हिपोक्रसी ६ - लैंगिक शोषण

Submitted by कटप्पा on 28 August, 2018 - 13:29

गोष्ट मागच्या रविवार ची आहे. असेच आम्ही काही मित्र मैत्रिणी बसून ड्रिंक्स घेत होतो. एकेकच ड्रिंक झाले होते आणि आमच्यापैकी एकीने विषय काढला की भारतात लहान मुली कशा सेफ नाहीत आणि कित्येक वेळा नातेवाईक कसे लैंगिक शोषण करतात. दुसऱ्या एकीने तर शिव्याच घालायला सुरू केले की सगळे पुरुष कसे mcp आहेत, मौका पाहिजे असतो वगैरे वगैरे. कायदे कसे कडक हवेत, शिक्षा कशा व्हायला हव्यात वगैरे वगैरे..प्रत्येकजण सहमत होता.
आणखी एक मित्र होता तो म्हणाला माझा स्वतःचा अनुभव आहे. तो लहान असताना त्यांच्या लांबच्या एका काकूने कसा त्याचा फायदा उचलला होता आणि कसे त्याच्या सहमतीशिवाय त्याचे शोषण केले गेले.
त्याने घटना सांगितली, आणि 10 सेकंदस शांतता आणि लगेच ती मैत्रीण जी शिव्या घालत होती थोड्या वेळापूर्वी ती म्हणाली - क्या बात हैं, तुने तो बचपन मे ही सारे मजे ले लिये .. आणि हसायला लागली, सगळेच सामील झाले हास्यात.
माझी चिडचिड झाली, तो मित्र तर शॉक च झाला या बिहेवियर मुळे.

हिपोक्रेसी !!!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजिंक्यराव पाटील, मलाही आलेला तो व्हिडियो Uhoh
-------
कायदे पुरुषांविरुद्ध किंवा स्त्रियांविरुद्ध नसतात, तर गुन्ह्याविरोधात असतात. अजूनही स्त्रियांविरोधात गुन्ह्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून पुरुषांवर होणार्‍या अत्याचाराची दखल घेऊ नका, त्याबद्दल बोलू नका,असं का म्हणावं?

मुलांचे बायकांकडून शोषण होणे हा अपवाद वाटतो. नियम अपवादाने सिद्ध होतो तसा प्रकार. मूळ नियम पुरुषच मुलींचे/बायकांचे/मुलांचे शोषण करतात. मुलांचे शोषण पण तितकेच दुःखद आहे परंतु जिथे मुली-बायकांच्या शोषणाच्या बाबतीत आभाळच फाटलं आहे तिथे vice versa केसेस कडे अगदीच छिद्र समजून दुर्लक्ष होऊ शकते.

राजसी, दुर्लक्ष होऊ शकते की दुर्लक्ष करावे असे तुम्ही म्हणताय्? स्वाती२ यांची पोस्ट वाचलीत का?
वरच्या लशानशा प्रसंगातून मुलग्यांच्या स्त्रियांकडून होणार्‍या लैंगिक शोषणाबद्दलच सांगायचे आहे. त्याची गरज नाही का?

अक्था-कादंबर्‍या-चित्रपट-मालिकांत हे कितपत आलंय याचा विचार करताना आठवलेले दोन प्रसंग
साराभाईत साहिल आईला सांगतो, ही तीच आंटी जी मी अगदी १५ वर्षांचा होईपर्यंत मला ओठांवर किस करायची.
सध्या 6 feet under ही मालिका पाहतोय. त्यात Nate lost his virginity to his aunt (mother's sister) when he was 15.
अर्थात अमेरिकेतल्या लैंगिक जीवनाच्या कल्पना वेगळ्या असतील.

मुळात मुलांचं लैंगिक शोषण होतं, हेच मान्य करायला आपल्याला जमलेलं नाही. मग ते कोणाकडून होतं, हा भाग वेगळा. त्या प्रश्नाकडे व्हिक्टिमच्या, शोषित व्यक्तीच्या बाजूने पाहायला हवं, शोषणकर्ता कोण आहे, यावर त्याचं गांभीर्य बदलतं का?
वरच्या गोष्टीत मुलांच शोषण पुरुषाकडून झालं असतं, तर त्या बाईची प्रतिक्रिया वेगळी असती .

