती मैत्रीण 'हिपोक्रसी'चा नमुना म्हणून दाखवण्यात आलं आहे , असा माझा समज आहे . > हम्म. पटलं.

===
> 14???? > माफ करा चूक झाली. १४ नाही १५+ वयाची 'बायको' असेल तर तिच्यासोबत नवरा 'कधीही/त्याला हवं तेव्हा' सेक्स करू शकतो. लग्न केलंय याचाच अर्थ आयुष्यभराचा consent देऊन टाकलाय. त्यानंतर परत इच्छा नसणे, कन्सेन्ट नसणे वगैरे पश्न 'कायदा' विचारात घेत नाही. हे फक्त 'नैसर्गिक' सेक्ससाठी बरंका.

===
https://en.m.wikipedia.org/wiki/Age_of_Consent_Act,_1891 वेळ मिळाल्यास हेदेखील वाचा. संमतीवय १०+ वरून १२+ करायला गेल्यावर झालेली बोंबाबोंब.

'पुरुषाने केला तर तो बलात्कार मग स्त्रीने तसंच वागलं तर त्याचीही तशीच दखल कां घेतली जात नाही ?', हा विषय वेगळा व खूपच मूलभूत आहे. पूर्णपणे पुरूषप्रधान असलेल्या पूर्वीच्या समाजपदधतीत हे विशेष खटकलं नसलं तरी आतां मात्र हा प्रश्न स्वाभाविक वाटतो . ( बहुधा , त्यावेळीं स्त्रीला तसं वागायला वावच नाही किंवा हिंमतच होणार नाही, असः गृहीत धरलं गेलं असावं ) आपल्या कायद्यात तशी तरतूद होण्याचे संकेतही मिळत आहेत. माझ्या माहितीनुसार कांही प्रकरणात न्यायालयानीही याची गंभीर दखल घेतली आहे >>>>>

स्त्री कडून शोषण हे अगदी अपवादात्मक असते. माहीत झाले तर चर्चा जास्त होते. त्यावरून नियम नकोत बनायला. आपल्या देशात जिथे पुरूष सहजासहजी स्त्रीयांवर अत्याचार करतात आणि तपासयंत्रणा, न्यायिक लढे तितकेसे प्रभावी नसताना अपवादाचा बाऊ करून कायदे केले तर मग पळवाटा काढणा-यांसाठी ती पर्वणी होईल. अशा प्रकारचे युक्तीवाद खूप पूर्वी पण झालेले आहेत.

दोन गोष्टी एकमेकात मिसळून गोंधळ होऊ नये म्हणून याच प्रतिसादाचा दुसरा भाग स्वतंत्रपणे.

स्त्री कडून शोषण झाले तर त्यावर कारवाईच नको व्हायला असे म्हणणे नाही. ज्या वेळी पुरूषांकडून होणारे गुन्हे आणि पुरूषप्रधान संस्कृतीचं मिळणारं पाठबळ यात लक्षणीय घट होईल त्या वेळी याबाबत विचार केला जावा. सारासारविवेकबुद्धीला धरून अशा प्रकारे कायदे केले गेले नाहीत. तसेच स्त्री च्या वागणुकीकडे समाजाचे लक्ष अगदी बारकाईने असते. तिच्यावर एकतर्फी बंधने घालून त्यात ती चुकली की तिच्यावर शिक्के मारले जातात. अशी स्त्री अत्याचाराल बळी पडली तर तिचीच चूक असणार असे पुरूष सोडा स्त्रियांकडूनही गृहीत धरले जाते. अनेकदा पुरूषप्रधान संस्कृतीच्या संरक्षक /वाहक स्त्रियाच असतात. अशा वातावरणात स्त्रियांविरोधात कायदे बनवणे हे अनर्थाला निमंत्रण देण्यासारखे आहे.

अ‍ॅमी यांच्या प्रतिसादात जे उल्लेख आलेले आहेत ते न्यायालयाचे निर्णय आहेत. ते निकाल तपासून पहायला हवेत. वर्तमानपत्रांच्या मथळ्यांवरून मत बनवण्यात अर्थ नाही.

माहीत नाही कधीचे. परिस्थितीत फरक पडला आहे का ?
शहरात आणि मूठभर समाजाचे सोडा. जरा हरियाणातल्या खाप पंचायती, ग्रामीण भाग याकडे पहा. शहरातल्या मध्यमवर्गिय, निम्न मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ आर्थिक स्तरातल्या वस्त्या पहा.

परवा एक व्हिडिओ बघितला whatsapp वर, साधारण सहा ते सात वर्षाचं एक मुल, रस्त्यावर उभं आहे, तिथेच काही तरुण तरुणी आहेत, पैकी एक तरुणी जिने हॉटपॅन्ट आणि बऱ्यापैकी तंग टीशर्ट घातलाय, त्या मुलाच्या पोटाच्या against twirk करते, आता वळून आपल्या स्तनात त्या मुलाचे डोके खुपसून इतर अश्लील चाळे करते. आणि उभी राहिल्यावर व्हिडिओ काढणारा त्या मुलाच्या private पार्ट वर फोकस करतो, तीच तरुणी परत जाऊन त्या पार्ट वर टिचकी मारते.

मुद्दा एक: गंमत म्हणून लैंगिक शोषण.
मुद्दा दोन: पुरुष इच्छा नसताना सेक्स करू शकतो का या प्रश्नाचे उत्तर.

Pages