रच्या गोष्टीत मुलांच शोषण पुरुषाकडून झालं असतं, तर त्या बाईची प्रतिक्रिया वेगळी असती .---हो, पुढचा जोक झाला नसता.
दुर्लक्ष होऊ शकतं. Tirhaiit व्यक्तीचं. आई- वडिलांचे नाही.

ही हिपोक्रसी असेलच असे नाही. एवढ्या घाईत निष्कर्श काढू नका.

हे असले लैंगिक शोषण लहानपणी न कळत्या वयात माझ्याशी आणि माझ्या एका मित्राशी सुद्धा झाले आहे. ती मुलगी बिल्डींगमधलीच जिला आम्ही ताई बोलायचो अशी कॉलेजात जाणारी होती. आमच्या अज्ञानाचा आणि निरागसपणाचा फायदा ऊचलत ईसको प्यार कहते है म्हणत तिने आमच्याशी बरेच गोष्टी केल्या आणि करवून घेतल्या.
प्रामाणिकपणे सांगायचे तर त्यावेळी आम्हाला त्याचा कसलाही शारीरीक वा मानसिक त्रास झाला नाही. जेव्हा आम्ही मोठे झालो म्हणजे १४-१५ वर्षांचे तेव्हा शाळेतल्या मित्रांना फुशारक्या मारत ते किस्से सांगायचो.

कदाचित हे लैंगिक शोषणाचे सॉफ्ट वर्जन असल्याने आम्ही फुशारक्या मारत मिरवू शकलो. किंवा आमचे शोषण करणारी मुलगी असल्याने त्याचे किस्से चघळू शकलो. पण समजा तेच एका पुरुषाने आमचे अगदी सौम्य लैंगिक शोषण केले असते तर ते असे मिरवू शकलो असतो का? किंवा मी एक मुलगी असतो तर मोठे झाल्यावर त्या आठवणी आठवून हसलो असतो का?

निसर्गानेच स्त्री पुरुष यांच्यात लैंगिकदृष्ट्या फरक बनवला आहे. परपुरुषाचा नकोश्या स्पर्शाचा स्त्रीयांना जितका त्रास होतो तसा पुरुषांना तो होत नाही किंवा मुळातच तो तितका नकोसा वाटत नाही. आपले समाजमन यावरच आधारलेले आहे. त्यामुळे एखाद्या पुरुषाने आपले लैंगिक शोषण एखाद्या स्त्रीकडून झाले आहे असे सांगताच पहिली आणि स्वाभाविक प्रतिक्रिया अशीच येणार जशी त्या बाईची आली. त्याउपर त्याने त्याचा कसा शारीरीक मानसिक त्रास झाला हे उलगडून सांगितले तर त्यानुसार सहानुभुतीही नक्कीच मिळेल. तर सांगायचा हेतू हा की अचानक शॉक होत याला हिपोक्रसी टायटल लावायची गरज नाही.

पुरुषांचे मुळात प्रॉब्लेम वेगळेच असतात. एखादी मुलगी डेस्परेट होत अंगावर आली तर लैंगिक शोषणापेक्षा आता हिला होकार वा नकार काहीही दिला आणि उद्या हीने उलटाच कांगावा केला तर ... असो, पण तो विषय वेगळा झाला.

राजसी, आपली चिंता व आपला मुद्दा रास्त आहेत, हें आतां पर्यंतच्या अविरोध प्रचलीत असलेल्या कायद्याच्या तरतूदींवरून स्पष्टच आहे . पण, बदलत्या सामाजिक व्यवस्थेत आतां त्याची दुसरी बाजूही अधिकाधीक व न दुर्लक्षित करण्या इतपत समर्थनीय होते आहे , हेही खरं आहे .

परपुरुषाचा नकोश्या स्पर्शाचा स्त्रीयांना जितका त्रास होतो तसा पुरुषांना तो होत नाही किंवा मुळातच तो तितका नकोसा वाटत नाही.>>>हे काही पटले नाही.

माझ्या एका मित्राचे वयाच्या १७व्या वर्षी एका घटस्फोटीतेशी त्याच्या इच्छेशिवाय संबंध प्रस्थापित झाले. अर्थात, पहिला प्रसंग केवळ अनिच्छेपोटी होता पण नंतर साधारण वर्ष दोन वर्ष with consent त्यांचे संबंध होते. नंतर त्या स्त्रीचे लग्न झाले आणि माझा मित्र 21व्या वर्षी वेश्यागमन करू लागला. मी जेव्हा त्याच्यासोबत बसलो होतो तेव्हा नशेत त्याने त्या स्त्रीला शिव्याच घातल्या. त्याचं म्हणणं होतं की ही गोष्ट त्याला सुंदरपणे आयुष्यात यायला हवी होती. हा मुद्दा थोडा confusing आहे खरा!

परपुरुषाचा नकोश्या स्पर्शाचा स्त्रीयांना जितका त्रास होतो तसा पुरुषांना तो होत नाही किंवा मुळातच तो तितका नकोसा वाटत नाही. >>>>> अज्जिबातच पटलेले नाही हे विधान!

परपुरुष असो वा परस्त्री, माझ्या इच्छेशिवाय माझ्यापासून 2 फुटाच्या परिघात कुणीही प्रवेश केला तरी मला आवडत नाही. शारीरिक भाषेत या परिघाला काहीतरी म्हणतात.

परपुरुषाचा नकोश्या स्पर्शाचा स्त्रीयांना जितका त्रास होतो तसा पुरुषांना तो होत नाही किंवा मुळातच तो तितका नकोसा वाटत नाही. >>>>> अज्जिबातच पटलेले नाही हे विधान!

-- हे ऋ चे विधान नाही. समाजमन तसे आहे असे तो म्हणत आहे. पुरुषांवर स्त्रियांकडून अत्याचार होतात त्यावर संसदेत (का विधानसभेत) चर्चेला विषय आला तर समस्त पुरुष आणि स्त्री सदस्यही खदाखद हसत होते असे ऐकले.... समाजमन असंच आहे की पुरुषांवर कोण स्त्री अत्याचार करु शकते...

स्त्रियांचे किळसवाणे स्पर्श असतत. रेल्वेटिकिटाच्या रांगेत उभे असतांना दोन तीन वेळा अनुभवले आहेत. घाण वाटतं.

न आवडणाऱ्या, सेक्ससाठी असुसलेल्या व जिचे अनैतिक संबंध माहिती आहे अशा स्ञीयांचा स्पर्श ओंगळवाणा अंगावर पाल पडल्यासारखा वाटू शकतो.
तीनवेळेस बसमध्ये समलैंगिक पुरूषांनी लगट करण्याचा प्रयत्न केला होता ते इतकं किळसवाणे होते की जागा बदलुनही पिच्छा पुरवला होता.
तेव्हा एकपती शिवाय दुसरा विचार न करणाऱ्या स्रीयांना होणाऱ्या त्रासाची कल्पना आली.

गोष्टीतल्या बाईच्या मुलग्याबाबत असं झालं, तर ती अशीच प्रतिक्रिया देऊ शकेल का?

न आवडणाऱ्या, सेक्ससाठी असुसलेल्या व जिचे अनैतिक संबंध माहिती आहे अशा स्ञीयांचा स्पर्श ओंगळवाणा अंगावर पाल पडल्यासारखा वाटू शकतो.

- विश्लेषणाची आवश्यकता काय आहे? हेच स्त्रियांना पुरुषांच्या स्पर्शाबद्दल वाटते असे म्हणावे? आवडणार्‍या, सेक्ससाठी न आसुसलेल्या व चरित्रसंपन्न पुरुषांनी स्पर्ष केले तर हवेहवेसे वाटतील? कायपण आपलं...

परपुरुषाचा नकोश्या स्पर्शाचा स्त्रीयांना जितका त्रास होतो तसा पुरुषांना तो होत नाही किंवा मुळातच तो तितका नकोसा वाटत नाही. >>>>>
पब्लिसिटी स्टंट

प्रामाणिकपणे सांगायचे तर त्यावेळी आम्हाला त्याचा कसलाही शारीरीक वा मानसिक त्रास झाला नाही.
>>> लैंगिक शोषण म्हणजे शारीरिक किंवा मानसिक त्रास व्हायलाच हवा असे नाही.

मुलांचे बायकांकडून शोषण होणे हा अपवाद वाटतो.>>

अपवाद वाटतो यावरुन याबद्दल किती जागृती करण्याची गरज आहे हेच अधोरेखीत झाले. अशा प्रकारे होणार्‍या शोषणाचे प्रमाण खूप आहे मात्र मी आधीच्या पोस्ट मधे लिहिल्याप्रमाणे अनैसर्गिक संबंध नसेल तर बरेचदा मुलांना ते शोषण आहे हेच कळत नाही. कंसेंट शिवाय प्रस्थापित केलेले लैंगिक संबंध , सहेतुक स्पर्ष वगैरे सर्व शोषणात समाविष्ट होते. वासना भागवणे हा एकमेव हेतू शोषणामागे नसतो. दमन हा देखील याचा महत्वाचा भाग आहे. केवळ पौगंडावस्थेतील मुलच नाही तर असिस्टेड लिविंग फॅसिलिटितील वृद्ध पुरुष आणि स्त्रीया देखील लैंगिक शोषणाला बळी पडतात. २२ वर्षाची तरुणी ७०+ वर्षाच्या मदतीशिवाय दैनंदिन व्यवहार करु न शकणार्‍या पुरुषाचे लैंगिक शोषण करते यावर कदाचित विश्वास बसणार नाही पण हे घडते. नुसते घडत नाही तर त्याचा विडीओ करुन तो शेअर केला जातो.
शोषणाचे चक्र असते. शोषणाला बळी पडलेली व्यक्ती योग्य मदतीअभावी पुढे स्वतःच शोषण करणारी बनू शकते. डोमेस्टिक अ‍ॅब्युझचे सायकल असते तसेच सेक्शुअल अ‍ॅब्युझचे देखील सायकल असते. वात्सल्य मूर्ती समजली जाणारी स्त्री जर का सासू म्हणून सुनेचा छाळ करु शकते, पत्नी जर पतीचा छळ करु शकते तर स्त्री लैगिक शोषण करु शकते हे अपवाद का वाटते ? व्यक्ती तितक्या प्रकृती आणि विकृती!

परपुरुषाचा नकोश्या स्पर्शाचा स्त्रीयांना जितका त्रास होतो तसा पुरुषांना तो होत नाही किंवा मुळातच तो तितका नकोसा वाटत नाही. >>>>>हा अजून एक गैरसमज! लहान मुलाला सुद्धा मनाविरुद्ध गालाला हात लावलेला आवडत नाही इथे तर सहेतुक स्पर्ष!

एखाद्या खेडूत बाईने घाईत असताना पोलक्याचे बटण एखाद्या लहान मुलाकडून लावून घेणे याला कदाचित शोषण म्हणत असतील, पण त्या बाईची अडचण असेल, घरात कुणी दुसरं बाई माणूस नसेल, पुरूष मंडळी येऊन बसली असतील आणि त्यांच्यासमोर जाताना संकोच वाटत असेल तर तिने मदत घेणे खूप नैसर्गिक आहे. याला जर शोषण म्हणत असतील तर शोषणाच्या व्याख्या बदलून मग पुन्हा सर्व्हे घ्यायला हवेत.

तसेच असे सर्व्हे कधी होतात, कुणाकडे जातात हे एक कोडेच आहे. ते सर्वसमावेशक असतात का ? तसेच अगदी छोट्या सँपल साईज वरून अशा बाबतीत जनरलाईजेशन करणे योग्य आहे का ?
सध्या एका सेवाभावी संस्थेला हेच प्रश्न विचारले आहेत.

>>एखाद्या खेडूत बाईने घाईत असताना पोलक्याचे बटण एखाद्या लहान मुलाकडून लावून घेणे याला कदाचित शोषण म्हणत असतील, >>

असे कोण म्हणतयं? ऊठसूठ कुणी आरोप करायला जात नाही. हेतू काय हे बघितले जातेच. आता विषय निघालाच आहे तर -
खरे तर हाताला दुखापत वगैरे अपवाद वगळता हे हुक्स्/बटणं लावायला कुणाचीही मदत लागत नाही आणि अडचणीच्या क्षणी मदत घेणे आणि हेतूपुरस्सर असे करण्यासाठी सावज शोधणे यात फरक आहे.

>>प्रामाणिकपणे सांगायचे तर त्यावेळी आम्हाला त्याचा कसलाही शारीरीक वा मानसिक त्रास झाला नाही.>.
. एका व्यक्तीला झाला नाही म्हणजे इतरांना होत नाही असे नाही. अज्ञानी व्यक्तीचा गैरफायदा घेतला गेला तर ते शोषणच ना? बरेचदा पालक म्हणून स्वतःच्या मुलाच्या सुरक्षिततेचा विचार सुरु होतो तेव्हा पूर्वायुष्यातील अशा घटना आठवून बर्‍याच पुरुषांना मानसिक त्रास होतो.

हेतू काय हे बघितले जातेच. >> मग ठीक.
मला ग्रामीण वातावरणाबाबत लिहायचे होते. पण इथे सर्व्हेचे स्टँडर्डस किंवा शोषणाच्या व्याख्या या पाश्चात्य पद्धतीच्या आहेत. गावाकडे लहान मुलांची गंमत केली जाते ती इथल्या लोकांना अत्यंत क्रूर किंवा शोषण वगैरे वाटेल. पण त्यांच्या मनात तसा हेतू नसतो.
उदा. एखाद्या लहान मुलाला तुला हरीण बघायचे का ? असे विचारून हो उत्तर आले की त्याच्या कानावर दोन्ही हात ठेवून उचलणे हा एक खेळ होता (आताचे माहीत नाही ). ते मूल ओरडलं की सगळे हसायचे. यात आपण काही चुकीचे करतोय हे या मंडळींच्या गावीही नसते.
तसेच पार्श्वभागावर चापट मारणे हे त्या १९९८ च्या सर्व्हेप्रमाणे शोषण आहे. पण ते सर्रास चालते. त्यामागे कुठलाच हेतू नसतो. रॅगिंग म्हणता येईल असे पण तसा हेतू नसलेले प्रकार मुलाला घट्ट बनवण्यासाठी केले जातात. काय नाजूकपणा करतोस ? असे शेरे मारले जातात.
इतक्यावरच थांबत नाही तर त्याच्या आईबापाला पण "पोरगं लै नाजूक हाय " असं सुनावलं जातं.
पाश्चात्या एटीकेट्स वगैरेंपासून कोसो दूर असलेली मंडळी आहेत. मोकळेढाकळे म्हणा फारतर. भाषेतही शिवराळपणा जास्त असतो. त्यामुळे असले निकष ऐकले तर त्यांना नवल वाटेल.

त्यामुळे पहिल्यापासून अशा सर्व्हेजबाबत साशंक आहे.

१९९८ चा सरकारी सर्व्हे. २००५ पासून २०१२ पर्यंत केलेला युनिसेफचा सर्व्हे आणि अजून एक आहे.
९८ च्या सर्व्हे मधे मुलींपेक्षा मुलांचे लैंगिक शोषण अनेक पटींने जास्त असल्याचे सांगितले. सँपल कसे घेतले हे समजले नाही. युनिसेफच्या सर्व्हेत हे प्रमाण उलटे आहे ( जे योग्य वाटले ).

Pages